Posts

Showing posts from July, 2015

संघर्षाताले जीवन….

Image
खुप काही असणा-याकडे सगळेच बघतात हो !! पण खु काही सोसणा-याला कधीतरी जवळुन पाहील तर जाणवतो  संघर्ष काय आहे !  !!

आम्ही कंटाळतो ते "एसी" शिवाय होणा-या गर्मीला पण तिच गर्मी उब समजुन सुखावणारे पाहिले की कळत खरा संघर्ष काय आहे !

आम्ही हार मानतो ते आयुष्यातल्या छोट्या छोट्या संकटांना घाबरुन पण रोज नविन संकटांना तोंड देत जगणा-यांना पाहिल की जाणवत ते संघर्ष म्हणजे काय ?

या मुलांच्या चेह-यावर आनंद दिसतोय तो यासाठी नाहिय की त्यांना "काहितरी" मिळालय तो आनंद यासाठी आहे की त्यांना "खुप काहीतरी" मिळालय !

अगदि मोठ मोठ्या "सुखदायक" गोष्टिंना आपण "अपेक्षांच ग्रहण" लावतो तिथे ही मुले "छोट्याश्या गोष्टित" आयुष्याचे "सार्थक" मानतात !

आम्ही त्यांना शालेय दप्तर दिले ही खुप मोठी गोष्ट नाहिय पण त्यांच्यासाठी त्यांना शिक्षणाची अजुन एक संधी मिळाली आहे म्हणुन ते खुष आहेत !

"स्वत: सुखी" आहोत म्हणुन आपण नेहमीच "हसतो" पण "दुसरा हसतोय" म्हणुन "आपण सुखी" होण्यात खरा "आनंद" आहे ! !

जिवनात संघर्ष तर सगळेच क…

सिंहगड चोरीला गेलाय....

Image
सिंहगड चोरीला गेलाय.... 
सर्व शिवभक्त, दुर्गप्रेमी,इतिहास प्रेमीं व "इतर प्रेमींना" कळविण्यास अत्यंत खेद होत आहे की मुंबई पासुन जवळ पुणे येथील ऐतिहासिक "सिंहगड" अज्ञातांकडुन चोरीला गेलाय. प्राचीन काळापासुन अस्तित्वात असलेला व उपलब्ध कागदपत्रानुसार "सिंहगड" नावाने प्रसिद्ध असलेला "सिंहगड" आज सदर ठिकाणि अस्तित्वात नाही. 
तानाजी मालुसरेंनी जेथे स्वताचे प्राण अर्पुन गड राखला तो गड आज आपण गमावलाय. काही शिवप्रेमिंच्या म्हणन्यानुसार "अतिरेकी पर्यटक", "अश्लिल प्रेमी" यांनिच हा गड चोरुन गडाच्या जागेवर एका गार्डन ची उभरणी केली असावी. सदर किल्ल्याला(गार्डनला) भेट दिल्यावर गडसंवर्धनाच्या नावावर चाललेला बाजार, अश्लिल प्रेमिंचा सुळसुळाट दिसुन येतो. मुळात या ठिकाणी एखादा गड होता ह्याबद्दलच साशंकता वाटते. परंतु इतिहासात सदर गडाच्या नोंदि आढळल्याने त्याचे अस्तित्व नाकारता येत नाही.
सदर जागेवर तानाजी मालुसरे, व राजाराम महाराज यांची समाधी, लोकमान्य टिळक यांचा वाडा, दोन तिन पाण्याची खोदिव व बांधिव टाकी आढळल्याने सिंहगड हा एक गड किंवा किल्ला होता …