किल्ले पेब (विकटगड ) माथेरान चे खर सौदर्य



 किल्ले पेब (विकटगड ) माथेरान चे खर सौदर्य 

आज दि.२४ / ३ / २०१३ रोजी दुर्गवीर च्या वीर आणि वीरांगनांनी दिलेल्या वचनाची पुर्ती करून अजून एक शिवकार्य निर्विघ्नपणे पार पाडले. शिवाय दुर्गवीरांनी अनुभवले पेब किल्यावर माथेरान चे अनोखे भारतीय सौदर्य
मी व नितीन पाटोळे दि. २८ नोव्हेंबर २०१२ रोजी पेब किल्ला (विकटगड) येथे दुर्गदर्शनासाठी गेलो होतो तेव्हा तेथील जोशी गुरुजी यांना आम्ही दुर्गवीर च्या कार्याची माहिती दिली ते दुर्गवीर च्या कार्याने प्रभावित झाले आणि त्यांनी तिथे चालू असलेल्या श्रमदान कार्यात मदत करण्याचे आवाहन केले. नितीन दादांनी दुर्गवीर च्या वतीने गुरुजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत या कार्यात मदत करण्याचा शब्द दिला.आज दुर्गवीर च्या ८ दुर्गवीर व २ वीरांगनांनी तो शब्द आज पूर्ण केला. 
नेहमी प्रमाणे आजची मोहीम ठीक वेळवर नव्हती नेहमी रात्री ८ ची दिवा रोहा असते पण आज रविवारी सकाळी दादर वरून ५:०२ ची ट्रेन पकडायची होती. त्यानुसार ४ वाजल्यापासून आमची तयारी चालू झाली होती एकमेकांना फोन करून उठवत होतो. पण दादर ला थोडा Flatform No. च्या बाबतीत थोडा घोळ झाल्यामुळे दादर वरून ६:३० ची ट्रेन मिळाली ते आले ७:०८ वाजता डोंबिवलीला. इकडे मी ओजास्विनी पावशे, ज्योती डसके त्या "Flatform चुकलेल्या" ट्रेन ची वाट बघत होतो. तिथून थेट निघालो ते ट्रेन ड्रायवर ला बोललो थेट नेरळ ला थांबव. शेवटी नेरळ ला पोचलो पण थोडा वेळ अगोदर आम्हाला समजल होत मराठी फेसबुक परिवार चे सर्वेसर्वा प्रज्वल पाटील येतायत. स्टेशन ला उतरून प्रज्वल दादा व त्यांचा मित्र प्रदीप सावंत यांना भेटलो नंतर जे दोन व्यक्ती त्या गडावर काम करीत आहेत ते महेश आणि सुबोध दादा यांना भेटलो.पुढे जाउन राजेश सावंत, सचिन सुर्वे भेटले. थोडा नाश्ता करून आम्ही गडाच्या दिशेने निघणार होतो प्रज्वल दादा आणि प्रदीप बंधू बाईक वरून जाणार होते. मी, सुरज कोकितकर, नील मयेकर, जितेंद्र राणे, राजेश सावंत, सचिन सुर्वे, ओजास्विनी पावशे, ज्योती डसके महेश आणि सुबोध अशी तब्बल १० मानस एका किडन्यापिंग च्या गाडीत (ओमनी कार हो... ) अक्षरश: कोंबून बसलो. पुढे ते वळणा वळणा चे रस्ते पार करत. माथेरान ला जाणा-या मिनी ट्रेन च्या १३४ NM असा असलेल्या बोर्ड पर्यंत गेलो. आता इथून पटरी वरून चालून जायचं होत ते १५५NM पर्यंत (हे NM काय असत हे मला अजूनही समजलेल नाही) तिथे १५५ NM च्या उजव्या बाजूला ठेवलेल्या वाळू आणि विठांच्या गोण्या पुढे नेवून ठेवायच्या होत्या. ह्या विठांपासून महेश आणि सुबोध दादा यांची टीम गडावर प्रती गिरनार व शिव मंदिर बांधणार