"तू" आणि "तो"


"तू" आणि "तो"

तुझ्या आकाशरुपी जीवनात,
"तो" ढगासारखा येउन गेला,
"तू" हरवलिस "ज्या" च्या सुगंधात,
"त्या" च्या येण्याचा कधी अर्थ जाणला?????

आजची तुमची प्रेमकळी,
फुलेल ती एका गोड सकाळी,
फुलान्यास ही गोड कळी,
जावी लागेल रात्र काळी!!!!

आज तुझे जे मन जाळी,
तेच लिहिले असावे तुझ्या भाळी,
तुझ्या आठवणी ठेव जवळी,
एक दिवस याच हलवतिल तुझ्या गालखळी!!!!!

तुझ्या आयुष्याच्या वाटेवर,
तू फक्त "त्या" ची वाट पाहिलिस,
"त्या" चे आयुष्य असेल कोणत्या काटयावर,
याची कधी चाचपड़नी केलीस!!!!!

"त्या" च्या एका पावलावर,
तू एकच पाउल ठेऊ नकोस,
दडपण जरी असले मनावर,
तरी मनामध्ये काही ठेऊ नकोस!!!!

प्रेम कर तू त्याच्यावर,
पण मनापासून मनावर,
विश्वास ठेव तुझ्या प्रेमावर,
जसा गुलाबचा काटयावर!!!!!!

जशी पावसाची ओढ़ चातकाला,
जशी लाटाची ओढ़ किनारयाला,
तशी प्रेमाची ओढ़ तुमच्या मनाला,
ना उमजनार ते सहजा सहजी कुणाला!!!!

त्याच्या मदतीने मिळते तुझ्या जीवनाला दिशा,
हीच असावी खरया प्रेमाची नशा,
तूच ठरव तुझ्या प्रेमाची दिशा,
सहजच संपेल ही काळ निशा,

प्रेमात त्याच्या जीव देण्याचा,
विचार सुद्धा करू नकोस,
तो सहजा सहजी तुला विसरन्याचा
किंचित आशावादही ठेऊ नकोस

अर्थ नाही मन गुंतवन्यात,
जर त्याच्या नसेल काही मनात
असेल ताकद जर तुझ्या प्रेमात,
तो चुकुनही गुंतनार नाही दुसरया कुणात

जीवनाच्या वाटेवर,
प्रेमाची त्याला हाक दे,
लगेचच त्याने ओ दिली,
तर निसंकोच त्याला साथ दे

गुंतताना प्रेमात त्याच्या,
विसरु नकोस मायबापांसी,
अडकताना बंधनात प्रेमाच्या,
बांधील रहा कुटुन्बाशी

"त्या"च्या साठी जीव देताना,
तुझ्या जीवाची पारख कर,
तुझ्या जीवणावर अवलंबून असणारया,
"त्या" दोन जिवांची काळजी कर

"प्रेमाच्या" या रोपटयाला,
"मैत्रीच" पाणी दे,
"विश्वासाच" ख़त दे,
तरच हे रोपट खुलून दिसेल

चांदणे जरी मोहक दिसले,
तरी सूर्य उगवायचा थान्बत नाही,
प्रेम जरी गोड वाटले
तरी जबाबदारिचा ओघ थान्बत नाही

प्रेमाच्या या रानावनात,
'वनवासी' तु होऊ नकोस,
मनातल्या भावना मनात ठेउन,
'त्याच्या' भावनांचा अनादर करू नकोस

ओठावर जे येते,
ते मनात दाबून ठेऊ नकोस,
कगदावरती प्रेम काव्य करण्यात,
जीवन व्यर्थ घालवू नकोस

धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke
http://dhiruloke.blogspot.in/
http://dhirajloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….