होय आमचं या अंधाराशी जून “नातं” आहे. हे नातं आम्ही हौसेने नाही जोडलंय, ते परिस्थितीने लादलंय आमच्यावर….. आम्हीही आस लावून असतो कधीतरी आमच्या आयुष्यात प्रकाश येईल आणि आमची परिस्थिती उजळून निघेल….. #JoyOfHappiness माझे अंतरंग https://mazeantrang.wordpress.com/
"श्रेय" मिळण्यासाठी "काम" करणे म्हणजे "स्वार्थ" "कामाचे" "चीज" होण्यासाठी "झटणे" म्हणजे "परमार्थ" दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/
इतिहास अभ्यासता येतो पण भुगोल अनुभवावा लागतो….. या वाक्याची प्रचिती म्हणजे रायगड प्रदक्षिणा. गेली १६ वर्ष नियमितपणे रायगड प्रदक्षिणे चे नियोजन करणारे किरण शेलार यांच्या सोबत या वर्षी जायचा योग आला. जस परमेश्वराच्या चरणाशी आल्यावर त्याच्या उंचीची अनुभती येते तसच या रायगडाच्या पायथ्याशी केलेल्या प्रदक्षिणेनंतर रायगडाच्या उत्तुंगत्वाची अनुभूति येते. शिवरायांनी रायगड राजधानी म्हणुन निवडण्यापुर्वि रायगड परिसराचा अभ्यास केला तेच म्हणजे रायगड प्रदक्षिणा. रायगडाच्या हत्ती दरवाजाच्या खाली जाणा-या रस्त्याने पुढे जात रोप वेच्या इथे ही प्रदक्षिणा पूर्ण होते. गडाच्या सभोवतालचे संरक्षक किल्ले, व इतर परिसर पाहत जाताना शिवरायांनी पायथ्याच्या परिसरात वसवलेली वनराई हा महाराजांचा दुरदृष्टिपणा दाखवतो. यात पर्यावरणासोबतच रायगड चढाईसाठि प्रतिकुल बनविणे हा विचारसुद्धा असावा. नैसर्गिकदृष्ट्या अभेद्य असलेल्या रायगडाला परिपूर्ण राजधानीचे ठिकाण कसे बनविले असेल हे रायगड प्रदक्षिणेदरम्यान जाणवते. इतिहास आणि भूगोल किती सुरेख मिश्रण आहे ना.... इतिहास प्रत्यक्ष अनुभवता येत नाही पण भूगोल प्रत्यक्ष अनुभवल्...
Comments
Post a Comment