मूक साक्षीदार....



होय !! मी तोच साक्षीदार आहे ज्याने लढाया लढताना पाहिलय ! पण दुर्दैवाने आज मी स्वत:च लढतोय माझ्या अस्तित्वासाठी...
ओळख पटतेय का काही ?? तोच ज्याची अनेक रुपे आहेत ! कधी मी वीरांच्या पराक्रमाची गाथा सांगत "विरगळी" रुपात असतो तर कधी पतीप्रेमाची साक्ष देत "सतिशिळा" च्या रुपात असतो !! तर कधी वचनाचा मान राखत "गद्देगळ" असा विविध रुपात असतो ! 
पण माझी "अजरामर" रुपे आज "मरणासक्त" अवस्थेत आहेत. जे वीर स्वत:च्या जीवाचा विचार न करता या मातीसाठी लढले आणि आज त्यांचा पराक्रम मातीमोल झालाय.माझ्या शेवटाला सुरुवात केव्हाच झालीय... कुणीतरी या सुरुवातीचा शेवट करा नाहितर माझी ही विविध रुपे एक आख्यायीका बनुन राहतील!
माझी आर्त हाक तुमच्या कानात गुंजण्यापेक्षा काळजाचा ठाव घेईल अशी आशा करतो ! हा "पाषाणह्रदयीपणा" सोडुन या "पाषाणाच्या" हाकेला "ओ" द्याल हीच प्रार्थना.... _/\_
http://dhiruloke.blogspot.in/
9833458151/8097519700/8655823748
www.durgveer.com

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)