शिवकृपा…


शिवकृपा…


आज दि. १२ / ५ / २०१३ रोजी  परंपरेनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते तसे आम्हा शिवप्रेमीना वर्षाचे ३६५ दिवस शिवमय असतात त्यानिमित्त आम्ही मानगड येथे मोहिमेचे आयोजन केले.  हो नाही हो नाही करता करता मी आशिष पवार,  गौरव, सुरज कोकितकर असे चार जण जाणार हे पक्क झाल. ठरल्याप्रमाणे आम्ही कुर्ला स्टेशन ला भेटलो रात्री २:३० वाजताची एस. टी. होती खूप वेळ वाट पहिल्यानंतर एकदाची ST आली पण ST ला एवढी गर्दी होती आमच्या अगोदर चा माणूस त्या ST च्या दरवाजांच्या काचेवर होता त्यापुढे फारशी रिस्क न घेत बस मध्ये न बसण्याचा निर्णय घेतला तरी आशिष च्या योजनेनुसार आम्ही टपावरून प्रवास करायचा विचार केला पण नशीब तो सत्यात नाही उतरला. नंतर आम्ही मिळेल ते वाहन पकडून पुढचा प्रवास करायचा अस ठरवलं मग रिक्षा ने पुढे  गेलो तिथून पुढे मानगड - निजामपूरपर्यंत जायचं होत त्यासाठी येणा-या प्रत्येक गाडी ला हात दाखवून लिफ्ट मागत होतो.  काय पण आमचा उत्साह  रात्रीच्या २:३० वाजता आम्ही हाय वे वर उभे राहून लिफ्ट मागतोय का तर मानगड ला जायचाच…. (गडावर जायला काय पण, कधी पण, कस पण ) नंतर एक Maxima ची गाडी थांबली त्याने प्रत्येकी  रु. १५०/-  सांगितली पण आम्ही त्याच्याशी उच्चस्तरीय चर्चा विनिमय करून रु.१३०/- पर्यंत आणल (चक्क रु.२० /- प्रत्येकी वाचवले) पण नंतर तिथल्या गाड्या सोडण्यासाठी असलेला एजंट आला आणि रु. १५० /- द्या नाहीतर खाली उतारा अशी सरळ उद्धट भाषा वापरू लागला आम्ही पण कमी नाही होतो (शेवटी दुर्गवीर आम्ही "आला अंगावर घेतला शिंगावर") झाल तर रात्रभर इथेच राहू पण रु.१३० /- पेक्षा एकही रु. जास्त देणार नाही या अविर्भावात आम्ही खाली उतरलो गम्मत अशी कि त्याच्या ३ - ४ सीट  खाली राहत होत्या त्यामुळे त्याने आम्हाला स्वताहून बोलावून घेतले(शेवटी आमचा विजय झाला) नंतर मी मागच्या बाजूला छानशी जागा बघून "चिंतन" करायला सुरुवात केली.  नंतर गाडी ४ चाकांवर चालत होती कि २ याची खबरबात न ठेवता मी माझ चिंतन सुरु ठेवले. आशिष दादाच्या बोलण्यावरून तो ड्रायव्हर गाडी खूपच स्पीड मध्ये चालवत होता (मला नाही जाणवल बुवा…. ) शेवटी आम्ही पोचलो निजामपूर येथे तिथून १० किमी चालत जायचं होत. मग मी एक साधा सरळ हिशोब केला १ किमी चालायला १५ मिनिट लागतात मग १० किमी चालायला किती वेळ लागेल (सोप्प आहे  गणित) १५० मिनीट म्हणजे २ तास ५० मिनिट  वेळेचा आकडा जरा जास्त वाटला म्हणून आम्ही मग पुन्हा मिळेल ते वाहन पकडून जायचं ठरवल. आणि तिथे अजून एक आच्छर्याचा धक्का बसला जी ST आम्ही गर्दी आहे म्हणून सोडली होती तीच मागून येत होती आणि महत्वाच म्हणजे त्या ST मध्ये अजून तेवढीच गर्दी होती जेवढी रात्री आम्ही कुर्ला स्थानकात असताना बघितली होती.  आता मात्र आम्ही सुटकेचा निश्वास टाकला कारण बसमधून आलो असतो तर उभे राहून पायाची लाकड झाली असती आमच्या. बर झाल आम्ही ती ST सोडली. तिथे पण एका टमटम ने रु.१५०/- सांगितले दुस-याने २५० सांगितले मग काय पुन्हा लिफ्ट मागत मागत पुढे चालत राहिलो. नंतर कस काय कुणास ठावूक आमच्या वयाची मुल एका क्वालीस मधून जात होती. त्यांनी गाडी थांबवून आम्हाला फुकट लिफ्ट दिली ती रामजींच्या घरापर्यंत… त्या मुलांना आम्ही कुठून आलोय? काय काम करतो? दुर्गवीर कोण आहे? दुर्गवीर चा कार्य काय आहे हि सर्व माहिती दिली त्या मुलांनी आम्हाला फुकट मध्ये रामजींच्या घरापर्यंत सोडलं
