"असहिष्णू" 'हिंदुस्थानातील' "गरीब" 'अमीर'

ज्या अमिर खानच्या पत्निला देश असुरक्षित वाटतो त्या दोघांसाठी एक पत्र ..... अमीर खर तर तुला इतर वेळी पत्र लिहिल असत तर माझे अंतरंगातुन तुला "प्रिय अमीर" अस लिहिल असत पण तुझ्या "देश सोडण्याच्या " वक्तव्यानंतर तुला प्रिय म्हणायची अजिबात इच्छा नाही. तुझा राजा हिंदुस्तानी (हिंदुस्तानी बर का!) असो वा तारे जमीन तुझा प्रत्येक चित्रपट मी आवडीने पाहिला. राजा हिंदुस्तानी मधील तुझा "कम कम मॅडम" जोक अजुनही मारावास वाटतो! मी स्वतः शिक्षक असताना तुझा तारे जमीन पर पाहिला आणि Every Child is Special अस म्हणत मुलांना शिकवताना मारणं सोडुन दिल!! तुझा रंग दे बसंती पाहिला की अंगावर आजही शहारे येतात ! तुझ्या थ्री इडियट मधल्या मैत्रीला आजही मानतो ! तुझा भुवन तर भेजे से निकलताही नही! सत्यमेव जयते आणि Increditable India असणारा हिंदुस्तान तुला आज परका असहिष्णु कसा काय वाटायला लागला ! तोही गेल्या ८-१० महिण्यात !! अनेक लेखकांनी,कवींनी पुरस्कार वापसी केली मी काहिच बोललो नाही कारण मी त्यांची पुस्तक किंवा लिखान पैसे देवुन वाचल नव्हत पण तुझे चित्रपट मी पैसे मोजुन पाहिले ते फक्त तुझ्या...