Sunday, 30 November 2014

झोकात पुनरागमन:- ३०/११/२०१४ :- सुरगड श्रमदान मोहीम


"झोकात पुनरागमन" अगदी असच वर्णन करायच दुर्गवीर च्या आजच्या "सुरगड श्रमदान मोहीम ३०/११/२०१४" च्या मोहिमेचे. "महिन्यातील १ रविवार १ श्रमदान" पण अगदी झोकात… प्रदीप पाटलांचे झोकात पुनरागमन, नवीन दुर्गवीरांचे झोकात आगमन, प्रज्वल पाटील आणि पनवेलच्या दुर्गवीरांचे दणकट आगमन, तुषार चित्ते आणि अनिकेत कस्तुरे यांचे झोकात आगमन या आणि अनेक गोष्टीनी परिपूर्ण अशी आजची दुर्गवीर ची मोहीम…तबल २५-३० दगडी पाय-या बांधून काढल्या त्याही त्यावर "Disco Dance" केला तरी तुटणार नाहीत अश्या. प्रदीप पाटील बंधूच्या बांधकाम क्षेत्रातील अनुभवाचा पुरेपूर वापर करून पाय-या अक्षरशा बांधून काढल्या फक्त सिमेंट वापरल नाही इतकच….

अगोदरच मी लेट झालो त्यामुळे मला दिवा- रोहा ट्रेन चुकली तरीही प्रज्वल बंधू आणि त्यांच्या पनवेल मित्रमंडळ परिवाराने "मोठ्या मनाने" "माझ छोटस" शरीर Adjust करून घेतलं(कोंबून म्हटलं तरी चालेल…. ) कंपनी जी गाडी ४ माणसांसाठी बनवली त्यात आम्ही ७ जण Adjust झालो होतो. रात्री मी डबा घेऊन येणार म्हणून अर्धपोटी आणि क्वचित उपाशी झोपी गेलेल्या दुर्गवीरांचे शाप अंगावर झेलत मी रात्री झोपी गेलो. सकाळी सर्व काही आटोपल्यावर श्रादानास सुरुवात केली. तेव्हा संतोष दादांनी वेगवेगळ्या टीम मध्ये विभागणी केली आमच्या टीम मध्ये "पुनरागमन" करणारे प्रदीप पाटील, अजित दादा, आतिश शिर्के (लोणावळा), राज दादा आणि मी असल्याने फार चर्चा न होता आमचे काम चालू होते. प्रदीप दादांनी "दगडाकडे" बोट दाखवावे "मी" आणि राज दादांनी तो "दगड" आणून द्यावा. प्रदीप पाटलांचा बांधकाम क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर पाय-या अक्षरशा बांधून काढल्या. अजित दादांच्या दूरदृष्टीने या पाय-यांचे मजबुतीकरण होत होते. दुस-या तुकडीत प्रज्वल पाटील आणि त्यांची पनवेल टीम तुटून पडली होती. तिस-या तुकडीत सचिन जगताप आशिष आणि इतर दुर्गवीर होते. आकाश खोराटे एकटेच "कोयत्याने" झाडींची "खांडोळी" करत होते. अगदी मोजक्या वेळात ठरलेल काम पार पडत होत. प्रत्येकजन आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत होता त्यामुळेच कदाचित ठरलेली कामे वेळेत पूर्ण होत होती.

आजच्या मोहिमेत सर्वानीच अगदी झोकात पुनरागमन केल…. पण इंजिनिअर डोक प्रशांत वाघरे, अष्टपैलू नितीन पाटोळे आणि बाकी दुर्गवीराना "मिस"का काय म्हणतात ते केल…. तेव्हा पुढच्या मोहिमेला नक्की या नाहीतर रोज रोज तुम्हाला "मिस" करायची इच्छा नाहीय आमची….

