Saturday, 31 December 2016

विशाखा विश्वनाथएक विश्वनाथ आनंद आणि दुसरी विशाखा विश्वनाथ या दोघांचा जन्मदिन एकत्रच. एक बुद्धीबळातील “चाली” करतो तर दुसरी लिखाणातल्या. वयाच्या मानाने जरा जास्तच प्रगल्भता आलेले हे दोघेही. मला बुद्धीबळ तस फारस जमलच नाहि तस कधी कधी विशाखा ताईंचे चे मेसेजही झेपत नाही, कदाचित मला तितक प्रगल्भ व्हायला वेळ लागेल.

तेव्हा विश्वनाथ आनंद जसा बुद्धीबळातील क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे त्याचप्रमाणे तुमची लेखणीही उत्तरोत्तर यशस्वी वाटचाल करो ही सदिच्छा

तळटीप:- हे विशाखा नावापुढे “विश्वनाथ” हे नाव लावलय ते “विश्वनाथ आनंद” चा फॅन म्हणुन लावलय की काय? असा बाळबोध प्रश्न मला पडलाय 😀

वापरणं आणि उपयोगी पडणं

तुम्हाला वापरणं,
तुम्ही उपयोगी पडणं
दोन्ही एकच फक्त दृष्टिकोन वेगवेगळा


FOLLOW

तुम्ही कुणाला FOLLOW करता यापेक्षा किती FOLLOW करता याला महत्व आहे


गैरसमज आणि समजून घेणं म्हणजे काय ??

"मनातून" "गैर" झाल्यावर होतो "गैरसमज"
"मनं" "सम" असल्यावर "समजून" घेतात

अच्छी" "बुराई" आणि “बुरी" "अच्छाई"

“अच्छी" "बुराई" से नहीं 
“बुरी" "अच्छाई" से डर लगता है साहब….


आयुष्याचे बुद्धिबळ

समोरच्या नंतर तुमची "चाल" हा "आयुष्याच्या बुद्धिबळाचा" अलिखीत नियमच आहे


कपाळमोक्ष

मुंब्रा स्थानकात एक २२-२४ वयाचा चा एक तरुण चढला

गोवा-गुटखा सारख काहितरी खावुन कागद ट्रेन मध्येच टाकला...

मी तोच कागद उचलुन त्याच्या हातात दिला. त्याच्या कानात हेडफोन होते त्यामुळे बोलण्यात अर्थ नव्हता...

त्याने माझ्याकडे “येडा हाय का हा” असा "लुक" दिला आणि पुन्हा तो कागद ट्रेन मध्येच टाकला

पुन्हा मी तो उचलुन त्याच्या हातात दिला आता काहितरी बोलायला हव म्हणुन बोललो “हा डस्टबिन नाहिय मित्रा”
यावेळी एकतर त्याला “मी समजलो नाहि” किंवा “माझी भाषा समजली नाहि”......... त्याने तो "कागद" चालत्या ट्रेन मधुन बाहेर फेकला
आणि
“दगडावर” डोक आपटल्यावर कसा “कपाळमोक्ष” होतो याचा "जिवंत अनुभव" मला आला

"कल्पना" उर्फ "कल्पू"


