भीमरूपी महारुद्रा….



भीमरूपी महारुद्रा…. 

आजच्या दि. १७/ ३ / २०१३ च्या मोहिमेत सर्व दुर्गवीरांनी "भीमरूपी" असा "रौद्र अवतार" दाखवून दिला. आजच्या मोहिमेची सुरुवात नेहमी प्रमाणेच होती. कोण Cancel कोण नवीन येतय अश्या पद्धतीत सर्व चालू होत. मी, मोनीश दादा जुईनगर ला पोचलो तेव्हा तिथे संतोष दादा, ओजास्विनी पावशे, सचिन रेडेकर, संदीप काप, राज मेस्त्री, चंद्रशेखर पिलाने, नितीन पाटोळे हे सर्व पोचले होते पण सर्वात मोठी परीक्षा होती ती आमच्या अनिकेत दादा ची(नेहमी प्रमाणे) वाट पाहायची. तो पर्यंत आमचे अमित शिंदे बंधू यांचा फोन आला कि त्यांना पण यायचय. खर तर मानगड ला येणा-यांमध्ये अमित बंधुंच नाव नव्हत आणि एका गाडीत अगोदरच आम्ही १० जण झालो होतो आता ११ वा कुठे बसवायचा हा प्रश्न उभा ठाकला होता. हा प्रश्न तर देशाची महागाई कशी रोखायची यापेक्षा मोठा होता. पण आमचे पंतप्रधान संतोष दादानि आम्हा सर्वाशी चर्चा करून निर्णय घेतला कि अमितला बोलवायचे कारण तिकडे जाउन जड विरगळ उचलण्यासाठी ताकदवर मावळे पाहिजे होते. शेवटी इकडे अनिकेत बंधूंचे आगमन झाले तसे आम्ही प्रयाण केले. तिकडे अमित शिंदे पनवेल ला हजार झाले. तिकडे जेवण करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मुंबईहून अगोदरच नील मयेकर, आणि प्रशांत सुर्वे निघाले होते. मजल दरमजल इकडचे तिकडचे विनोद करत आमचा प्रवास पूर्ण झाला. मानगड ला पोचलो रामजी कदम यांच्या घरी गेलो तेव्हा नील मयेकर,प्रशांत सुर्वे, सचिन जगताप, नीलकंठ मयेकर अगोदरच तिथे पोचले होते. खूप दमल्याने मी झोपी गेलो बाकीचे जागेच होते अस म्हणतात बाबा!!!!! मी तर झोपलो ते थेट सकाळी ६:३० - ७:०० च्या दरम्यान उठलो. चहा नाष्टा करून आम्ही मानगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवमंदिरा जवळ गेलो. तिथे असलेल्या विरगळी उचलून योग्य ठिकाणी ठेवणे हे आमच या मोहिमेच धेय्य होत. त्यानुसार संतोष दादांनी काय काय काम करायच याच्या सूचना दिल्या. 
काही सभासद नवीन होते त्यांना घेऊन संतोष दादा गडावर जाणार होते. संतोष दादा, रामजी कदम, ओजास्विनी पावशे, नील मयेकर, प्रशांत सुर्वे गड दर्शनासाठी गेले गड पाहता पाहता त्यांनी श्रमदान नाही केले तर दुर्गवीर कसले. तिथे पायथ्याशी असलेल्या एका मारुतीरायाच्या मूर्तीची गडाच्या प्रवेशद्वाराजवळ योग्य ठिकाणी प्रतिष्ठापणा करण्यात आली. जेणेकरून प्रत्येक व्यक्ती प्रथम मारुतीरायाचे दर्शन घेऊन मगच मानगडाची चढाई करेल. दुर्गवीर च्या एका तुकडीने गडदर्शना सोबत भीमरूपी महारुद्राचा गजर केला होता आणि त्यांनी पुन्हा आमच्या इकडे परतीचा प्रवास सुरु केला. तोपर्यंत आम्ही इकडे सर्व विरगळी बाहेर आणून ठेवल्या होत्या. त्या काढतान आमचा नेहमीचा मित्र (विंचू भाऊ) भेटीला आला पण त्याच नशीब वाईट म्हणून त्याच्यावर एक दगड पडला त्यातच त्याला दुखद मरण आले. त्याला श्रद्धाजलि वाहण्यात जास्त वेळ न दवडता आम्ही विरगळी काढण्याच्या