Posts

Showing posts from October, 2012

"दुर्गवीर" मी

Image
Durgveer स्वराज्यासाठी झटेन असा "दुर्गवीर" मी, गडकोटांसाठी मरेन असा "दुर्गवीर" मी शिवरायांचा निष्ठावान असा "दुर्गवीर" मी हिंदवी स्वराज्याचा मावळा असा "दुर्गवीर" मी तन-मन-धन अर्पिणारा असा "दुर्गवीर" मी शिवकार्याने जीवन व्यापणारा असा "दुर्गवीर" मी स्वराज्याचा ध्यास मजसी असा "दुर्गवीर" मी पाषाणाहूनी कठीण असा "दुर्गवीर" मी मित्रांचा कोमल मित्र असा "दुर्गवीर" मी महाराष्ट्राचा अभिमान मजसी असा "दुर्गवीर" मी काट्या-कुट्या तुनी चालेन असा "दुर्गवीर" मी शिवशाहीचे गुलाब फुलवेन असा "दुर्गवीर" मी गडकोटां साठी छातीची ढाल करेन असा "दुर्गवीर" मी शिवकार्या साठी पोलादी मनगटे झिजवेन असा "दुर्गवीर" मी गनिमास ठेचेन असा "दुर्गवीर" मी शिवरायांसी नेहमी पूजेन असा "दुर्गवीर" मी जगेन तर शिवभक्त असा "दुर्गवीर" मी मारतानाही मरेन शिवप्रेमी असा "दुर्गवीर" मी धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Lok

विश्वास...

कसा कोणावरहि विश्वास ठेवू, न कळत कोणात कसा गुंतून जाऊ, गुलाब म्हणून कोणास गोंजारू,  तर काट्यांनी रक्त बंबाळ होऊ... मन माझे विश्वास ठेवण्यास जाई, तेथेच त्याचा घात होई,  विश्वासाने मन कोणास देई, नेमके त्यानेच माझी साथ सोडावी... मनापासून कुणाला तरी आपले मानावे,  कधी नव्हे ते त्याला सारे सांगावे,  गरज म्हणून ते त्याने ऐकावे,  संपताच गरज त्याने ते सोडून द्यावे.... विश्वासू असे ना उरले या जगात, ना कुणी जे राहील मनाच्या गाभा-यात ज्यांना राखून ठेवले या मनात,  जे दूर झाले एका क्षणात... धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke http://dhiruloke.blogspot.in/ http://dhirajloke.blogspot.in/  

खरच...... जमेल का मला?

खरच...... जमेल का मला? जुन्या वाईट आठवणी विसरून, पुन्हा नव्या उमेदीने जगण, पूर्वायूष्याच्या  विश्वासघाताला विसरुन, रागाला आवरण... खरच...... जमेल का मला  पहिल्या प्रेमात फसलो म्हणुन, मैत्रिकडे संशयाने न पाहाणे, खरच कुणाची तरी निस्वार्थी मैत्री, त्याचा स्वार्थ म्हणुन न पाहाणे, खरच...... जमेल का मला  जबाबदारीमूळे प्रेमात फसण, अनं त्या प्रेमात फसन्याने, स्वताला जबाबदारित गुंतवण,  आता तरी या चक्राला थांबवन, खरच...... जमेल का मला  आठवन येते पहिल्या प्रेमाची, आशा आहे "ती" परतण्याची, राखून ठेवलीय मी जागा तिची, सहजा सहजी ना होणार ती "जागा" दुस-या कुणाची, खरच...... जमेल का मला रात्री अपरात्री "ती"ला आठवण, प्रत्येक मुलीत "ती" ला शोधण, भले ती कुठेतरी कमी पडण, पण निदान तिला ख-या मैत्रीत टिकवण, खरच...... जमेल का मला धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke http://dhiruloke.blogspot.in/ http://dhirajloke.blogspot.in/

"तू" आणि "तो"

