Wednesday, 31 December 2014

हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- कलिंग (ओरिसा ) चा "सम्राट खारवेल"


हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- कलिंग (ओरिसा ) चा "सम्राट खारवेल"

सम्राट अशोकाच्या मृत्युनंतर दहा एक वर्षात अशोक वंशीयांचे आधिपत्य नाकारुन स्वताचे राज्य स्थापणा-या दाक्षिणात्य राज्यातील आंध्र व ओरिसा(कलिंग) राज्यांपैकि कलिंग चा राजा म्हणजे सम्राट खारवेल. डेमेट्रियस (ग्रिक)सैन्याचा संपूर्ण हिंदुस्थानात कोणीहि प्रतिकार करत नसताना राजा खारवेलने शस्त्रसज्ज सैन्यासह अयोध्ये च्या आसपास च्या परिसरात आक्रमण करुन हिंदुस्थानच्या पर्वत सिमेपार पाठविले. कलिंगात या विजयाप्रित्यर्थ राजसुय यज्ञाचे आयोजन करण्यात आले ४०-५०वर्षातला तो सर्वात मोठा यज्ञ समजला जातो. संपूर्ण हिंदुस्थानात निशस्त्रीकरणाचे वारे वाहत असताना क्षात्रतेज जागविणारा राजा म्हणुन खारवेल चा उल्लेख करायला हवा. खारवेल चे डेमेट्रियस ग्रिकांवरील आक्रमण ही क्रांति होती ज्याच्या बळावर पुढे मिन्यांडर ग्रिकांवर आक्रमण करुन त्यांना हिंदुस्थानबाहेर हाकलुन लावण्यासाठि व हिंदुस्थानातुन ग्रिकांचे नामोनिशान मिटवुन टाकण्यास उपयुक्त ठरली.


माहिती स्त्रोत :- सहा सोनेरी पाने - स्वातंत्रवीर सावरकर
छायचित्र स्त्रोत :- Internet

Saturday, 27 December 2014

Tuesday, 23 December 2014

हिंदुस्थानातच्या इतिहासातील राजे :- सम्राट बिंदुसार


हिंदुस्थानातच्या इतिहासातील राजे :- सम्राट बिंदुसार
"सम्राट चंद्रगुप्त" व "ग्रीक राजा सेल्युकस" ची राजकन्या यांचा विवाह झाला व त्यांचाच पुत्र "बिंदुसार". ई.स.पू. २९८ ला "चंद्रगुप्त" मरण पावला व "बिंदुसार" त्या गादीवर बसला. "बिंदूसार" हा पित्याप्रमाणे महाराक्रमी होता. त्याने "चंद्र्गुप्ताचे" अखंड हिंदुस्थान चे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने घोडदौड सुरु केली होती. उत्तर हिंदुस्थानात आपले एकछत्री अंमल प्रस्थापित केल्यावर त्याने दक्षिण स्वारी केली आणि तिथेही आपले राज्य प्रस्थापित केले. त्याच्या पराक्रमाने त्याचे शत्रू त्याच्या विरोधात उभे राहत नव्हते. त्याच्या याच पराक्रमाने त्याला "अमित्रघात" म्हणजेच "शत्रूंचा कर्दनकाळ" हि पदवी मिळाली होती. त्याने उत्तर - दक्षिण - पूर्व - पश्चिम अश्या संपूर्ण हिंदुस्थानात आपले एकछत्री अंमल प्रस्थापित केले होते. पूर्व नि पश्चिम समुद्राच्या मध्यांतरीच्या तब्बल १७ राजधान्या "मौर्य साम्राज्यात" सामील करून घेतल्या असा उल्लेख ग्रंथातून आढळतो. "सम्राट बिंदुसारने" आपले ;सैन्यबळ इतके वाढविले होते कि त्या काळी संपूर्ण विश्वात प्रबळ सैन्य असणारे राष्ट्र होते "हिंदुस्थान"….

