"कल्पना" उर्फ "कल्पू"
"धीरु" + "सर" ही विरुद्धार्थी आणि दुर्मिळ "विशेषण" वापरून हाक मारणारी "कल्पना" उर्फ "कल्पू" मोकळं व्यक्तिमत्व. "जे" आहे "ते" समोर..... "आत" एक "बाहेर" एक असं अजिबात नाही. कित्येकदा वाटत ही मुलगी सकाळी हसते, दुपारी हसते, संध्याकाळी हसते ही काय एकटीच "दात घासते"


लोहगड वरील माझे अंतरंग चा लेख वाचून दुर्गवीर संपर्कात आलेल्या या मुलीचे नेहमी इतिहासापासून अगदी वर्तमानापर्यंत सर्व प्रश्न असतात ! "धीरु सर" "इतिहासात ही लढाई कुठे झाली??" इथपासुन "तुम्ही एवढे शांत का राहता?" अशा हिच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी न "रागावता" दिलीत...माझ्या ७ वर्षाच्या शिक्षकाच्या कारकिर्दीत मी ओरडलो नाही असा एकही विद्यार्थी आढळणार नाही हे रोख रु.१०००/- नवीन करकरीत नोटेच्या पैजेवर सांगू शकतो !! माझ्या शाळेची किंवा क्लासची विद्यार्थिनी नसूनही मी हिचा "सर" हे विशेष. हीच लिखान झालं कि "धीरु सर हे बरोबर आहे का?" हा प्रश्न येतोच??? पण खरच अभिमान वाटावा अशी "विद्यार्थिनी". पहिल्या काही दिवसात हि सारखा उल्लेख करायची "मी धीरु सरांमुळे दुर्गवीर मध्ये आली" वगैरे वगैरे पण तिच्या "मेहनतीचे" श्रेय "सतत" मला देणं मला आवडत नाही म्हटल्यावर तिने तस बोलणं थांबवलं. आज दुर्गवीर मध्ये एक वर्षात हिने स्वताची अशी ओळख निर्माण केलीय. छोटं छोटं लिखान अगदी http://kalpuuvach.blogspot.in/ या ब्लॉग पर्यंत गेलं. खूप कमी वयात आलेला "समंजसपणा" आणि काहीही झाले तरी टिकवून ठेवलेला "खेळकरपणा" असाच कायम राहो हि ईश्वरचरणी प्रार्थना..... आणि जन्मदिनाच्या तुझ्या प्रश्नांइतक्या "अगणित" शुभेच्छा.....
असंच आयुष्यभर हसत रहा, लिहीत रहा, आणि धीरु सरांना "पार्टी" देत राहा.
जाहिर प्रकटन:- खर तर तुझ्यासोबतचा एखादा सेल्फिच टाकणार होतो पण असा फोटो आपण कधी काढलाच नाहि आणि काढलेला फोटो कधी पोस्ट करु नये अशी “ताकीद” "मी" दिल्यामुळे कदाचित तो अडगळीत पडला असेल.
टीप :- फोटो वरून तुला "सेल्फी क्वीन" का म्हणतात हे स्पष्ट होईलच...
:P
:P
पुनच्छ प्रकटदिनाच्या शुभेच्छा......
:D
:


पुनच्छ प्रकटदिनाच्या शुभेच्छा......


D
Comments
Post a Comment