आहेत. या गोण्या नंतर समोरच दिसणा-या डोंगरावर तारेच्या रोप वरून सोडण्यात येणार होते. आमच ह्या मोहिमेच धेय्य होत त्या गोण्या रोपपर्यंत आणून सोडणे. आपले सर्व दुर्गवीर आणि वीरांगना सज्ज झाले. आजच्या मोहिमेत आलेल्या ज्योती ताई आणि ओजास्विनी ताई ह्या सुद्धा सज्ज झाल्या गोण्या जड असल्या म्हणून काय झाल त्यांनीही गोण्या उचलायला सुरुवात केली. दोघी मिळून गोण्या उचलून पुढे नेत होत्या. काम अगदी व्यवस्थित टप्प्या टप्यात होत होते पहिल्या टप्प्यात २जण गोण्या भरत होते. दुस-या टप्प्यात २-३ जण गोण्या पुढे काही अंतरावर नेउन ठेवत होते.आणि उरलेले सर्व तिथून पुढे तारेच्या रोप पर्यंत नेउन ठेवत होते. तशी आम्हाला सकाळी ७वाजल्यापासून दुपारी १ - २ वाजेपर्यंत श्रमदान करायची सवय असल्याने यात फार काही वाटत नव्हते (विठा आणि रेती जरा जड होती बस इतकच). गोण्या उचलून ठेवल्या आणि थोडा झाडाच्या सावलीत बसून पुन्हा पुढच्या मोहिमेला जायचं होत तो एक डोंगर उतरून दुसरा डोंगर चढायचा हे जरा कठीण काम होत कारण गोण्या उचलून थोडा थकवा आला होता. तेव्हा मनात आल कि त्या गोण्या एका डोंगरा वरून दुस-या डोंगरावर नेण्यासाठी बांधलेल्या रोप ने पलीकडे जाता आल तर… पण त्या तारेची अवस्था बघून विचार बदलला आणि सुबोध दादा च्या माहिती नुसार ती तार फार तर २० - २५ किलो वजन तोलू शकते आणि आमच्यात २० - २५ किलोच कोणीच नव्हत त्यामुळे अजिबात लटका लटकी न करता शहाण्या बाळासारखे आम्ही एक डोंगर उतरून दुसरा डोंगर चढून गेलो. तोपर्यंत महेश आणि सुबोध दादा इतिहास आणि अनुभव कथन करत होते. पुढे एकदाचे पोचलो गडाच्या पायथ्याशी तिथे असलेल्या जोशी गुरुजींकडे बसलो तिथे थोडा वेळ त्यांच्याशी चर्चा झाल्या नंतर आम्ही गड चढाई ला सुरवात करणार होतो. त्यानुसार आम्ही निघालो महेश आणि सुबोध दादा यांच्या सुचनेनुसार आम्ही प्रथम बौद्धकालीन गुफ़ा ना भेट देणे नंतर दक्षिण मुखी दरवाजा, नायकिणीचा वाडा, प्रती गिरनार चे मंदिर असा प्रवास होणार होता. आम्ही पहिली गुफा बघितली तिचे बांधकाम कदाचित अर्धवट असावे अस वाटल किंवा दगडातील झिरपणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी व्यवस्था केली असावी अस वाटत होत. तिथून आम्ही पुढे दुसरी गुफा पाहायला जाणार होतो. चालताना अतिशय काळजी घ्यावी लागत होती जर तरी पाय सरकला तरी थेट दरीत अशी अवस्था होती. पुढे एक छोटीशी गुफा होती साधारण १ -२ फुट उंच आत जायचं तर आम्हाला कासवाच्या अवतारात जाव लागणार होत.