Posts

Showing posts from January, 2018

तीन दिवस…. तीन विषय....... तीन विभुती...... तीन अनुभव.....

Image
इतिहासाच एक वादळ जे ७८ व्या वर्षीही घोंगावतय. ज्या वादळाला कुणी एका बंधनात बांधुन ठेवु शकत नाही…. ते वादळ घोंगावत जात…… आता तुमचा मजबुत पाया ठरवतो की तुम्ही त्या वादळासमोर कसे टिकता. तुम्ही मातीशी पाय घट्ट रोवुन असलात म्हणजे तुम्ही या वादळासमोर तग धरु शकता. हे वादळ म्हणजे श्री आप्पा परब….. आप्पांनी बोलत जाव मुक्तपणे आणि आपण घेत जाव जितकी आपली पात्रता आहे. ७८ व्या वर्षी रायगड चढुन जाताना व्यक्त होणारे आप्पा परब खर तर दोन तासाच्या कार्यक्रमात व्यक्त होणं म्हणजे मृग नक्षत्रातल्या एकुण पावसातला एक थेंब जणु...

डॉ. परीक्षित शेवडे आयुर्वेद चे खरे वैद्य अगदि सोप्या भाषेत सांगायच तर आयुर्वेदाचे डॅाक्टर... WHATSAPP वरच्या आयुर्वेद व इतिहास या विषयांवरच्या अंगठेबहाद्दरांचा खरपुस समाचार घेत दोन तास चांगलेच गाजवले. छत्रपति संभाजी महाराजांच्या युद्धनितीबद्दल अगदि हलक्या फुलक्या भाषेत डॅा. परिक्षीत शेवडे यांनी सांगितले.

वय वर्ष २६ अस म्हटल्यावर सभागृहाने टाळ्या वाजविल्या त्या कौस्तुभ कस्तुरे यांनी गाजवला तिसरा दिवस. बाजिराव मस्तानी आणि अटकेपार झेंडा या पलिकडे पेशवे हे फारसे परिचित नसलेल्या आम्हा…

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)

Image
इतिहास अभ्यासता येतो पण भुगोल अनुभवावा लागतो….. या वाक्याची प्रचिती म्हणजे रायगड प्रदक्षिणा. गेली १६ वर्ष नियमितपणे रायगड प्रदक्षिणे चे नियोजन करणारे किरण शेलार यांच्या सोबत या वर्षी जायचा योग आला. जस परमेश्वराच्या चरणाशी आल्यावर त्याच्या उंचीची अनुभती येते तसच या रायगडाच्या पायथ्याशी केलेल्या प्रदक्षिणेनंतर रायगडाच्या उत्तुंगत्वाची अनुभूति येते. शिवरायांनी रायगड राजधानी म्हणुन निवडण्यापुर्वि रायगड परिसराचा अभ्यास केला तेच म्हणजे रायगड प्रदक्षिणा.

रायगडाच्या हत्ती दरवाजाच्या खाली जाणा-या रस्त्याने पुढे जात रोप वेच्या इथे ही प्रदक्षिणा पूर्ण होते. गडाच्या सभोवतालचे संरक्षक किल्ले, व इतर परिसर पाहत जाताना शिवरायांनी पायथ्याच्या परिसरात वसवलेली वनराई हा महाराजांचा दुरदृष्टिपणा दाखवतो. यात पर्यावरणासोबतच रायगड चढाईसाठि प्रतिकुल बनविणे हा विचारसुद्धा असावा. नैसर्गिकदृष्ट्या अभेद्य असलेल्या रायगडाला परिपूर्ण राजधानीचे ठिकाण कसे बनविले असेल हे रायगड प्रदक्षिणेदरम्यान जाणवते.

इतिहास आणि भूगोल किती सुरेख मिश्रण आहे ना.... इतिहास प्रत्यक्ष अनुभवता येत नाही पण भूगोल प्रत्यक्ष अनुभवल्याशिवा…