"दुर्गवीर" मी

Durgveer

स्वराज्यासाठी झटेन असा "दुर्गवीर" मी,
गडकोटांसाठी मरेन असा "दुर्गवीर" मी
शिवरायांचा निष्ठावान असा "दुर्गवीर" मी
हिंदवी स्वराज्याचा मावळा असा "दुर्गवीर" मी
तन-मन-धन अर्पिणारा असा "दुर्गवीर" मी
शिवकार्याने जीवन व्यापणारा असा "दुर्गवीर" मी
स्वराज्याचा ध्यास मजसी असा "दुर्गवीर" मी
पाषाणाहूनी कठीण असा "दुर्गवीर" मी
मित्रांचा कोमल मित्र असा "दुर्गवीर" मी
महाराष्ट्राचा अभिमान मजसी असा "दुर्गवीर" मी
काट्या-कुट्या तुनी चालेन असा "दुर्गवीर" मी
शिवशाहीचे गुलाब फुलवेन असा "दुर्गवीर" मी
गडकोटां साठी छातीची ढाल करेन असा "दुर्गवीर" मी
शिवकार्या साठी पोलादी मनगटे झिजवेन असा "दुर्गवीर" मी
गनिमास ठेचेन असा "दुर्गवीर" मी
शिवरायांसी नेहमी पूजेन असा "दुर्गवीर" मी
जगेन तर शिवभक्त असा "दुर्गवीर" मी
मारतानाही मरेन शिवप्रेमी असा "दुर्गवीर" मी

धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)