खरच...... जमेल का मला?


खरच...... जमेल का मला?

जुन्या वाईट आठवणी विसरून,
पुन्हा नव्या उमेदीने जगण,
पूर्वायूष्याच्या  विश्वासघाताला विसरुन,
रागाला आवरण...
खरच...... जमेल का मला 

पहिल्या प्रेमात फसलो म्हणुन,
मैत्रिकडे संशयाने न पाहाणे,
खरच कुणाची तरी निस्वार्थी मैत्री,
त्याचा स्वार्थ म्हणुन न पाहाणे,
खरच...... जमेल का मला 

जबाबदारीमूळे प्रेमात फसण,
अनं त्या प्रेमात फसन्याने,
स्वताला जबाबदारित गुंतवण, 
आता तरी या चक्राला थांबवन,
खरच...... जमेल का मला 

आठवन येते पहिल्या प्रेमाची,
आशा आहे "ती" परतण्याची,
राखून ठेवलीय मी जागा तिची,
सहजा सहजी ना होणार ती "जागा" दुस-या कुणाची,
खरच...... जमेल का मला

रात्री अपरात्री "ती"ला आठवण,
प्रत्येक मुलीत "ती" ला शोधण,
भले ती कुठेतरी कमी पडण,
पण निदान तिला ख-या मैत्रीत टिकवण,
खरच...... जमेल का मला
धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

"दुर्गवीर" मी