Saturday, 29 November 2014

विवेकानंद व्याख्यानमाला २८/११/१४ :- Timeless Management :- श्री निनाद बेडेकर


विवेकानंद व्याख्यानमाला २८/११/१४

आजचा विषय "Timeless Management" वक्ते होते श्री निनाद बेडेकर... खर तर हा विषय इतका अफाट आहे की १-२ तासात हा विषय समजावुन सांगता येणार नाही. या व्याख्यानमालेतील दुग्ध-शर्करा योग म्हणजे शिवरायांच्या Management ची तत्वे आणि त्यात श्री निनाद बेडेकर यांच वक्तृत्व. ३५० वर्षापूर्वी शिवरायांनी राज्यकारभार करताना जी तत्व वापरली तीच तत्व आता आचरणात आणता येतील आणि अजून ३५० वर्षानंतरहि हिच तत्वे आचरणात आणता येतील फक्त त्याची माध्यमे बदलतील. अफजल खान वध, शाहिस्तेखान स्वारी,पन्हाळ्याहुन सुटका,आग्र्याहुन सुटका,पुरंदरचा तह, या आणि अनेक घटना, किंबहुना शिवरायांचे संपूर्ण आयुष्यच Management च्या विविध तत्वांप्रमाणे संपूर्ण जगाला आज आणि यापुढिल हजारों लाखो वर्षे मार्गदर्शन करीत राहिल.

विवेकानंद व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन व नियोजन करणारया विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन व आभार
जय शिवराय
दुर्गवीर चा धीरु

Thursday, 27 November 2014

विवेकानंद व्याख्यानमाला - २०१४


माझ थोडसं Timing चुकल म्हणून मी श्री नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेउ शकलो नाही याची सल कायम मनात राहील पण त्यांचे विचार जगणा-या श्री. शरद पोंक्षे यांना आज जवळून पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाली हे सुख मला आयुष्यभर पुरेस आहे…

विद्यार्थी उत्कर्ष मंडळ तर्फे आज सावरकरांचे विचार या विषयावर श्री शरद पोंक्षे यांचे व्याख्यान ऐकले. आज ख-या अर्थाने समजलं सावरकर हे लोकांना "समजायला" "काही वर्ष" जातात आणि जेव्हा ते "समजतात" तेव्हा "ज्याला ते समजतात" ते "चांगलेच समजून जातात" कि आपल्या देशाची "गुलाबाने" काय आणि कशी वाट लावली (हे "गुलाब" म्हणजे काय हे शरद पोंक्षेच आजच व्याख्यान ऐकना-यांना चांगलच माहित आहे)

आजवर मी शरद पोंक्षे ना अभिनेता म्हणून ओळखत होतो पण कणखर, ज्वलंत, परखड वक्ता हि नवीन ओळख मी आज अनुभवली. खर तर मी सावरकर आणि नथुराम गोडसे यांची पुस्तके घेऊन गेलेलो ज्यावर मला "वक्ते शरद पोंक्षे" यांची स्वाक्षरी हवी होती.पण त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते शक्य झाल नाही … बघू पुन्हा कधी योग येतो.  (https://www.facebook.com/sharad.ponkshe.9)

या व्याख्यानमालेच आयोजन करणा-या श्री अभिजित घाडी व उत्कर्ष विद्यार्थी मंडळ च्या कार्यकर्त्यांचे हार्दिक आभार…। खर मी अभिजित घाडी यांना फेसबुक वरून २०१० पासून ओळखतो पण ते इतक्या चांगल्या संस्थेत कार्यरत असतील अस वाटलं नव्हत. अभिजित दादा तुमच्या कार्याला प्रणाम !! आणि आम्हाला सुद्धा तुमचे सभासद बनवून या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी द्यावी हि विनंती
पुढील व्याख्यान :-
27 नोव्हेंबर 2014
निळू दामले
विषय: आरक्षण

स्थळ : सदगुरू भालचंद्र महाराज किंडागण (लालमैदान),
गणेश टॉकीजच्या मागे ,
लालबाग, मुंबई - 400 012.

जय शिवराय

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...