Loading Kokan.......... खरप -कालवं...



खरप- कालवं...
हा मच्छी चा असा प्रकार आहे जो मुख्यत्वे कोकणात समुद्रकिनारी किंवा खा-या नदीकिनारी आढळतो. साधारणता एखाद्या खडबडीत व टोकेरी दगडाप्रमाणे असणा-या या "खरप" मध्ये एक चविष्ट मांसल भाग असतो. एखाद्या शिंपल्याच्या आतल्या भागात असतो तसा भाग या खरपात असतो. हे शोधताना अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता असते अन्यथा या "खरप" वर पाय पडला तर पायाला जखम होण्याचा संभव असतो. या धारधार करपाने कापल्याने झालेली जखम एखाद्या चाकुच्या वाराप्रमाणे असते. त्या "मूक जीवाच्या" स्वसंरक्षणासाठी निसर्गाने केलेली ती एक रचना आहे. एकदा कोकणात भेट देवुन "कालवांची आमटि" किंवा "मसाला फ्राय" केलेली "कालव" हा एक चविष्ट खाद्यप्रकार नक्कीच चाखुन पहा.
खरप शोधण आणि ते फोडुन त्यातील मांसल भाग काढणे हे एक किचकट काम आहे तेव्हा हे खरप काढुन आणि फोडुन विकणा-यांचा नेहमी आदर करा कारण ज्या "कोकणी माणसाला" आपण "आळशी" मानतो तो "कोकणी माणुस" हात पाय कापुन घेवुन हे काम करत असतो. छायचित्रात दिसणा-या ढिगभर खरपातुन फक्त ३-४ पेले(Cup) कालव(मांस) निघतात
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….