सुरमयी कट्यार....




"वा !! हे तर सुंदर गाणं आहे... या पेक्षा सुंदर गाणं या चित्रपटात असुच शकत नाही".... अस वाटत न वाटत तोच दुसर एक अप्रतिम गाणं कानांना सुखावुन जात !! अशीच काहिशी अवस्था "कट्यार काळजात घुसली" हा चित्रपट पाहताना होते. एक गाणं कानात गुंजत असत तोवर अजुन एक सुरमयी गाणं कानावर पडत. चित्रपटाच्या सुरुवातीला गणेशास्तुती नंतर प्रत्येक क्षण मंत्रमुग्ध करणारा होता. चित्रपटाच्या शेवटी काय होणार हे अगोदरच माहिती होत तरीही प्रत्येक क्षणाला खिळवुन ठेवणारा हा चित्रपट खरच खुप अप्रतिम... शंकर महादेवनची अभिनयातील entry तर अप्रतिमच होती. त्यांच गाण तर सुरमयी असतच यात शंका नाही. सचिन पिळगांवर खुप शायनिंग मारत भुमिका करतात अस अनेकांकडुन मी ऐकल होत पण मला तर खांसाहेबांच्या भुमिकेत ते अगदी Perfect वाटले. कदाचित खांसाहेब हे पात्र "अहंकारी" असावं म्हणुन त्या भुमीकेत ते योग्य वाटले. सुबोध भावे तर माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहे. अमृता आणि मृण्मयी  दोघीही आपापल्या जागी "Perfect" वाटल्या चित्रपट पाहताना सर्वात जास्त भाव खावुन गेल ते चित्रपटाचे संगीत !! गाण्याचे शब्द असो की आवाज दोन्ही मनात जागा करुन राहतात!! ज्याला संगीतातल काहीही कळत नाही तो सुद्धा गाण्यातल्या एखाद्या जागेला नकळत हात उचलुन दाद देईल इतक अप्रतिम संगीत होत !! मुळात मराठी चित्रपट हे टॅाकिज मध्येच जावुन पहावेत यासाठी मी नेहमी आग्रही असतो ! याच आग्रहाखातर हा चित्रपट पाहिला आणि मलाच माझ्या निर्णयाच कौतुक वाटल. चित्रपट पाहायला माझ्या वयाचे फारसे प्रेक्षक नव्हते हे थोडे खटकले पण चित्रपट संपल्यानंतर "मराठिला चांगले दिवस आलेत आणि आपल्यासारख्या प्रेक्षकांनाही चांगले दिवस आलेत" हे वाक्य अगदी सुखावुन जात !!!

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….