आत जायच्या अगोदर सुबोध दादा त्यांचे अनुभव सांगत एकदा या गुफेत आम्हाला माकडाची हाड मिळाली बाकी काही नाही. एकदा त्यांना गुफेमध्ये जास्त मोठी नाही फक्त ६ फुट मण्यार दिसली होती. सुबोध दादा नक्की आपले अनुभव सांगत होते कि आम्हाला घाबरवत होते याचा विचार मी शेवटपर्यंत करत होतो. ४ - ४ च्या ग्रुप ने आम्ही आत गेलो तिथून ३ - ४ फुट आत आणि नंतर एक ५ -६ फुट खोल जागेत किमान १० जण बसतील एवढी जागा होती. तिथे बसून डोळे मिटून तिथली शांतता अनुभवणे म्हणजे अप्रतिमच होते. थोडा वेळ तिथे ती शांतता अनुभवल्यावर आम्ही बाहेर आलो. तिथून आम्ही पुढे अजून एक गुफा बघितली तिथे महेश आणि सुबोध दादांच्या टीम ने बरेचसे काम केले आहे. तिथे थोडा वेळ शांतता अनुभवल्यानंतर आम्ही पुढे निघालो. पुढे दक्षिण मुखी दरवाजा, नायकिणीचा महाल या वास्तू बघत आम्ही प्रती गिरनार च्या दिशेने गेलो जिथे सध्या मंदिराचे काम चालू होते. त्या भागातील एका उंच डोंगरावर शांतपणे बसून तो निसर्ग न्याहाळणे म्हणजे माझ्यासाठी एक पर्वणीच होती वाटत होत तासन तास या निसर्गाला न्याहाळत राहावं. बस हि शांतता आणि मी (हिंदीत म्हणतात ना मै और मेरी तनहाई) 
या मोहिमेत बराचश्या बाबतीती मी अनुत्तरीत होतो. उदाहरण घ्यायच तर दक्षिण मुखी दरवाज्यात २ पाय-यावर असलेले हत्तीच्या पायासारखे असलेले ठसे हे खरच हत्तीचे पाय ठेवण्यासाठीच होते का? शिव मंदीराच्या बाजूला असलेल्या टाकीच्या आत काही चित्र कोरलेली आहेत ती एवढ्या आत का? वरती गडावर जाताना काही ठिकाणी अश्या काही गोष्टी आहेत तिथे ज्यावर अजून संशोधनाची गरज आहे. खास करून नायकिणीचा महाल, पाण्याची टाकी अशी ठिकाण कदाचित काम करण्याची गरज आहे. महेश व सुबोध दादा तिथे खूप काम करत आहेत गरज आहे त्यांना सहकार्य करण्याची. 
त्या माथेरान चा Sunset Point बघायला झुंडीच्या झुंडी जातात पण एक चक्कर या त्या पेब किल्ल्यावर टाकली तर काय होईल हो. इंग्रजांना शोध लागला माथेरान थंड हवेच ठिकाण आहे म्हणून आपण रांग लावतो तिथे. माझा माथेरान ला जायला विरोध नाही पण त्यापेक्षाही जुन्या असलेल्या आपल्या संस्कृतीकडे का दुर्लक्ष करता. सुट्टीच्या दिवशी नेरळ स्टेशनला उतरलात तर अलोट गर्दी असते पण नंतर हि गर्दी जाते कुठे माथेरान च्या पानोरोमा का कसल्या त्या Point वर. तिथे काय असत सूर्य आणि थंड हवा. या एकदा या पेब विकटगडच्या एखाद्या गुहेत बसून बघा माथेरान पानोरोमा का कसल्या त्या Point ची हवा फिकी पडेल.सर्वात शेवटी असलेल्या प्रती गिरनार च्या मंदिरा जवळ उभे राहून बघा Sunset काय असतो. आता जेव्हा माथेरान ला जाल तेव्हा 134 NM इथे उतरून 159 NM पर्यंत चालत जाउन किंवा जमल तर ट्रेन 159 NM च्या इथे असलेल्या डोंगरातील गणपतीच्या इथे थांबवून खाली उतरून समोरच्या डोंगरावर जा आपल्या संस्कृतीचा अजून एक नमुना अनुभवाल. 
दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….