मुजरा राजे मुजरा….



मुजरा राजे मुजरा 
मरण सोसलात पण शरण ना गेलात 
निर्घुण या मृत्यूलाही जिंकलात 
आयुष्यभर स्वराज्यासाठी जगलात 
मरणहि त्यासाठीच हसत स्वीकारलात 
मुजरा राजे मुजरा…. 


११ मार्च… हाच तो आमच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस आमच्या धाकल्या धन्याचा आज निर्घुण खून त्या औरंग्याने केला. माणुसकीला काळिमा फासणारे हे त्याचे कृत्य पण या स्वराज्याने एक न्यायप्रिय राजा गमविला. ज्या राजाच्या समोर मृत्यूही थरथर कापत होता त्याला हे अस दुखद मरण…या माझ्या राजाचा पराक्रम इतका अतुलनीय होता कि त्या औरंग्याचे साखळदंड माझ्या राजाचा पराक्रम कैद करू शकले नाहीत म्हणूनच कि काय शंभूराजेंच्या बलिदानानंतर स्वराज्याचा प्रत्येक व्यक्ती युद्धात उतरला आणि त्या औरंग्याला याच मातीत गाडला. ज्या शंभू राजेंनी मृत्यूवर विजय मिळवला ते आत्पेष्टा कडून मात्र फसले गेले.
आज ३२४ वर्षे उलटून गेली राजे तुमच्या बलिदानाला अजूनही आग भडकते आहे या मनात. कस सोसलत राजे तुम्ही राजे…. मरण पत्करलात पण शरण कधी गेला नाहीत. शिवरायांनी शिकवले राजाने स्वराज्यासाठी कस जगावं अन तुम्ही शिकवलात स्वराज्यासाठी कस मराव….
मुजरा राजे मुजरा…
जय शिवशंभो
जय शिवराय
दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)