शेवटचे पान....


शेवटचे पान....
शेवटचे पान....
वहितिल सर्वात महत्वाचे पान,
यालाच मिळते हक्काचे मान पान,
उगवातो विचार मनात,
तो उमटतो शेवटच्या पानात......

तेच ते शेवटचे पान......
शोधून सापडनार नाही असे हक्काचे ठिकान,
साधे दिसुनही असते मोत्याची खाण,
किती विचार केला मनात,
लगेच उतरे या पानात..

तेच ते शेवटचे पान......
मन झेलते किती मान अपमान,
सगळे अनुभवते हे शेवटचे पान,
सहजरीत्या खोटे बोलते हे मन,
पण चुकुनही निघणार नाही खोटे हे पान....

तेच ते शेवटचे पान......
कोणाचा झाला जर प्रेमभंग,
बाहेरून गायले जरी श्लोक अभंग,
दाखविला नाही बाहेरून संबंध,
पण शेवटच्या पानात येतो प्रेमाचा सुगंध......

तेच ते शेवटचे पान......
वहिसारखे असते जीवनाचे शेवटचे पान,
खुप काही बोलते जरी नसली जबान,
तन मन नसले जरी जवान,
तरी साथ देते हे शेवटचे पान...

तेच ते शेवटचे पान......
तरुणपण जाते जेव्हा संपून,
म्हातारपन येते जेव्हा सरून,
नाही ठेवले असता काही देऊन घेउन,
अलगदच जे जाते उलगडून.....

तेच ते शेवटचे पान......
जेव्हा सावरू शकत नाही जिवानाची कमान,
डगमगू लागते हे शेवटचे पान,
जरी फाडून दिले हे पान,
तरी याची जागा घेते अगोदरचे पान....
तेच ते शेवटचे पान......

धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

"दुर्गवीर" मी