अत्यंत…. अचानक आणि अत्यंत…



अत्यंत…. अचानक आणि अत्यंत…

आजची दि. १०/३/२०१३ मोहीम खरच अत्यंत…अचानक आणि अत्यंत…. अशीच होती. काल शनिवार दुपारपर्यंत माझ्या लक्षात आल होत कि फार तर १० मावळे या मोहिमेस हजर राहणार होते. त्यामुळे खर सांगायचा तर "अत्यंत निरुत्साह" मनात होता. तसेच मी, सुरज कोकितकर, सचिन रेडेकर, किरणआपटे दिवा स्टेशनल भेटलो. दुर्गवीर वीरांगना ओजास्विनी पावशे यांनी धावती भेट दिली तोपर्यंत आमचे सुरज कोकितकर यांचे CALL सेंटर सुरु होते. थोड्या थोड्या वेळाने अजित दादा आणि संतोष दादा फोन करून आमच्या प्रत्येक पावलाची खबर घेत होते. तिकीट काढली का? गाडीत बसलात का? गाडी सुटली का? आणि खूप काही!!!! खरच जगाच्या कुठल्याही कोप-यात अजित दादा आणि संतोष दादा असुदे आपल्या दुर्गवीर च्या प्रत्येक सभासदावर त्यांच अगदी बारीक लक्ष असत. हीच आमच्या दुर्गवीर परिवाराची खासियत आहे. संतोष दादा ला फोन केला तर "अंड गुंड थंड पाणी" भाषेत एक बाई बोलायची नंतर लक्षात यायच दादा गावी आहे ना बेळगावच्या सीमेवर म्हणून "मराठी ऐवजी"(महाराष्ट्रात असून मराठी ऐवजी ) "अंड गुंड थंड पाणी" ची भाषा ऐकु यायची. आजच्या मोहिमेत जवळपास सगळे दुर्गवीर नव्हते त्यामुळे शांतता होती मी पण बोलून बोलून किती बोलणार ना!!! त्यात सुरज कोकीतकार पण नेहमीच "कमी बोलतो" तुम्हाला माहित असेलच. असो अश्या प्रकारे ८ वाजता दिवा वरून आमचा नागोठणे च्या दिशेने प्रवास सुरु झाला. आज एक नवीन दुर्गवीर किरण आपटे यांचे अधून मधून येणारे विनोद ऐकत आम्ही निघालो तिकडे पनवेल ला ३ जन येणार होते त्यांच्याशी आमचे CALL सेंटर (सुरज कोकितकर) यांची फ़ोना फोनी सुरूच होती. पुढे पनवेलला अमित शिंदे प्रज्वल पाटील भेटले. जनार्दन पैय्यर यांना ट्रेन चूकल्याने ते बस ने येणार होते. एकदाचे पोचलो नागोठणे ला तिथून सिक्स सिटर ने खांब गावात जेवण आटोपून झोपायची तयारी झाली तेव्हा तेव्हा अमित, प्रज्वल, जनार्दन येतायत हे दिसले तेव्हा आम्ही धावत जाउन जागा पकडली झोपेची अक्टिंग करत होतो तेव्हा जे काही बघीतल ते "अचानक" होत आमच्यासाठी चक्क भगवा रक्षक "विवेकानंद दळवी" हजर ना फोन ना SMS भगवा रक्षक हजर…. "अत्यंत निरुत्साह" नंतर "अचानक" चा प्रत्यय आम्हाला आला. या अचानक चा धक्का सहन करून आम्ही झोपी गेलो सकाळी चहा नाश्ता करून आम्ही टिकाव, फावड घेऊन गडाची चढाई सुरु केली जय शिवराय, हर हर महादेव च्या गजरात आम्ही गड चढलो. 
संतोष दादाच्या योजनेनुसार गडाच्या पायवाटेचे, धान्य कोठार,सदर, शिवमंदिर येथील श्रमदान होणार होते. त्यानुसार मी, सचिन रेडेकर, अमित शिंदे, जनार्दन अशी जड जड माणस पायवाटेच जड काम करणार होतो आणि प्रज्वल, सुरज, विवेकानंद, किरण आपटे हे सर्वजण सदर, धान्यकोठार,शिवमंदिर इथल काम करणार होते. त्यानुसार आम्ही आमच्या जड कामाला सुरवात केली मी पाय-यासाठी दगड शोधत होतो सचिन, अमित ते दगड योग्य जागेवर आणत होते जनार्दन त्या दगडांच व्यावस्थित नियोजन करत होता. सगळे पैलवान एकत्र येउन ताकदीसोबत "डोक्याचहि" काम करत होते. हा हा म्हणता आम्ही सर्वांनी मिळून दुस-या टप्प्यातील पाय-यांच काम यशस्वीरित्या पूर्ण केल. आम्हाला अजून काम करण्यासाठी मुबलक पानी आणि उन्हाची कमतरता हवी होती पण प्रत्यक्षात मात्र उलट होत मुबलक उन आणि पाण्याची कमतरता. त्यामुळे आमची ताकद थोडी कमी पडत होती. तोपर्यंत तिकडे उपवास किंग प्रज्वल, अचानक किंग भगवा रक्षक यांनी सुरज कोकीतकर आणि किरण आपटे यांच्या सोबत शिवपिंडीची पूजा केली. आज महाशिवरात्री होती आणि ख-या अर्थाने त्यांनी शंभू महादेवाची पूजा करून महाशिवरात्री साजरी केली. आमचे विवेकानंद बंधू तर शिवकालीन नाणे घेऊनच आले होते. ते खरे स्वराज्याचे धन आहे आणि त्याचीहि पूजा करण गरजेच होत ते त्यांनी केल. त्यांना दिलेले काम सदर, धान्य कोठार, शिवपिंडी च काम तर त्यांनी यशवीरित्या पूर्ण केलच होत. तेथे काम करतान एक साधारण ७० वर्षाचे एक आजोबा तेल फुल घेऊन मारुतीच्या मंदिरात पूजा करण्यासाठी आले होते त्यांच्या सोबत दुर्गवीरांनी मारुती मंदिराचीही साफ सफाई व पूजा केली. नंतर आम्ही आम्हाला दिलेली कामगिरी पूर्ण करत कामाला अल्पविराम दिला. भूक तर प्रचंड लागली होती. गडाचा निरोप घेत आम्ही आम्ही परतीच्या प्रवासला सुरवात केली. जेवण झाले आणि आम्ही स्टेशन च्या दिशेने निघालो निघाल्यावर मधूनच आमचे भगवा रक्षक (विवेकानंद दळवी) जसे अचानक आले तसे अचानक गायब झाले.आजच्या मोहिमेत जे दुर्गवीर काही कारणास्तव येउ शकले नाही त्यांना आम्ही खूप मिस केल 
माझ्या मनात एक इच्छा होती ती म्हणजे त्या उभ्या काताळात चिन्नि व हातोडी घेऊन पाय-या तयार कराव्यात त्यासाठी तिथे ८ - १० दिवस राहावं लागल तरी चालेल. शिवकृपेने माझी ती इच्छा लवकरच पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करतो आणि ख-या अर्थाने "अत्यंत निरुत्साह" असलेली "अचानक" भगवा रक्षक च येण आणि झालेले "अत्यंत मनासारख" झालेले काम अशी हि अत्यंत…. अचानक आणि अत्यंत…मोहीम
जय शिवराय
दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….