"तू" आणि "तो" तुझ्या आकाशरुपी जीवनात, "तो" ढगासारखा येउन गेला, "तू" हरवलिस "ज्या" च्या सुगंधात, "त्या" च्या येण्याचा कधी अर्थ जाणला????? आजची तुमची प्रेमकळी, फुलेल ती एका गोड सकाळी, फुलान्यास ही गोड कळी, जावी लागेल रात्र काळी!!!! आज तुझे जे मन जाळी, तेच लिहिले असावे तुझ्या भाळी, तुझ्या आठवणी ठेव जवळी, एक दिवस याच हलवतिल तुझ्या गालखळी!!!!! तुझ्या आयुष्याच्या वाटेवर, तू फक्त "त्या" ची वाट पाहिलिस, "त्या" चे आयुष्य असेल कोणत्या काटयावर, याची कधी चाचपड़नी केलीस!!!!! "त्या" च्या एका पावलावर, तू एकच पाउल ठेऊ नकोस, दडपण जरी असले मनावर, तरी मनामध्ये काही ठेऊ नकोस!!!! प्रेम कर तू त्याच्यावर, पण मनापासून मनावर, विश्वास ठेव तुझ्या प्रेमावर, जसा गुलाबचा काटयावर!!!!!! जशी पावसाची ओढ़ चातकाला, जशी लाटाची ओढ़ किनारयाला, तशी प्रेमाची ओढ़ तुमच्या मनाला, ना उमजनार ते सहजा सहजी कुणाला!!!! त्याच्या मदतीने मिळते तुझ्या जीवनाला दिशा, हीच असावी

नाराज व्ह्यायच तर.................................

नाराज व्ह्यायच तर................................. नाराज व्ह्यायच तर................................. नाराज व्ह्यायच तर कुणासाठी व्ह्यायच, ज्याला आपल मानल त्याच्यासाठी व्ह्यायच, विसरायच असेल तर कुणाला विसरायच, ज्याला आपल म्हणुन लक्षात ठेवायच होत. विचारायाच असेल तर कुणाला विचारायाच, ज्याला स्वताच्या मनातल कधी सांगितल होत, रागावायाच असेल तर कुनावर रागावायाच, ज्याच्या रागाला कधी समजून घेतलेल असत, मैत्रिची काळजी हेच त्याच्या रागाच कारण असत, आपलेपणा टिकवनं हेच त्याच्या विराहाच निमित्त असत, विसरंन सोप नसत, ज्याला मनातल माहित असत, नाराज होण्याची धमकी देऊन, नविसरण्यातच मैत्रीच बंधन असत, धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke http://dhiruloke.blogspot.in/ http://dhirajloke.blogspot.in/

आई.......

आई....... आठवणित रडतोय तुझ्या मी..... भेटायास मज येशील ना???? विरहात कोलमोड़तोय तुझ्या मी... सावरण्यासी तू येशील ना.... आई.................. स्वार्थाने बरबटलेल्या या जगात, गुरफटून गेलोय मी, सोडवून मजला या स्वार्थजालातुन, दूर कुठेतरी नेशील ना.... आई.............. या दुनयेशी लढीन मी, करीन मी घनघोर युद्ध, पण न जाणे तुझ्या आठवनिने  मन माझे का कमजोर होत..... आई............... माझ्या मनातल तुझ पद, अढळ असेल तुझ्यासाठी, साथजन्म विसरणार नाही मी, तू जे केलेस माझ्यासाठी, आई............... तुझ माझ्यासाठी धड़पडन, मलाही कळतय, थांबवू शकत नाही म्हणुन, मन माझ इथे जळतय... आई................... आई............... धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke http://dhiruloke.blogspot.in/ http://dhirajloke.blogspot.in/

शेवटचे पान....

शेवटचे पान.... शेवटचे पान.... वहितिल सर्वात महत्वाचे पान, यालाच मिळते हक्काचे मान पान, उगवातो विचार मनात, तो उमटतो शेवटच्या पानात...... तेच ते शेवटचे पान...... शोधून सापडनार नाही असे हक्काचे ठिकान, साधे दिसुनही असते मोत्याची खाण, किती विचार केला मनात, लगेच उतरे या पानात.. तेच ते शेवटचे पान...... मन झेलते किती मान अपमान, सगळे अनुभवते हे शेवटचे पान, सहजरीत्या खोटे बोलते हे मन, पण चुकुनही निघणार नाही खोटे हे पान.... तेच ते शेवटचे पान...... कोणाचा झाला जर प्रेमभंग, बाहेरून गायले जरी श्लोक अभंग, दाखविला नाही बाहेरून संबंध, पण शेवटच्या पानात येतो प्रेमाचा सुगंध...... तेच ते शेवटचे पान...... वहिसारखे असते जीवनाचे शेवटचे पान, खुप काही बोलते जरी नसली जबान, तन मन नसले जरी जवान, तरी साथ देते हे शेवटचे पान... तेच ते शेवटचे पान...... तरुणपण जाते जेव्हा संपून, म्हातारपन येते जेव्हा सरून, नाही ठेवले असता काही देऊन घेउन, अलगदच जे जाते उलगडून..... तेच ते शेवटचे पान...... जेव्हा सावरू शकत नाही जिवानाची कमान, डगमगू लागते हे