मी........... माझे जीवन



मी........... माझे जीवन

काय माझे जीवन हे असे,
ज्याला प्रेमात पड़ने जमत नाही
मैत्रीची कास धरतोय मी,
पण प्रेमाशिवाय करमत नाही..

मैत्रीच्या शोधातिल हे मन,
प्रेमाताही कधी पडले होते,
कुणाच्या तरी दुखाविण्याने ,
चार हात दूर राहिले उभे....

मैत्रीचे शंखशिंपले,
कर्तव्याच्या जाळ्यात कधी अडकले,
कधी मैत्रीलाच प्रेम समजून,
अजाणतेपणी हे पाप केले......

कुणीतरी वाचावी,
म्हणून नव्हती कविता रचलेली,
"जी" ने ती वाचली,
ती मैत्रीपासून दूर गेली......

ती सुद्धा अशीच आलेली,
न बोलताच निघून गेली,
मी फ़क्त कविता रचली,
ना नंतर मात्र कधी आठवण काढली........

आताही जीवनाने असाच खेळ केला,
शांत बसलेल्या माझ्या मनाला,
जाणून बुजून त्रास दिला,
खुप दिवसांनी हृदयात दुखाचा हुंकार आला......

बस! थांबवायचय या चक्राला,
ज्यात दुखाची किनार हर सुखाला,
माझ्या मनात जो गैरसमज झाला,
तो तिच्याही मनात असेल का भला....

तिच्या गैरसमजाने मी का रागावालो,
नंतर मीच का तिच्यात गुन्तलो,
मी आयुष्यात पुन्हा चुकलो,
स्वताच्या नजरेतून पुन्हा उतरलो....

का मी असा चुकलो,
कर्तव्यापासून दूर गेलो,
शुद्ध मैत्रिला सोडून कुठेतरी वाहत गेलो.....

माफ कर तू मला,
चुक झाली एक क्षणाला,
मी समजावतोय या मनाला,
हे तरी कळतय का तुला......

विसर तू माझ्या चुकिला,
किती शिक्षा देशील या मनाला,
तू जो अबोला धरला,
हेच जाळी माझे मन क्षणाक्षणाला .....

बेसावध क्षणी पाय घसरला माझा,
मैत्रित अपमान केला तुझा,
मान्य आहे मला गुन्हा माझा,
दे तू मला वाटेल ती सजा......

पण, अबोला असा धरु नकोस,
मैत्रितुन तरी मला वगळू नकोस,
आयुष्यातल्या या पहिल्या चुकीचा
दाह आयुष्यभर मला देऊ नकोस.............
धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

शेवया आणि नारळाचा रस