मी..............

मी..............
माझ हे असच असत.....................
कधी हसण असत,
तर कधी उगाचच रडण असत,
आनंदोस्तवातही तोंड रडव असत.

माझ हे असच असत.....................
समोरचा कितीही बोलो,
माझ गप्प बसन असत,
गंमतीवरही रागावन असत.

माझ हे असच असत.....................
खरया मैत्रिला न समजता,
मन दुश्मनाच्या मैत्रित असत,
अन् खरया मैत्रिचा अपमान करत असत.

माझ हे असच असत.....................
बसल्या बसल्या विचारत हरवन,
सहजच खिडकिबाहेर पाहन,
मान वळवून स्वताशिच हसन,

माझ हे असच असत.....................
ती पाहेल म्हणुन,
हळूच तिची नजर चुकवन,
जुन्या चुकिला पुन्हा घाबरण.

माझ हे असच असत.....................
कुणीतरी पाह्तय म्हणुन,
मान खाली घालून चालन,
पण नंतर हळूच प्रेमावर कविता करण.

माझ हे असच असत.....................
प्रथम खरी मैत्री शोधन,
नंतर खर प्रेम शोधन,
दोन्हींच्या भंगानंतर उगाचच रडन..

माझ हे असच असत.....................
माझ हे असच असत.....................

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)