हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- राजा पुष्यमित्र



हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- राजा पुष्यमित्र

सम्राट अशोका नंतरच्या काळातील मौर्य राजा बृहद्रथ हा मिन्यांडर च्या आक्रमणाचा फारसा प्रतिकार करीत नसल्याचे शल्य अनेकांच्या मनात होते कदाचीत याच कारणास्तव बृहद्रथ मौर्याचा भर सभेत शिरच्छेद करण्याचा एक कट रचण्यात आला. या कार्याची पुर्तता केली ती बृहद्रथ मौर्य च्या सेनापतीने. ई.स.पु.१८४ च्या आसपास हि घटना घडली. शुंग वंशाच्या पुष्यमित्रने भर सभेत बृहद्रथ मौर्य चा शिरच्छेद करुन मौर्य साम्राज्याचा अंत केला. कदाचित जनतेच्या व सैनिकांच्या मनात बृहद्रथ मौर्य बद्दल रोष असल्याने पुष्यमित्राच्या या कृत्याचा विरोध झाला नाहि उलट पुष्यमित्रला सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळाला.तब्बल ३६ वर्ष राज्य केल्यावर ई.स.पु.१४९ व्या वर्षी आपला देह ठेवला !!

माहिती स्त्रोत :- सहा सोनेरी पाने - स्वातंत्रवीर सावरकर
छायचित्र स्त्रोत :- Internet

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….