जस्ट हलकं फुलकं - एक सणसणीत चपराक…
आज दादर च्या शिवाजी नाट्य मंदिरात नितीन पाटोळे, प्रशांत बंधूंच्या कृपेने एक नाटक पाहिलं "जस्ट हलकं फुलकं" निर्माती श्रीमती कविता मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शन तर्फे ऋषिकेश परांजपे लिखीत, गणेश पंडित दिग्दर्शित हे नाटक त्यात सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे या अप्रतिम जोडीचा अप्रतिम अभिनय आणि त्याला अनिता दाते यांची अवखळ साथ….
नाटकाची सुरुवात झाली तेव्हा अंदाज आलाच होता कि नाटक जातिव्यवस्थेवर टीका करणार आहे. ("जातीव्यवस्थेवर" हा !! "जातीवर" नाही !!.). डॉक्टर चा प्रसंग पाहून नाटक थोड वेगळ वळण घेतय कि काय असं वाटू लागल. पण नंतर मात्र नाटकाने जी काही पकड घेतली ती शेवटपर्यंत सोडली नाही. तिन्ही कलाकारांनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखांना पुरेपूर न्याय देत अगदी हसत हसत नाटकाचा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पुरेपूर पोहोचवला. तिन्ही कलाकारांसोबत एका पडद्यामागच्या कलाकाराचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे वेशभूषाकार अगदी क्षणात जादूची कांडी फिरवावी तसे हे कलाकार आपला वेश बदलत होते. सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे यांनी तर फु बाई फु या मालिकेतून लोकांना अक्षरशा वेड केलय आणि या नाटकातूनहि त्यांनी तेच केल.
सागर कारंडे हे तर माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. अगदी सहजतेन पोट दुखेपर्यंत लोकांना हसायला लावणे यात सागर कारंडे यांचा हातखंडा आहे. सागर कारंडे जेव्हा बोलतात तेव्हा विनोद होतो, जेव्हा चालतात तेव्हा विनोद होतो. जेव्हा न बोलता गप्प बसतात तेव्हाही विनोद होतो.
भारत गणेशपुरे हे तर कोणत्याही परीस्थितिचा विनोद करू शकतात. म्हणजे मध्येच साउंड सिस्टम चा प्रोब्लेम झाला त्यावरहि ते विनोद करून टाळ्या मिळवत होते. स्टेज वरून नाट्यरसिकांशी मिळून मिसळून आपला अभिनय करणं हे हि नाटकाची खासियत आहे, ती मजा चित्रपटात नाही. आणि हिच मजा भारत गणेशपुरे घेत होते आणि नाट्यरसिकांना देत होते.
अनिता दाते ह्यांचा अभिनय तर अगदी अवखळ होताच पण त्यांच प्रत्येकभूमिकेसाठीच वेशभूषा करणं आणि लीलया ते सांभाळण याच कौतुक वाटत. सलाम तुमच्या मेहनतीला…. अगदी शालेय तरुणी असो वा वृद्ध स्त्री प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देत होत्या
थोडक्यात काय तर अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने "जातीव्यवस्थेला"( "जातीव्यवस्थेला""जातीला" नाही) एक सणसणीत चपराक या नाटकाच्या निमित्ताने मिळाली. प्रत्येक नाट्यरसिकाने जाउन पहावे असे नाटक होते.
"जस्ट हलकं फुलकं" च्या टीम ला माझ्या करून खूप सा-या शुभेच्छा
जय शिवराय !!
"जस्ट हलकं फुलकं" च्या सबंधित काही पेज ची लिक :-
https://www.facebook.com/pages/Just-Halka-Fulka/729945237043544
https://www.facebook.com/bhadrakaliproductions
https://www.facebook.com/anitaforfans
https://twitter.com/anitadate31
https://www.facebook.com/bharat.ganeshpure
Comments
Post a Comment