सहानभूती नको सहाय्य....


सहानभूती नको सहाय्य.....

कुणी नोटा बदलण्यासाठी धडपडतंय तर कुणी काळा पैसा गोरा करण्यात पण फक्त एकदा या गरिबांच्या आयुष्यात डोकावुन पाहिल की स्वतःचीच किव येते. ज्यांनी आयुष्यात कधी ५००-१००० ची नोट पाहिलीच नसेल त्यांना काय करायच काळा पैसा आणि गोरा पैसा... इकडे आम्ही नोटा मिळवायला रांगा लावतोय तर तिकडे “काहीतरी” मिळेल या अपेक्षेने हे सर्व घोळका करुन आले होते. पण यांना जे काही दिल ते इतक “अपुर” होत की काहितरी दिल्याच सुख मिळण्याऐवजी मन नुसत "चरफडत" होत आपण किती “स्वार्थी” आहोत.


“मदत तुमची आनंद त्यांचा” या आवाहनाला प्रतिसाद देत जमा केलेले जुने कपडे वाटप यांना करताना मन स्वतःलाच दोष देत होत. “बस इतकच” स्वतः रोज मॅचिंग कपड्याचा अट्टाहास करणारे आपण काय देवु शकलो यांना फक्त जुने कपडे. माझी तब्येत ठिक नाहीय म्हणुन दोन दिवस अंगावर स्वेटर घालुन फिरत होतो गडावर जात नव्हतो म्हणुन मला “सहानभुती”(?) मिळत होती मग आयुष्यभर फाटके कपडे अंगावर घेवुन वावणा-यांच काय त्यांना कोण “सहानभुती” देणार ?? बर नुसती "सहानभुती" नकोय त्यांना त्यापुढेही "सहाय्य" हवय !! नाहितर आजकाल “सोशल देशभक्ती” प्रमाणे “सोशल सहानभुती” ब-याच प्रमाणात व्यक्त होते...


सुरुवात तर केलीय ही परिस्थिती सुधारण्यासाठी बघु कितपत यश येतय!! एक मात्र नक्की प्रत्येक वेळी मदत करताना “स्वतःचीच किव” करावीशी वाटेल कारण आपण उघड्या डोळ्यांनी ति-हाईतासारखी अशी परिस्थिति पाहतोय जिथे एकाच महाराष्ट्रात आपण एकीकडे सुखचैनीत जगतोय आणि दुसरीकडे “सुखाचा” लवलेशच नाहिय चैनीच्या गोष्टी तर दुरच राहिल्या...


स्थळ:- बागलान(नाशिक)
#JoyOfHappiness व दुर्गवीर प्रतिष्ठान आयोजित वॅाटर फिल्टर व कपडे वाटप कार्यक्रमादरम्यान आलेला अनुभव....



Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)