"चाणक्य" च्या प्रबळ बुद्धी च्या जोरावर व चंद्रगुप्ता अतुलनीय शौर्याच्या बळावर उभे केलेले अखंड भारताचे "शिवधनुष्य" बिंदुसार ने लीलया पेलेले होते किंबहुना अल्पायुष्यामूळे अर्धवट राहिले पित्याचे स्वप्न "बिंदुसार" ने शतश: पूर्ण केले होते.प्रथम चंद्गुप्ताचा पायाभरणी आणि त्यावर बिंदुसारने ने उभारलेला कळस यामुळे जे "हिंदुस्थान" एक प्रबळ राज्य म्हणून उदयास आले होते त्याही दहशत इतकी होती कि चंद्रगुप्त, बिंदुसार आणि सम्राट अशोक यांच्या मृत्युनंतर काही काळ म्हणजे अंदाजे १०० वर्षे तरी कुणी परकीय आक्रमक हिंदुस्थानावर आक्रमण करण्याची हिम्मत करू शकले नाहीत.
असा हा महान राजा ई.स.पु. २७३ साली वारला आणि एका तेजपुंज राजा पित्याचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत झटला…

माहिती स्त्रोत :- सहा सोनेरी पाने - स्वातंत्रवीर सावरकर

Saturday, 20 December 2014

संवत् / संवस्तर / शक म्हणजे काय?


संवत् / संवस्तर / शक म्हणजे काय?

आपण आपले मराठी कॅलेंडर निट पाहिले तर "शालीवाहन शके 1936" किंवा "विक्रम संवत् 2071" वगैरे दिसेल हे नक्की काय असते आणि याची उत्पत्ती कुठून झाली हे आपणांस कदाचीत माहीत नसेल. यावर्षीच - 2014च कॅलेंडर निट पाहिले तर लक्षात येते की, "गुढिपाडवा" "31 मार्च 2014" रोजी "शालीवाहन शके 1936 प्रारंभ" असे आहे. "दिपावाली पाडवा" "24 ऑक्टोबर 2014" रोजी "विक्रम संवत् 2071 प्रारंभ" असे आहे. म्हणजे "शालिवाहन शक" "येशु ख्रिस्त" च्या नंतर सुरू झाले व "विक्रम संवत्" हे "येशु ख्रिस्ताच्या" अगोदर सुरू झाले.

संवत् / सवस्तर / शक म्हणजे एखाद्या राजाने त्याने केलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून त्या दिवासापासुन नविन वर्ष सुरू करणे. प्रथम "शक" हा शब्द "संवत् / संवस्तर" यासाठी पर्यायी "परकिय शब्द" आहे. इतिहासात उपलब्ध नोंदिनुसार आजवर टिकलेले काहि संवत् उपलब्ध आहेत :-

1. कृत किंवा मालव 2. विक्रम 3. शालिवाहन

> ई.स. पूर्व 57 च्या आसपास मालवांनी परकिय शकराजा "नहपानचा" पराभव केला, तेव्हा "मालवगणांनी" "शक" सुरू केला तो "कृत" होय.

> "मालव संवत" पुढे "उज्जइनिच्या" "विक्रम" राजाच्या विजयाप्रित्यर्थ "विक्रम संवत्" म्हणून प्रसिध्द झाला असे काही इतिहासकारांचे मत आहे.

> काहि इतिहासकारांच्या मते "मालव संवत" हा सुरूवातीपासुन "विक्रम(विजयाचा) संवत्" होता.

> काहि इतिहासकारांच्या मते "विक्रम संवत्" चा संबंध "मालवगण" संवत्‌शी नाहि. परकिय शकांचा राजा "ओझोझ" ने ई.स.पु. 58 ला एक "शक" सुरू केले ते विक्रमाच्या विजयानंतर ते "विक्रम संवत्" म्हणून प्रचलीत झाले.

> काहि इतिहासकारांच्या मते ई.स.पु. 58 ला "विक्रम" अगोदरपासुन राज्य करत होता त्याने त्यानंतर "कुशाण-शकांवर" विजय मिळवीला म्हणून "विक्रम संवत्" सुरू केला त्याचा "मालवांशी" किंवा "ओझोझ" शी काहिहि संबंध नाही.

