Saturday, 30 August 2014

ताकद....तुमच्यात इतकी ताकद असू द्या कि,
जे आजवर हात धुवून तुमच्या मागे लागले होते
ते यापुढे तुमच्या मागे पुढे फिरतील…

Monday, 18 August 2014

जस्ट हलकं फुलकं - एक सणसणीत चपराक…


जस्ट हलकं फुलकं - एक सणसणीत चपराक…

आज दादर च्या शिवाजी नाट्य मंदिरात नितीन पाटोळे, प्रशांत बंधूंच्या कृपेने एक नाटक पाहिलं "जस्ट हलकं फुलकं" निर्माती श्रीमती कविता मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शन तर्फे ऋषिकेश परांजपे लिखीत, गणेश पंडित दिग्दर्शित हे नाटक त्यात सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे या अप्रतिम जोडीचा अप्रतिम अभिनय आणि त्याला अनिता दाते यांची अवखळ साथ….

नाटकाची सुरुवात झाली तेव्हा अंदाज आलाच होता कि नाटक जातिव्यवस्थेवर टीका करणार आहे. ("जातीव्यवस्थेवर" हा !! "जातीवर" नाही !!.). डॉक्टर चा प्रसंग पाहून नाटक थोड वेगळ वळण घेतय कि काय असं वाटू लागल. पण नंतर मात्र नाटकाने जी काही पकड घेतली ती शेवटपर्यंत सोडली नाही. तिन्ही कलाकारांनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखांना पुरेपूर न्याय देत अगदी हसत हसत नाटकाचा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पुरेपूर पोहोचवला. तिन्ही कलाकारांसोबत एका पडद्यामागच्या कलाकाराचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे वेशभूषाकार अगदी क्षणात जादूची कांडी फिरवावी तसे हे कलाकार आपला वेश बदलत होते. सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे यांनी तर फु बाई फु या मालिकेतून लोकांना अक्षरशा वेड केलय आणि या नाटकातूनहि त्यांनी तेच केल.

सागर कारंडे हे तर माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. अगदी सहजतेन पोट दुखेपर्यंत लोकांना हसायला लावणे यात सागर कारंडे यांचा हातखंडा आहे. सागर कारंडे जेव्हा बोलतात तेव्हा विनोद होतो, जेव्हा चालतात तेव्हा विनोद होतो. जेव्हा न बोलता गप्प बसतात तेव्हाही विनोद होतो.

भारत गणेशपुरे हे तर कोणत्याही परीस्थितिचा विनोद करू शकतात. म्हणजे मध्येच साउंड सिस्टम चा प्रोब्लेम झाला त्यावरहि ते विनोद करून टाळ्या मिळवत होते. स्टेज वरून नाट्यरसिकांशी मिळून मिसळून आपला अभिनय करणं हे हि नाटकाची खासियत आहे, ती मजा चित्रपटात नाही. आणि हिच मजा भारत गणेशपुरे घेत होते आणि नाट्यरसिकांना देत होते.

अनिता दाते ह्यांचा अभिनय तर अगदी अवखळ होताच पण त्यांच प्रत्येकभूमिकेसाठीच वेशभूषा करणं आणि लीलया ते सांभाळण याच कौतुक वाटत. सलाम तुमच्या मेहनतीला…. अगदी शालेय तरुणी असो वा वृद्ध स्त्री प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देत होत्या

थोडक्यात काय तर अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने "जातीव्यवस्थेला"( "जातीव्यवस्थेला""जातीला" नाही) एक सणसणीत चपराक या नाटकाच्या निमित्ताने मिळाली. प्रत्येक नाट्यरसिकाने जाउन पहावे असे नाटक होते.

"जस्ट हलकं फुलकं" च्या टीम ला माझ्या करून खूप सा-या शुभेच्छा
जय शिवराय !!

"जस्ट हलकं फुलकं" च्या सबंधित काही पेज ची लिक :-

https://www.facebook.com/pages/Just-Halka-Fulka/729945237043544

https://www.facebook.com/bhadrakaliproductions

https://www.facebook.com/anitaforfans

https://twitter.com/anitadate31

https://www.facebook.com/bharat.ganeshpure


Saturday, 16 August 2014

खचून जाऊ नका - Be Braveतुम्हाला सतत "संकटांना"
सामोर जाव लागतंय….
खचून जाऊ नका !!!
लक्षात ठेवा…. 
"हुशार विद्यार्थीच" 

Friday, 15 August 2014

चांगल कोण?


