जगण कसतरिच होत,


जगण कसतरिच होत,
जेव्हा आपलंच अस कोणी मन दुखावत,
तू माझा तू माझा म्हणून,
अलगदच दूर जात.....

जगण कसतरिच होत,
जेव्हा स्वार्थासाठी कोणी फसवत,
मन गुंतलय अस दाखवून,
सहजच मनातल काढून घेत....

जगण कसतरिच होत,
जेव्हा जीवनाचा अर्थ कोणी बदलत,
अगोदर मैत्रीचा अर्थ सांगुन,
नंतर मैत्रिलाच नीरर्थक बनवत.....

जगण कसतरिच होत,
जेव्हा मैत्रितच स्वार्थ दिसतो,
स्वार्थाने माखलेले हे जग,
आणि त्यात आपला मित्र दिसतो...

जगण कसतरिच होत
जेव्हा आपलच मन रडत असत,
आणि आपले म्हनवणारे त्यावेळी,
बिनदिक्त पणे दूर जातात...
जगण कसतरिच होत,
जगण कसतरिच होत.........

धिरज लोके (दुर्गवीर चा धीरु) Dhiraj Loke

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)