"धीरु" + "सर" ही विरुद्धार्थी आणि दुर्मिळ "विशेषण" वापरून हाक मारणारी "कल्पना" उर्फ "कल्पू" मोकळं व्यक्तिमत्व. "जे" आहे "ते" समोर..... "आत" एक "बाहेर" एक असं अजिबात नाही. कित्येकदा वाटत ही मुलगी सकाळी हसते, दुपारी हसते, संध्याकाळी हसते ही काय एकटीच "दात घासते" :P :P पण विनोदाचा भाग वगळता असंच आयुष्यभर हसत रहा. उगाच विचार करून मेंदूची "शकलं" पाडायची काम आम्ही करतो उगाच "ते" करून तुझं "हसू" आटवू नकोस.
लोहगड वरील माझे अंतरंग चा लेख वाचून दुर्गवीर संपर्कात आलेल्या या मुलीचे नेहमी इतिहासापासून अगदी वर्तमानापर्यंत सर्व प्रश्न असतात ! "धीरु सर" "इतिहासात ही लढाई कुठे झाली??" इथपासुन "तुम्ही एवढे शांत का राहता?" अशा हिच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी न "रागावता" दिलीत...माझ्या ७ वर्षाच्या शिक्षकाच्या कारकिर्दीत मी ओरडलो नाही असा एकही विद्यार्थी आढळणार नाही हे रोख रु.१०००/- नवीन करकरीत नोटेच्या पैजेवर सांगू शकतो !! माझ्या शाळेची किंवा क्लासची विद्यार्थिनी नसूनही मी हिचा "सर" हे विशेष. हीच लिखान झालं कि "धीरु सर हे बरोबर आहे का?" हा प्रश्न येतोच??? पण खरच अभिमान वाटावा अशी "विद्यार्थिनी". पहिल्या काही दिवसात हि सारखा उल्लेख करायची "मी धीरु सरांमुळे दुर्गवीर मध्ये आली" वगैरे वगैरे पण तिच्या "मेहनतीचे" श्रेय "सतत" मला देणं मला आवडत नाही म्हटल्यावर तिने तस बोलणं थांबवलं. आज दुर्गवीर मध्ये एक वर्षात हिने स्वताची अशी ओळख निर्माण केलीय. छोटं छोटं लिखान अगदी http://kalpuuvach.blogspot.in/ या ब्लॉग पर्यंत गेलं. खूप कमी वयात आलेला "समंजसपणा" आणि काहीही झाले तरी टिकवून ठेवलेला "खेळकरपणा" असाच कायम राहो हि ईश्वरचरणी प्रार्थना..... आणि जन्मदिनाच्या तुझ्या प्रश्नांइतक्या "अगणित" शुभेच्छा.....
असंच आयुष्यभर हसत रहा, लिहीत रहा, आणि धीरु सरांना "पार्टी" देत राहा.
जाहिर प्रकटन:- खर तर तुझ्यासोबतचा एखादा सेल्फिच टाकणार होतो पण असा फोटो आपण कधी काढलाच नाहि आणि काढलेला फोटो कधी पोस्ट करु नये अशी “ताकीद” "मी" दिल्यामुळे कदाचित तो अडगळीत पडला असेल.
टीप :- फोटो वरून तुला "सेल्फी क्वीन" का म्हणतात हे स्पष्ट होईलच... :P :P
पुनच्छ प्रकटदिनाच्या शुभेच्छा...... :D :

Dनात्यांचा हिशेब मांडला की बाकी “शुन्य”च राहते.

नात्यांचा हिशेब मांडला की बाकी “शुन्य”च राहते.


मालवणी_खरीखुरी_गजालीस्थळ:- कोकण रेल्वे

सिट क्र. ७८ = मी

सिट क्र. ७९ रिकामी (?)


सिट क्र. ८० एक "अनोळखी मुलगी"

सिट क्र. ८०: - (सिट क्र. ७८ ला उद्देशुन) माझी बॅग वरुन काढुन देता का? जरा जड आहे.

सिट क्र. ७८ बॅग काढुन देतो... बॅगच वज़न ७-८ किलो. सिट क्र. ८० बॅगेतली वस्तु काढुन घेते

सिट क्र. ८०: - (सिट क्र. ७८ ला उद्देशुन) बॅग परत वरती ठेवाल का ??

सिट क्र.७८ बॅग उचलुन ठेवतो.

सिट क्र. ७८ ची मागची दुसरी "अनोळखी मुलगी" सिट क्र ८६ सर्व निट पाहतेय आणि साधारण अर्ध्या तासानंतर (सिट क्र. ७८ ला उद्देशुन) प्लिज जरा बॅग काढुन द्याल का ?

सिट क्र. ७८ शांतपणे बॅग काढुन देतो बॅगच च वज़न साधारण १०-१५ किलो !!
.
.
.
.
.
आता सिट क्र. ९२(अजून एक "अनोळखी मुलगी") ने मोठ्या अपेक्षेने "माझ्याकडे"(सीट क्र.७८) पाहिल मी शांतपणे ट्रेन च्या वरती "रॅक" कडे पाहिल “सर्वात मोठी गोणी” कोणती दिसतेय ???
आणि ती खाली उतरावयची “मानसिकता” तयार केली.   

