व्हेंटिलेटर.....हळुवार प्रवास नातेसंबंधांचा……



व्हेंटिलेटर.....हळुवार प्रवास नातेसंबंधांचा……


बाप आणि मुलांच्या नात्यात ब-याच गोष्टी बोलायच्या राहुन जातात कदाचित त्या कधीच बोलल्या जात नाहीत पण असा एक क्षण असतो जिथे हे बोलायला एक संधी मिळते आणि त्या क्षणात सर्व व्यक्त व्हाव लागत अन्यथा ती संधी पुन्हा येत नाही.



चित्रपटात वडिलांचा "व्हेंटिलेटर" का काढु नये याची जाणीव शेवटच्या क्षणाला मुलाला होते आणि लिफ्ट नाहीय म्हणून मुलगा पाय-यांनी धावत जातो तो क्षण डोळ्यात आसवं आणतो. आणि तिथेच जाणीव होते, आपण एकदातरी आपल्या आई वडिलांशी मोकळेपणाने बोलायल हव…..


दुस-या बाजूला "प्रेम" आणि "सवय" या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचा समतोल साधला नाही तर गफलत होते आणि तुमच अतीप्रेम एखाद्याची सवय बनते आणि तिथेच घात होतो…….



एका "व्यक्तीला" लावलेला "व्हेंटिलेटर" हा त्याच्या संबंधित सर्व "नात्यांना" असतो याची जाणीव करून देणारा सुरेख चित्रपट.....

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)