कामात गुंतलो. आम्ही एक विरगळ साधारण ६० - ७० किलोची असेल म्हणून ३ किंवा कमीत कमी २ जन उचलायचो पण आमचे सचिन रेडेकर बंधू तर एकट्याने एक विरगळ उचलत होते खरच ते हॉलीवूड चे He Man, Super Man आणि कसले कसले Man आमच्या सचिन बंधू समोर चिंदी Man वाटत होते. सचिन दादाना फक्त जागा आणि वस्तू सांगायची जि उचलून दुसरीकडे ठेवायची तुमच वाक्य पूर्ण होण्याअगोदर ती वस्तू तिथून हललेली असणार. इथे दुस-यांदा मला "भीमरुपी महारुद्रा" चा प्रत्यय आला. नंतर खरी परीक्षा होती या सर्व विरगळी काळभैरव मंदिराच्या छप्पराच्या आडोश्यात ठेवायच्या होत्या. एका वेळी किमान ३ ते ४ विरगळी गाडीत ठेवून नंतर जवळच असलेल्या काळभैरवमंदिरा जवळ नेउन उतरवणे यात अगदी पुरता दम निघत होता. पण शांत बसतील ते दुर्गवीर कसले एवढ्या जड विरगळी उचलन सोप नव्हत. ह्या जड दगडी वीरगळी उचलण फक्त ताकदीच काम नव्हत ताकदिसोबत गरज होती "निस्वार्थी शिवप्रेमाची" आणि हे "निस्वार्थी शिवप्रेम" आपल्या दुर्गवीरांमध्ये ठासून भरले आहे. कुणाच्या हाताला लागतंय, कुणाच बोट दगडाखाली सापडतय, कुणाला खरचटतय तर अजून काय काय? पण दुर्गवीर थांबत नव्हते आम्हाला किती जखमा होतायत या त्रासापेक्षा शेकडो वर्ष खितपत पडलेल्या वीरगळी योग्य जागेवर ठेवल्या जातायत.याचच जास्त समाधान होत. शेवटी आम्ही सर्व काम आटोपून परतीच्या प्रवासाला निघालो पण नेमकी आमच्या सचिन जगताप दादाची बाईक बंद पडली पण आपल्या भावाला अर्धवट सोडून कस जाणार मग नील मयेकर यांच्या बाईक वर सचिन रेडेकर बसले आणि सचिन जगताप दादाचा हात पकडून त्यांची बाईक ग्यरेज पर्यंत पोचवली ती रिपेअर झाली आणि आम्ही सचिन जगताप आणि नीलकंठ दादा यांना निरोप देऊन मुंबईच्या दिशेने निघालो. वाटेत सूरगड ला श्रमदानाच साहित्य ठेवून आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने. हि मोहीम "भीमरूपी महारुद्रा" च्या जयघोषात आम्ही दुर्गविरानि पूर्ण केली ती त्या ऐतिहासिक वीरगळीना पुर्नजन्म देऊनच… 
परकियांच्या आक्रमणाने आणि स्वकीयांच्या उदासीनतेमुळे ह्या वीरगळी आज शेवटच्या घटका मोजतायत. त्यांना गरज होती योग्य संवर्धनाची. आज दुर्गवीरांनी त्या वीरगळीची होत असलेली फरफट थांबवली अजूनही खूप काम बाकी आहे. त्या वीरगळीच एक दालन तिथे उभ राहावं जेणेकरून पुढच्या पिढीली समजेल कि आपली संस्कृती काय होती. आज कितीतरी तरुण तरुणींना बॉलीवूड, हॉलीवूड चा एखादा सुपर हिरो कोण हे माहित असेल! पण हे वीरगळ म्हणजे काय? हे कदाचित माहित नसेल! अरे ह्या हॉलीवूड च्या काल्पनिक हिरोपेक्षा हे वीर ज्यांनी आपला ज्वाज्वल्य इतिहास घडविला त्यांना कसे काय विसरू शकतो? 
हा इतिहास जपण्याच काम आम्ही दुर्गवीर करतोय. आणि यातच आम्हाला समाधान आहे आम्हाला यात आम्हाला काय मिळत अस विचारल आम्ही अभिमानाने सांगू शकतो आम्हाला मिळत ते समाधान…. या तुम्हीही या हे समाधान मिळवा…
जय शिवराय 
दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….