> यापैकि कोणत्याही मतास कोणताही ठोस पुरावा अजुनही उपलब्ध नाहि.

> "शालिवाहन शक (संवत्)" याबाबतीतही अशी मतभिन्नता आहे.

> काहिंच्या मते कुशाणांचा पहिला राजा "क्याड्फोइसेस" ने इ.स. 78 मध्ये हा शक चालु केला तर..

> काहिंच्या मते ई.स. 78 मध्ये "क्याड्फोइसेस" नाही तर त्याचा पुढचा राजा "कनिष्क" याने त्याच्या राज्यरोहणाच्या स्मृतीप्रित्यर्थ हे शक चालु केले व पुढे "पैठणच्या शालिवाहकांनी" परकिय शकांवर विजय मिळवून त्याला "शालिवाहन शक" हे नाव दिले.

> काहिंच्या मते ई.स. 78 च आसपास शलिवाहनातील "गाथा शप्तशती" लिहीणाऱ्या "हाल" नावाच्या राजाने स्वत: गुजरात, सौराष्ट्रातील परकिय शकांवर विजय मिळविला त्याचे स्मारक म्हणून "शालिवाहल शक" सुरू केले.

> यातील सर्व मते विचारात घेतल्यावर एक बाब समोर येते ती म्हणजे कोणतेही मत ग्राह्य धरायचे तर ते वादादित ठरू शकते.

> यातुन एक मत स्पष्ट जाणवते की, "विक्रम संवत् (संवस्तर)" असो किंवा "शालिवाहन संवत्  (संवस्तर)" हे सर्व भारतीयांनी रणांगणात "शक-कुशाण" या "परकिय व क्रुर आक्रमकांवर" मिळविलल्या विजयाचे द्योतक आहे.

खास सुचना :- आपल्या मराठि कॅलेंडरमध्ये "शालिवाहन शक" असा शब्द असल्यास "शालिवाहन संवत्" किंवा "शालिवाहन संवस्तर" असा वाचावा कारण "शक" हा शब्द परकिय आक्रमकांसाठी वापरला गेला आहे.


माहिती स्त्रोत :- सहा सोनेरी पाने - स्वा. सावरकर

Tuesday, 16 December 2014

एक अतूट नाते :- शिवप्रेमींचे


तुम्ही एखादे चांगले कार्य करता तेव्हा तुमच्या सोबत येणारी माणसे हि चांगलीच असतात, त्यांचा तुमच्यासोबत येण्याचा उद्देशहि स्वच्छ असतो. याचाच प्रत्यय आज "दुर्गवीर" च्या शस्त्र प्रदर्शन व गडसंवर्धन छायचित्र प्रदर्शनात आला. "दुर्गवीर" च्या कार्याने प्रभावित होऊन पंजाब बॉर्डर वरून शिर्डी आणि शिर्डी वरून मुंबई असा प्रवास करून आलेल्या "सोमनाथ ढवळे" यांची भेट घेताना जाणीव झाली आम्ही काय कमावलाय. फेसबुक वरून माझे दुर्गवीर श्रमदानाचे फोटो पाहून दुर्गवीर बद्दल त्यांना आदर निर्माण झाला आणि त्यांच्या १० दिवसाच्या सुट्टीचा पहिला दिवस दुर्गवीरांसोबत घालविण्यासाठी "सोमनाथ ढवळे" मुंबईत हजर झाले. मुंबईतील काहीही माहिती नाही. दादर ला उतरल्यावर त्यांनी चौकशी केली तर त्यांना कोणी सांगितले काळाचौकी ३ ठिकाणी आहे परंतु शिवकृपेने एका व्यक्तीने त्यांना Taxi करून प्रदर्शनाच्या जागी आणून सोडले.
ह्या घटनेतून एक मात्र नक्की माझी आणि त्यांची ओळख,व "त्या "अनोळखी व्यक्तीने" त्यांना मुंबईत मदत करण, आणि दुर्गवीरांची भेट हे सर्व विधिलिखित होत. या सर्व भेटी शिवरायांनीच घडवून आणल्या. आज जरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जन्मलो असू पण गतजन्मी नक्कीच आम्ही सर्व मावळे होतो.

