रानभुली ची राणी....




रानभुली ची राणी....


कधी कधी खुप “महान” असलेल व्यक्तिमत्व अगदि “साधेपणाने” तुमच्या समोर येत आणि आपल्यातला बडेजावपण, अहंकार नष्ट होवुन त्या व्यकतीच्या चरणांवर डोक ठेवावस वाटत..... छायचित्रात दिसणा-या आज्जी या कोणी सामान्य व्यक्तिमत्व नाहिय. या आहेत "मनू आज्जी" म्हणजे गो. नि. दांडेकर यांना रायगड दाखवणारी याच त्या "रानभुली च्या नायिका" या आज्जींवर गो. नि. दांडेकरांनी "रानभुली" सारखी कादंबरी लिहिली.


दि.२० नोव्हेंबर २०१६ या दिवशी दुर्गवीर रामजी कदम यांनी या आज्जींच घर दाखवल लागलीच आम्ही त्यांच्याकडे गेलो पण काहि कामानिमित्त त्या बाहेर गेल्या होत्या. त्यांच्या घरच्यांशी बोलतोय इतक्यात आजी तिथे आल्या. झपझप पडणारी पावलं आणि अंधारात चमकणारे तेजस्वी डोळे असं हे व्यक्तिमत्व समोर आलं आणि क्षणभराचा विलंब न लावता आम्ही एक एक करुन आज्जींच्या पाया पडलो. अक्षरशः मन शहारुन आल एखाद्या पिक्चर च्या हिरोला पाहिल्यावर एक वेळ काहिच वाटणार नाही पण त्या क्षणाला त्या आज्जींना पाहिल आणि नकळतच पायावर डोक ठेवायची इच्छा झाली. जी पावल अगदि १० एक वर्षाची असताना गो. नि. दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत रायगड फिरली त्या पावलांच्या सुरकुत्यांवर डोक ठेवायच भााग्य आम्हाला लाभल...... खरच एक क्षण मन भरुन आल जेव्हा आज्जींना पाय पडलो..... त्यांनी कौतुकाने डोक्यावरुन हात फिरवला तेव्हा तर माझे डोळे पाणावले. रामजी कदम आज्जींबद्दल सांगत होते त्यावेळी आज्जींच्या डोळ्यात त्या जुन्या आठवणी स्पष्टपणे दिसत होत्या आज्जी जमिनिकडे एकटक बघत त्या आठवणींना उजाळा देत होत्या हे आम्ही सर्वांनी पाहिलय.


सध्या वयोमानानुसार तब्येतीची कुरबुर असली तरी रामजी कदम बोलले त्याप्रमाणे आज्जींच्या डोळ्यातले “तेज” त्या तिन्ही सांजेच्या अंधारात लख्खपणे दिसत होते. वेळेच्या कमरततेमुळे आम्ही जायला निघालो तर आज्जी आम्हाला “चहा” चा आग्रह करु लागल्या पण पाणी पिवुनच आम्ही आज्जींचा निरोप घेवुन निघालो. भल्या भल्या विभुतींना गडावर पोहोचायला मदत करणा-या आज्जी आम्ही निघतोय म्हटल्यावर अगदि नातवंड परत चााललीत या प्रेमाने गाडिपर्यंत सोडायला आल्या तेव्हा त्या निस्वार्थी “राणी” कडे पहात रहावस वाटल.... अगदि गाडि नजरेआड होईपर्यंत आज्जी आम्हाला पाहत राहिल्या पण माझ्या नजरसमोरुन तो करारी, निस्वार्थी, आपुलकिचा चेहरा काही केल्या अजुनही जात नाहिय....



Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….