झोकात पुनरागमन:- ३०/११/२०१४ :- सुरगड श्रमदान मोहीम


"झोकात पुनरागमन" अगदी असच वर्णन करायच दुर्गवीर च्या आजच्या "सुरगड श्रमदान मोहीम ३०/११/२०१४" च्या मोहिमेचे. "महिन्यातील १ रविवार १ श्रमदान" पण अगदी झोकात… प्रदीप पाटलांचे झोकात पुनरागमन, नवीन दुर्गवीरांचे झोकात आगमन, प्रज्वल पाटील आणि पनवेलच्या दुर्गवीरांचे दणकट आगमन, तुषार चित्ते आणि अनिकेत कस्तुरे यांचे झोकात आगमन या आणि अनेक गोष्टीनी परिपूर्ण अशी आजची दुर्गवीर ची मोहीम…तबल २५-३० दगडी पाय-या बांधून काढल्या त्याही त्यावर "Disco Dance" केला तरी तुटणार नाहीत अश्या. प्रदीप पाटील बंधूच्या बांधकाम क्षेत्रातील अनुभवाचा पुरेपूर वापर करून पाय-या अक्षरशा बांधून काढल्या फक्त सिमेंट वापरल नाही इतकच….

अगोदरच मी लेट झालो त्यामुळे मला दिवा- रोहा ट्रेन चुकली तरीही प्रज्वल बंधू आणि त्यांच्या पनवेल मित्रमंडळ परिवाराने "मोठ्या मनाने" "माझ छोटस" शरीर Adjust करून घेतलं(कोंबून म्हटलं तरी चालेल…. ) कंपनी जी गाडी ४ माणसांसाठी बनवली त्यात आम्ही ७ जण Adjust झालो होतो. रात्री मी डबा घेऊन येणार म्हणून अर्धपोटी आणि क्वचित उपाशी झोपी गेलेल्या दुर्गवीरांचे शाप अंगावर झेलत मी रात्री झोपी गेलो. सकाळी सर्व काही आटोपल्यावर श्रादानास सुरुवात केली. तेव्हा संतोष दादांनी वेगवेगळ्या टीम मध्ये विभागणी केली आमच्या टीम मध्ये "पुनरागमन" करणारे प्रदीप पाटील, अजित दादा, आतिश शिर्के (लोणावळा), राज दादा आणि मी असल्याने फार चर्चा न होता आमचे काम चालू होते. प्रदीप दादांनी "दगडाकडे" बोट दाखवावे "मी" आणि राज दादांनी तो "दगड" आणून द्यावा. प्रदीप पाटलांचा बांधकाम क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर पाय-या अक्षरशा बांधून काढल्या. अजित दादांच्या दूरदृष्टीने या पाय-यांचे मजबुतीकरण होत होते. दुस-या तुकडीत प्रज्वल पाटील आणि त्यांची पनवेल टीम तुटून पडली होती. तिस-या तुकडीत सचिन जगताप आशिष आणि इतर दुर्गवीर होते. आकाश खोराटे एकटेच "कोयत्याने" झाडींची "खांडोळी" करत होते. अगदी मोजक्या वेळात ठरलेल काम पार पडत होत. प्रत्येकजन आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत होता त्यामुळेच कदाचित ठरलेली कामे वेळेत पूर्ण होत होती.

आजच्या मोहिमेत सर्वानीच अगदी झोकात पुनरागमन केल…. पण इंजिनिअर डोक प्रशांत वाघरे, अष्टपैलू नितीन पाटोळे आणि बाकी दुर्गवीराना "मिस"का काय म्हणतात ते केल…. तेव्हा पुढच्या मोहिमेला नक्की या नाहीतर रोज रोज तुम्हाला "मिस" करायची इच्छा नाहीय आमची….

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….