"देव्या"चा आवेश = देवेश……


"देव्या"चा आवेश = देवेश……

मुळात दुर्गवीर कुणी कधी एकमेकांना परकं करतच नाही. दुर्गवीर नेहमी कुटुंब म्हणून सोबत राहते. त्याच कुटुंबाचा एक "अवलिया" सदस्य म्हणजे "देव्याभाई" उर्फ "देवेशभाई सावंत" दुर्गवीर ची AK47 जी नेहमी धडधडतच असते… कधी कुणाला लहानमोठा मनातच नाही. लहानशी लहान आणि मोठ्यांशी मोठा होऊन वागण्याच्या त्याच्या कलेमुळे सगळ्यांमध्ये "फ़ेमस" आहे.

आज दुर्गवीर तर्फे शिवजयंती उत्सव "बोरीवली" येथे साजरा करण्यात येणार होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन देवेश आणि त्याचा भाऊ विशाल आणि संपूर्ण टीम(इतरांची नाव मला माहित नाहीत म्हणून त्यांची माफी मागून ) यांनी केली, अर्थातच एवढ मोठ नियोजन करताना त्यांना रात्रीची झोप सुद्धा मिळाली नसणार हे नक्की… पण दुस-या दिवशी आम्ही सर्व इतर ज्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात फारशी मदत केली नाही (निदान मी तरी काहीच मदत केली नाही…. कशी करणार पोचलोच सकाळी ११ वाजता) त्या सर्वांच आदरातिथ्य करण्यात हे सगळे तत्पर होते. कधी वाटत तरुण सळसळत रक्त आहे कुठेतरी अतिउत्साहाच्या भरात चुकतील पण कदाचित त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असावी त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात मला तरी ते कुठे अतिउत्साहीपणाच्या भरात कुठे चुकले अस वाटल नाही. या सर्व टीम ला एकत्र ठेवण्याच कार्य देवेश खरच उत्कृष्टपणे केलय. संतोष दादाची आणि देवेश ची भेट तो फक्त एक फोटोग्राफार म्हणून झाली नंतर फोटोग्राफर म्हणून तर राहिलाच पण एक शिवप्रेमी, गडप्रेमी सोबत एक कुशल संघटक म्हणून आज आमच्यासमोर उभा आहे. त्याच्यासोबत असलेल्या त्या ३०-३५ मुलांना तो एक चांगला मार्ग दाखवतोय आणि एक चांगल्या कार्यासाठी घडवतोय हे पाहून बर वाटत. दुर्गवीरमधील प्रत्येकजण आपल्या कलेचा उपयोग करून शिवकार्य इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय, त्यात देवेशच्या ह्या प्रयत्नांची खरच दाद द्यावीशी वाटते. आणि एवढ चांगल कार्य करीत असताना वागण्यात कुठलाही "Attitude" नाही. देवेश चा भाऊ विशाल तर "Stand Up Comedy" कोणालाही कितीही टेंशन असो याची Comedy सुरु ते सर्व टेंशन विसरलाच पाहिजे. असेच रहा रे कायम…

या शिवजयंतीचा कार्यक्रम नियोजनबद्धरित्या पार पडणा-या देवेश आणि त्याच्या संपूर्ण टीमच दुर्गवीर परिवारातर्फे खास अभिनंदन… भावांनो हि साथ अशीच राहुदे रे…
जय शिवराय

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….