चांगल्याशी "चांगल"
वाईटाशी "वाईट" 
वागायचं म्हटलं तर…. 
"चांगल कोण?"
हा विचार करावा लागतो…

Monday, 11 August 2014

होय मी त्याच "दुर्गवीर" चा "शिलेदार"
होय मी त्याच "दुर्गवीर" चा "शिलेदार"  

जिथे "शिवप्रेम" "मनात" नाही,
"रक्तात" भिनवल जात....  .

जिथे "संकटाला" "पाठीवर" नाही,
"छाताडावर" झेललं जात....

जिथे "गडांना" वास्तूपेक्षा, 
"मंदिर" मानलं जात....

जिथे "संस्कृतीला", 
"विकृतीपासून" जपल जात.....

जिथे "मनगटांना", 
"अजस्त्र काताळांशी" भिडवल जात.....

जिथे "बाहुंना" "शिवप्रेमाच",
"बळ" दिल जात....

जिथे हातांना "बडवीण्यापेक्षा", 
"घडविण्यासाठी" राबवील जात.....

जिथे फक्त "मनात" "संस्कार" नाही,
"संस्कारात" "मन रमविल" जात....
  
होय मी त्याच "दुर्गवीर" चा "शिलेदार"

विश्वास..
पक्ष्याचा पंखावर असतो तो
मोराचा काळ्या ढगांवर असतो तो               वि

झाडांचा मुळांवर असतो तो
तान्ह्या बाळाचा आईवर असतो तो             श्वा
लंगड्याचा त्याच्या काठीवर असतो तो
डोळ्यांचा पापणीवर असतो तो                    
भक्ताचा देवावर असतो तो
कर्तृत्ववानाचा त्याच्या क्षमतेवर असतो तो 

Monday, 4 August 2014

सरकारला गणेशोत्सवाची गरज नाही - आयुक्त बिपीन मलीक

सरकारला गणेशोत्सवाची गरज नाही - आयुक्त बिपीन मलीक

महाराष्ट्र सदनात या वर्षी गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही असा फतवाच जाहीर केलाय महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलीक या महान व्यक्तीमत्वाने. हे तेच आहेत जे काही दिवसांपूर्वी चपाती प्रकरणात गाजत होते. अगोदर निकृष्ट जेवण देण्याचा आरोप त्यात पुन्हा हे धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकरण. काय तर म्हणे गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमावर खर्च करण्याची सरकारची अजिबात इच्छा नाही आहे. हे निवासी आयुक्त इतक बरळेपर्यंत महाराष्ट्र सदनातील सांस्कृतीक विभाग मूग गिळून गप्प का बसले आहे. या मलिक महाशयांनी गेल्या वर्षी पण गणेश उत्सवास विरोध केला होता परंतु कनिष्ट अधिकारी नंदिनी आव्हाडे यांनी कडाडून विरोध करून नाकावर टिच्चून गणेशोत्सव साजरा केला. अशी महाराष्ट्रद्वेशी / हिंदू द्वेशी भूमीका मांडताना लाज का वाटत नाही या महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या चमच्यांना. जर महाराष्ट्र सरकारला जमत नसेल तर महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात द्या आम्ही धुमधड्याक्यात साजरा करू आमचा गणेशोत्सव तुम्ही फक्त इफ्तार पार्ट्या साजऱ्या करा. तसेही आणि काही दिवसातच या महाराष्ट्राची जनता तुमचे विसर्जन करणार आहे त्यामूळे काय भुंकायचे ते भुंकून घ्या

Saturday, 2 August 2014

"गड-किल्ले" आणि "दुर्गवीर"
मला एका व्यक्तीने विचारलं काय रे तू सतत…

"गड-किल्ले" आणि "दुर्गवीर" 

चा विचार करत असतोस… मी त्याला म्हटलं…

तू कसा तुझ्या "घर" आणि "कुटुंब" यांचा विचार करतोस तसा मी माझ्या… 

"घर"(गड-किल्ले) आणू "कुटुंब" (दुर्गवीर) 

यांचा विचार करत असतो…  

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...