"लाटांना" आणि "संकटांना" "भिडण्यातच" मजा असते"लाटांना" आणि "संकटांना" "भिडण्यातच" मजा असतेSaturday, 10 December 2016

चक्रव्युहातला अभिमन्यु
चक्रव्युहातला अभिमन्यु

पैसा नाही म्हणुन शिक्षण नाही आणि शिक्षण नाही म्हणुन पैसा नाही या दृष्टचक्रात अडकलेले हे लोक पाहिले की आठवण येते ती महाभारतातल्या "अभिमन्युची" ज्याला चक्रव्युहात कस शिरायच ते माहित होत पण त्यातुन बाहेर कस पडायच हे माहित नव्हत. तसच "आयुष्याच्या चक्रव्युहात" घुसणा-या या "अभिमन्युरुपी लोकांना" आपला अंत माहित असताना आयुष्याच्या चक्रव्यूहात घुसल्यावर फक्त काही काळ लढत "मरण पुढे ढकलताना" पाहुन मन सुन्न होत

दगडांतल काम करणा-यांच्या आयुष्यात शेवटि दगड यावेत यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणत. अगदि हेच “दगडांतल आयुष्य” जगणा-यांना आम्ही पाहिल “लातुर” जिल्ह्यातील निलंगे तालुक्यातील पारधी आणि वडार समाजाच्या पाड्यात. एक उच्चभ्रु समाज जाणीवपुर्वक यांना दुर्लक्षीत करतो आणि आपण दुर्लक्षीतच करायच्या पात्रतेचे आहोत असा "न्युनगंड" घेवुन जगतात हे लोक.

या "अभिमन्युंना" आज या "आयुष्याच्या चक्रव्यूहात" किती काळ "मरण ढकलता" येईल यासाठी सहकार्य करण्यापेक्षा हे "चक्रव्यूह तोडुन" नव्या उमेदिने "आयुष्य जगण्याची कला" शिकविण्याची गरज आहे

या लोकांना सहानभुती म्हणुन मदत करुन यांना उपकारांच्या ओझ्याखाली ठेवण्यापेक्षा त्यांना “स्वावलंबी” होण्याच्या दृष्टिने साथ द्यायला हवी. आज या भागातील मुलांना "शिक्षण" देण्याची आवश्यकता आहे. या मुलांना केलेली शैक्षणिक मदत त्यांच भविष्य सुधारायला मदत करेल. महिला बचतगट सारखे अनेक उपक्रम इथे राबविले जातात परंतु यांना शिवणकामासाठी लागणा-या "मशीन" ची कमतरता असते ती पुर्ण करुन त्यांना स्वावलंबी करण्यात सहकार्य करायला हवे. आज यांनी विणकामातुन केलेल्या वस्तुंना "बाजारपेठ व ग्राहक" मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आणि हे सर्व शक्य होईल लोकसहभाग व सहकार्यातुन.

या लेखाच्या माध्यमातुन आपणांस आवाहन करतो की, दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे या भागातील १५० शालेय मुलांना "शालेय गणवेश", गृहिणींना "शिलाई मशिन" आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तुंना शहरातील "ग्राहक व बाजारपेठ" उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. तुम्ही किमान एका गणवेश किंवा शिलाई मशीनसाठी सहकार्य करु शकल्यास एक कुटुंब स्वावलंबी होण्याच्या दृष्टिने महत्वाचे पाऊल पडु शकेल. आपण सर्वच इंटरनेट च्या माध्यमातुन यांनी तयार केलेल्या वस्तुंना ग्राहक निर्माण करुन देवु शकतो.

चला तर या "चक्रव्युहातील" अभिमन्यूला "चक्रव्यूह तोडायला" मदत करूया....

मदतीसाठी संपर्क :-

9833458151 / 8097519700 / 8655823748
Website:- www.durgveer.comनोंदणी क्रमाक: जि.बी.बी एस.डी.१६१३/२०१०
धोभी घाट, वाकोला ब्रिज,
सांताक्रुज (पू) मुंबई ४०००५५.


दुर्गवीर प्रतिष्ठान बँक खात्याची सपुंर्ण माहिती :-

Account Name:-Durgveer Pratishthan
Bank Name:-Bank of Baroda
Account No:-04060100032343
IFSC Code:-BARB0CHANDA * (Fifth character is zero)
Account Saving:-Saving
Branch Name:-Chandavarkar Road, Matunga, Mumbai.

#JoyOfHappiness अंतर्गत आणि दुर्गवीर प्रतिष्ठान च्या माध्यमातून केलेल्या वॉटर फिल्टर वाटप व शालेय वस्तू वाटपाची छायचित्रे या लिंक वर पाहू शकता :-   https://www.facebook.com/pg/Durgaveer.warasGadDurganch/photos/?tab=album&album_id=1246856455360029

Thursday, 1 December 2016

नियम

माझे "नियम" "तुमच्यासाठी" नाहीत...
कि तुम्ही "माझ्याशी" कसं वागावं ??
ते "माझ्यासाठी" आहेत.....
की मी "तुमच्याशी" कसं वागावं


गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...