गंमतीचा भाग सोडला तर या प्रवासात आमच्यावर शिवरायांची कृपा होती  हे नक्की कारण ST ला गर्दी आहे म्हणून आम्ही ST सोडन आणि तितक्याच खर्चात आम्हाला दुसर आणि आरामदायक वाहन मिळण,आम्ही तितक्यात वेळेत किंबहुना काही मिनिट अगोदर इच्छित स्थळी पोचण,  पुढेच १० किमी अंतरासाठी ती तरुण मुलांनी मदत करणं खरच योगायोग असला तरी आमच्यासाठी ती महाराजांची कृपाच होती.या शिवकार्यात मी गेली दीड वर्ष आहे पण कधी कोणाला दुखापत झाली नाही कि अजून काही!!  काय असेल त्याच कारण?? कारण एकाच छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या मावळ्यांवर असलेला आशीर्वाद!!! 
पुढे आम्ही वेळेत रामजींच्या घरी पोचलो फ्रेश होऊन आडव्या हाताने चहा नाश्ता हाणला("हाणला") आणि मग आम्ही निघणार होतो मानगड च्या दिशेन आवश्यक वस्तू घेऊन मी आणि रामजी कदम पुढे निघालो मागून सुरज, आशिष, गौरव आले आमच आजच्या मोहिमेच  पाहिलं ध्येय्य होत राज सदर साफ करण तिथले दगड उचलून व्यवस्थित ठेवण. प्रथम रामाजींनि  आणलेला धान्यकोठारसाठीचा गेट ठेवून आम्ही कामाला सुरुवात केली.  आम्ही जोमाने कामाला सुरुवात केली पण उष्णता खूप असल्यामुळे आम्ही फार वेळ काम करू असे वाटत नव्हत तरी आम्ही बरचस काम पूर्ण केल मग पाण्याच्या शोधात इकडे तिकडे फिरलो मग मुख्य दरवाजापाशी गेलो तिथे आम्हाला शिवप्रतिमेचे पूजन करायचं होत  थोड खाउन घेत आम्ही दुस-या टप्प्यातील काम सुरु केल.  दरवाजात पताके लावले आणि मग रामजिंच्या हस्ते पूजन केल आरती आणि  घोषणा  देऊन हा छोटेखानी कार्यक्रम आम्ही आटोपता घेतला. अजून आजच्या मोहिमेचा तिसरा टप्पा बाकी होता. 
खाली मंदिराजवळ एक अज्ञात वीराची समाधी आहे ती जमिनीत गाडली गेली आहे ती बाहेर काढण्याच ठरल रामाजींच्या पुस्तकातहि या समाधीचा उल्लेख आहे. ती जमिनीत किती खोल गाडली गेलीय याचा अंदाज येत नव्हता पण ती आज बाहेर काढायची या त्वेषाने आम्ही काम करून लागलो  सगळ्यांची थोडी थोडी ताकद लावून सरते शेवटी आम्ही समाधी बाहेर काढली तब्बल एक ते दीड फुट खाली ती गाडली गेली होती. खरच जेव्हा ती समाधी पूर्णपणे बाहेर काढली तेव्हा मन अक्षरशा भरून आल.  आजच्या मोहिमेत एका अज्ञात वीराच्या समाधीला आम्ही पुर्नजन्म दिला याच आम्ही  मानसिक सुख अनुभवलं. शेकडो वर्ष ती समाधी पाऊस / वारा झेलत त्या अज्ञात व्यक्तीच्या पराक्रमाची साक्ष देत तटस्थपणे उभी होती. ती समाधी जमिनीतून काढतान हाताला लागत होत पण त्याकडे आमच्या कुणाचे लक्ष नव्हते आमच धेय्य होत ते फक्त ती "समाधी".  आणि आम्ही आमच्या आयुष्यातील अजून एक पुण्य कर्म पार पाडल होत सर्वांच्या चेह-यावर मोहीम फत्ते झाल्याचा आनंद होता.  
समाधी बाहेर काढल्यानंतर त्यावर काही लिहिले आहे का आम्ही पाहू लागलो. पण  आम्हाला फारस काही सापडलं नाही.  आशिष दादाला त्यावर "श्री" दिसला कसा ते त्यालाच ठावूक (होतात असे भास कधी कधी ) नंतर आम्ही परतीचा प्रवास करायला सुरु केला. या वेळी आम्ही तसे लवकरच निघालो (लग्नसराई चालू आहे ना ). बाहेर येउन मग थोड (थोडच बर का!!)खमंग जेवण जेवलो.  पुढे आमचा ST - ST चा प्रवास सुरु होणार होता आणि तो सुरूही झाला आता आम्हाला बसायला चांगली जागा मिळाली आणि पुन्हा सुरु झाला माझ चिंतन…. 

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….