"अलेक्झांडर" आणि "चंद्रगुप्त"


"अलेक्झांडर" आणि "चंद्रगुप्त"
"अलेक्झांडर" हा ग्रिकांचा महान राजा ज्याला त्याच्या पित्याकडुन (राजा फिलिप) 'प्रचंड पैसा व सैन्य बळ' मिळाले त्याच्या बळावर तो ग्रिक मधील सर्व छोट्या मोठ्या गणराज्यांना गिळंकृत करत आला. परंतु "हिन्दुस्तानी" जनतेने त्याच "स्वामित्व" कधीच मानले नाहि उलट तो जो प्रदेश जिंकुन पुढे जायचा तिथली जनता त्याची पाठ फिरताच दंड ठोकुन उभे राहायचे जेव्हा त्याला जाणवलं आपला येथे निभाव लागण अशक्य आहे तेव्हा त्याने परतायचा निर्णय घेतला परंतु जाता जाता त्याची महत्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसु देत नव्हती व तो सैन्याच्या मनाविरुध्द लढाया लढत होता...परंतु पाश्चात्य लेखक अलेक्झांडर च वर्णन करताना त्याला "जिंकायला प्रदेश न उरल्याने हताश होऊन परत गेला" असं करतात हे खुपच अतिशयोक्तिपूर्ण आहे.

दुस-या बाजुला "चंद्रगुप्त राजा" जो अलेक्झांडर च्या स्वारि अगोदरपासुन "अखंड हिंदुस्थान" चे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठि धडपडत होता त्याचा इतिहास जाणुनबुजून दडपला जातो. जेव्हा "चंद्रगुप्त" "अखंड हिंदुस्थान" स्वप्न पाहत होता त्याच्याकडचे सैन्यबळ होते "शुन्य" आणि जेव्हा "अखंड भारताचे राज्य" उभारले तेव्हा ते होते तब्बल :-
>सहा लक्ष पायदळ
>तीन सहस्त्र घोडेस्वार
>दोन सहस्त्र लढाउ हत्ती
> चार सहस्त्र रथ
स्वताच्या पित्याने राज्यातुन बाहेर काढले होते…. पाठिशी फक्त एकच आधार होता "चाणक्य"... अलेक्झांडरच्या मृत्युनंतर अवघ्या दोन वर्षात "राजा चंद्रगुप्तने" उभारलेल्या अखंड "भारतवर्षावर" आक्रमण करण्याची हिम्मत पुढिल हजारो वर्ष कुणी केली नाहि... याउलट "अलेक्झांडर" च्या मृत्युनंतर "हिंदुस्थानावर" आक्रमण करायला आलेले "अलेक्झांडर" वारसदार "होत - नव्हत" राज्यही गमावून बसले.  

तसे या महान योद्ध्यांची तुलना करणे योग्य नाही. परंतु एक गोष्ट मात्र नमूद करावीशी वाटते की सिकंदर नक्किच एक चांगला योध्दा होता पण तो जगज्जेता नव्हता याउलट दासि चा पुत्र म्हणुन हिनवला गेलेला चंद्रगुप्त व त्याचा गुरु चाणक्य किती दुरदर्षी व महत्वाकांक्षी होता हे मात्र खर

माहिती स्त्रोत:- सहा सोनेरी पाने -स्वातंत्र्यवीर सावरकर

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….