एक अतूट नाते :- शिवप्रेमींचे


तुम्ही एखादे चांगले कार्य करता तेव्हा तुमच्या सोबत येणारी माणसे हि चांगलीच असतात, त्यांचा तुमच्यासोबत येण्याचा उद्देशहि स्वच्छ असतो. याचाच प्रत्यय आज "दुर्गवीर" च्या शस्त्र प्रदर्शन व गडसंवर्धन छायचित्र प्रदर्शनात आला. "दुर्गवीर" च्या कार्याने प्रभावित होऊन पंजाब बॉर्डर वरून शिर्डी आणि शिर्डी वरून मुंबई असा प्रवास करून आलेल्या "सोमनाथ ढवळे" यांची भेट घेताना जाणीव झाली आम्ही काय कमावलाय. फेसबुक वरून माझे दुर्गवीर श्रमदानाचे फोटो पाहून दुर्गवीर बद्दल त्यांना आदर निर्माण झाला आणि त्यांच्या १० दिवसाच्या सुट्टीचा पहिला दिवस दुर्गवीरांसोबत घालविण्यासाठी "सोमनाथ ढवळे" मुंबईत हजर झाले. मुंबईतील काहीही माहिती नाही. दादर ला उतरल्यावर त्यांनी चौकशी केली तर त्यांना कोणी सांगितले काळाचौकी ३ ठिकाणी आहे परंतु शिवकृपेने एका व्यक्तीने त्यांना Taxi करून प्रदर्शनाच्या जागी आणून सोडले.
ह्या घटनेतून एक मात्र नक्की माझी आणि त्यांची ओळख,व "त्या "अनोळखी व्यक्तीने" त्यांना मुंबईत मदत करण, आणि दुर्गवीरांची भेट हे सर्व विधिलिखित होत. या सर्व भेटी शिवरायांनीच घडवून आणल्या. आज जरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जन्मलो असू पण गतजन्मी नक्कीच आम्ही सर्व मावळे होतो.

मी सुट्टी मिळाली कि दुर्गवीर सोबत जातो त्यामुळे माझे नातेवाईक, मित्र मंडळी कदाचित दुखावत असतील कारण मी त्यांच्याकडे जात नाही, त्यांना वेळ देत नाही. परंतु दुर्गवीर च्या कार्यामुळे "सोमनाथ ढवळे" यांच्या सारख्या शिवप्रेमींशी जे अतूट नात निर्माण होत आहे आणि समाजात आम्हा दुर्गवीरां बद्दल जो आदर आहे तो पाहून त्यांचा राग थोडा तरी कमी होत असेल.

दुर्गवीर च्या कार्यामुळे मला लिखाण करायची प्रेरणा मिळाली आणि
माझे अंतरंग हे पेज http://dhiruloke.blogspot.in/ ह्या ब्लॉग च्या माध्यमातून लिखाण करायला लागलो आणि त्यामुळे आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेरील, देश आणि देशाबाहेरील वाचक निर्माण झाले. हे वाचक जेव्हा प्रतिक्रिया देतात तेव्हा प्रत्येक वेळी मला "पुरस्कार" मिळत असतो आणि हा "पुरस्कार" मला लिखाणासाठी आणि दुर्गवीर च्या गडसंवर्धनाच्या कार्यासाठी नवीन प्रेरणा देत असतो.

ह्या प्रसंगातून आनंद तर मिळतो आणि सोबत जाणीव होते जबाबदारीची या कार्यातून ज्या ओळखी झाल्या आहेत त्या जपणे आणि हे कार्य निरंतर चालू ठेवणे हे माझे आणि प्रत्येक दुर्गवीराचे हे कर्तव्य आहे.
जय शिवराय !!

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

"दुर्गवीर" मी