मी सुट्टी मिळाली कि दुर्गवीर सोबत जातो त्यामुळे माझे नातेवाईक, मित्र मंडळी कदाचित दुखावत असतील कारण मी त्यांच्याकडे जात नाही, त्यांना वेळ देत नाही. परंतु दुर्गवीर च्या कार्यामुळे "सोमनाथ ढवळे" यांच्या सारख्या शिवप्रेमींशी जे अतूट नात निर्माण होत आहे आणि समाजात आम्हा दुर्गवीरां बद्दल जो आदर आहे तो पाहून त्यांचा राग थोडा तरी कमी होत असेल.

दुर्गवीर च्या कार्यामुळे मला लिखाण करायची प्रेरणा मिळाली आणि
माझे अंतरंग हे पेज http://dhiruloke.blogspot.in/ ह्या ब्लॉग च्या माध्यमातून लिखाण करायला लागलो आणि त्यामुळे आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेरील, देश आणि देशाबाहेरील वाचक निर्माण झाले. हे वाचक जेव्हा प्रतिक्रिया देतात तेव्हा प्रत्येक वेळी मला "पुरस्कार" मिळत असतो आणि हा "पुरस्कार" मला लिखाणासाठी आणि दुर्गवीर च्या गडसंवर्धनाच्या कार्यासाठी नवीन प्रेरणा देत असतो.

ह्या प्रसंगातून आनंद तर मिळतो आणि सोबत जाणीव होते जबाबदारीची या कार्यातून ज्या ओळखी झाल्या आहेत त्या जपणे आणि हे कार्य निरंतर चालू ठेवणे हे माझे आणि प्रत्येक दुर्गवीराचे हे कर्तव्य आहे.
जय शिवराय !!

Monday, 15 December 2014

"शिवराय" म्हणजेच "गडकिल्ले" आणि "गडकिल्ले" म्हणजेच "स्वराज्य" !!!काय। करतोय "हा" "दादा" !! असाच प्रश्न या मुलाला पडला !! वेळ होती दुर्गवीर च्या गडसंवर्धन छायचित्र प्रदर्शनाची..... या मुलाला "गडसंवर्धन" हा शब्द सुद्धा निट बोलता येत नव्हता त्याला जेव्हा विचारलं हे शिवाजी महाराज कोण होते? आणि हे गड-किल्ले म्हणजे काय रे!! तेव्हा त्याचे उत्तर मोठमोठ्यांना अव्वाक करुन जाते!! "शिवाजी महाराज हे मोठे राजे होते आणि त्यांनी तलवारीने मोठमोठ्या लढाया केल्या!! आणि या किल्ल्यांवर ते राहिले".....

शिवरायांनी स्वतासाठि राजवाडे नाहि बांधले तर आयुष्यभर या गड-किल्ल्यांच्या साथीने  ते  लढले... जे या निरागस मुलाला समजलं ते आपल्यालाहि समजायला हवं... शिवराय म्हणजेच गडकिल्ले आणि गडकिल्ले म्हणजेच आपले स्वराज्य !!!
जय शिवराय
छायचित्र सौजन्य "दुर्गवीर सचिन रेडेकर"
www.durgveer.com

Saturday, 6 December 2014

"अलेक्झांडर" आणि "चंद्रगुप्त"


"अलेक्झांडर" आणि "चंद्रगुप्त"
"अलेक्झांडर" हा ग्रिकांचा महान राजा ज्याला त्याच्या पित्याकडुन (राजा फिलिप) 'प्रचंड पैसा व सैन्य बळ' मिळाले त्याच्या बळावर तो ग्रिक मधील सर्व छोट्या मोठ्या गणराज्यांना गिळंकृत करत आला. परंतु "हिन्दुस्तानी" जनतेने त्याच "स्वामित्व" कधीच मानले नाहि उलट तो जो प्रदेश जिंकुन पुढे जायचा तिथली जनता त्याची पाठ फिरताच दंड ठोकुन उभे राहायचे जेव्हा त्याला जाणवलं आपला येथे निभाव लागण अशक्य आहे तेव्हा त्याने परतायचा निर्णय घेतला परंतु जाता जाता त्याची महत्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसु देत नव्हती व तो सैन्याच्या मनाविरुध्द लढाया लढत होता...परंतु पाश्चात्य लेखक अलेक्झांडर च वर्णन करताना त्याला "जिंकायला प्रदेश न उरल्याने हताश होऊन परत गेला" असं करतात हे खुपच अतिशयोक्तिपूर्ण आहे.

