तपस्वी...





तपस्वी...

चेहरा निर्वीकार...
उर्जा "प्रचंड" या शब्दा पलिकडची !!
धेय्य "इतिहासाचा प्रचार आणि प्रसार" !!
छायचित्रातील या व्यक्तिच्या नावातच इतिहास दडलाय ! ! "किरण शेलार"
श्री किरण शेलार दादांशी पहिली भेट आजच(१६ /८/२०१५) झाली !! वेळ उंबरखिंड दर्शन मोहिम खंडाळा पासुन डोंगर द-यातुन उंबरखिंडिच्या या परिसरातील प्रतिकात्माक स्मारकापर्यंतचा प्रवास... संपुर्ण प्रवासात किरण दादांनी त्यांच्या बोलण्यातुन इतिहास अक्षरशः डोळ्यासमोर जिवंत केला ! दुतर्फा पसरलेल्या सह्याद्रिकडे पाहिले की जणु खानाला घेरण्यासाठी शिवरायांनी नेमलेल्या ४ तुकड्यांमधील मी एक मावळा असल्याचा सतत भास होत होता. सभोवतालचा सह्याद्रि सतत साद देत होता !! या सुवर्णक्षणांची भेट दिली ती किरण दादांनी !!!

गेली १५ वर्ष उंबरखिंड मोहिमेचे आयोजन किरण दादा करतात. कोणतेही व्यावसायीकीकरण वा गाजावाजा न करता या मोहिमेचे आयोजन केले जाते! !

ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण असणा-या उंबरखिंडीचा इतिहास सर्वसामान्यांपर्यत पोचावा हा एकमेक भाबडा आशावाद डोळ्यासमोर ठेवुन दादा या मोहिमेचे आयोजन करतात ! माझ्यासोबत आलेल्याने दुस-या १०-२० जणांना घेवुन या मोहिमेत सहभागी व्हाव किंवा अशा मोहिमांचे आयोजन कराव ही हा त्यांचा उद्देश

विस हजार सैन्यांना व प्रचंड शस्त्रसाठा सोबत घेवुन कारतलब खान शिवरायांवर चाल करुन येत होता त्या कारतलब खानाला अवघ्या दोन हजार सैन्यानिशी नेस्तनाबुत करण्याचा भिमपराक्रम शिवरायांनी केला होता ! इतिहासात अत्यंत कमी वेळात प्रचंड सैन्याला नेस्तनाबुत करुन प्रचंड संपत्ती व शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेल्या लढाईचा आदर्श आजही जगभरात घेतला जातो !! या लढाईतुन शिवरायांचे संयम, वेळेचे व्यवस्थापन, आक्रमकता, क्षमाशीलता, मुत्सदीपणा हे गुण शिकण्यासारखे आहेत आणि म्हणुनच त्याच सह्याद्रित प्रत्येक पावलागणीक त्या युद्धाच्या पुर्वतयारीचे व युद्धाचे वर्णन किरण दादांच्या मुखातुन ऐकताना अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहत होते !!

प्रत्येकाने या संपुर्ण परिसरात एकदा फिरुन ती लढाई अनुभवावी !! तो क्षण अनुभवायला हवा ज्या क्षणाला महाराज स्वत: धनुष्यबाण घेवुन लढाईत उतरले होते ! तो क्षण अनुभवायला हवा ज्या क्षणाला कारतलब खान आणि रायबागन यांनी शिवरायांसमोर शरणागती पत्करली आणि शिवरायांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केल ! त्या बद्दल एकाही मोघल सरदाराचे प्राण न घेता स्वराज्यासाठी खुप सारे धन मिळवले!!

मी प्रथमच उंबरखिंडीत अशातला भाग नव्हता पण आज किरण दादांच्या मुखातुन तो इतिहास ऐकत ऐकत ह्या सह्याद्रित भटकण्याचे भाग्य मला लाभले !! धन्यवाद किरण दादा !!
जय शिवराय !

दुर्गवीर चा धीरु

उंबरखिंड लढाईचे विस्तृत वर्णन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….