दुस-या बाजुला "चंद्रगुप्त राजा" जो अलेक्झांडर च्या स्वारि अगोदरपासुन "अखंड हिंदुस्थान" चे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठि धडपडत होता त्याचा इतिहास जाणुनबुजून दडपला जातो. जेव्हा "चंद्रगुप्त" "अखंड हिंदुस्थान" स्वप्न पाहत होता त्याच्याकडचे सैन्यबळ होते "शुन्य" आणि जेव्हा "अखंड भारताचे राज्य" उभारले तेव्हा ते होते तब्बल :-
>सहा लक्ष पायदळ
>तीन सहस्त्र घोडेस्वार
>दोन सहस्त्र लढाउ हत्ती
> चार सहस्त्र रथ
स्वताच्या पित्याने राज्यातुन बाहेर काढले होते…. पाठिशी फक्त एकच आधार होता "चाणक्य"... अलेक्झांडरच्या मृत्युनंतर अवघ्या दोन वर्षात "राजा चंद्रगुप्तने" उभारलेल्या अखंड "भारतवर्षावर" आक्रमण करण्याची हिम्मत पुढिल हजारो वर्ष कुणी केली नाहि... याउलट "अलेक्झांडर" च्या मृत्युनंतर "हिंदुस्थानावर" आक्रमण करायला आलेले "अलेक्झांडर" वारसदार "होत - नव्हत" राज्यही गमावून बसले.  

तसे या महान योद्ध्यांची तुलना करणे योग्य नाही. परंतु एक गोष्ट मात्र नमूद करावीशी वाटते की सिकंदर नक्किच एक चांगला योध्दा होता पण तो जगज्जेता नव्हता याउलट दासि चा पुत्र म्हणुन हिनवला गेलेला चंद्रगुप्त व त्याचा गुरु चाणक्य किती दुरदर्षी व महत्वाकांक्षी होता हे मात्र खर

माहिती स्त्रोत:- सहा सोनेरी पाने -स्वातंत्र्यवीर सावरकर

Wednesday, 3 December 2014

"जगण्यासाठी झटण्यापेक्षा… झटण्यासाठी जगून पहा"


कित्येक लोक आम्हा "दुर्गवीरांना" विचारतात हे एवढ हात-पाय तोडून, एवढी किल्ल्यांवर कामं करता… काय मिळत तुम्हाला हे सर्व करून….… या प्रश्नाच उत्तर एकच आहे, "आम्हाला तेच मिळत जे बाजीप्रभूंना घोडखिंडीत प्राण देऊन मिळाले" "आम्हाला तेच मिळत जे कोंढाणा जिंकताना हौतात्म्य पत्करणा-या तानाजी मालुसरेंना मिळाले" "आम्हाला तेच मिळत महाराजांच्या एक शब्दावर शरीराची चाळण होइपर्यत लढणा-या प्रतापराव(कुड्तोजी) गुजर यांना मिळाल…

आज आम्हाला शंभरी पार करणारे आमचे पूर्वज कदाचित आठवणार नाहीत पण ऐन पन्नाशीत देवाज्ञा घेणारे शिवराय आणि ऐन तिशीत बलिदान देणारे शंभूराजे आपण विसरणे अशक्य आहे. म्हणून जन्माला येउन किड्या मुंग्याच आयुष्य जगणं आम्हाला मान्य नाही म्हणूनच आम्ही दुर्गवीर या कार्यसाठी झटतोय…… तुम्हीसुद्धा "जगण्यासाठी झटण्यापेक्षा… झटण्यासाठी जगून पहा"
जय शिवराय
www.durgveer.com
दुर्गवीर चा धीरु

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...