आभार………



आभार………


आभार त्यां माता-पित्यांचे ज्यांनी मला "माझ्या कर्तव्यपूर्ती" साठी "जन्म" दिला
आभार त्यां "दुर्गवीर" चे ज्यांनी "माझे कर्तव्य" पूर्ण करण्यासाठी "हात" दिला.
आभार त्यां "मित्रांचे" ज्यांनी "माझ्यातला मी" मला दाखवून दिला.
आभार त्या "हित शत्रूंचे" ज्यांनी माझ्या "चुकांचा पाढा" मला वाचून दिला.
आभार त्यांचे ज्यांनी "विश्वास" नसतानाही "सार्थ" ठरवून दिला.
आभार त्यांचे ज्यांनी मला "विश्वासघात" काय तो दाखवून दिला.


या जन्मदिना दिवशी अनपेक्षित शुभेच्छा… "माझा परिवार" " दुर्गवीर" चे स्नेहसंमेलन आणि नेमका माझा जन्मदिवस म्हणजे "दुग्धशर्करा" योग म्हणावा लागेल. अगदी माझ्या "बारसा" होता तेव्हाही एवढ्या लोकांनी गर्दी केली नसेल इतकी काल होती. गेल्या २८ वर्षातील सर्वात मोठा "वाढदिवस"म्हणावा लागेल. अजित दादा, प्रशांत दादा, दर्शना (प्रांजल) ताई, अर्जुन दादा, रवींद्र दादा, गौरांगी ताई, उदय दादा, अश्या दुर्गवीर च्या डोंबिवली च्या दुर्गवीरांसोबत "हड्डी तोड" कार्यक्रम आणि दिवसभर फोन लागत नव्हता म्हणून अगदी रात्री १२ वाजले तरी आणि १४ तारीख उजाडली तरी फोन मेसेजद्वारे शुभेच्छा देणा-या सर्वांचे आभार. आभार यासाठी नाही कि त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आभार यासाठी कि त्यांच्या सर्वांसाठी "हा दिवस" लक्षात ठेवून "शुभेच्छा" देण्याइतका महत्वाचा वाटला. कधी वाटत मी कमी बोलतो म्हणून "माणस" तुटतात कि काय पण दुर्गवीर सोबत गेली ४ वर्ष "कमी" बोलतो तरी नवीन मानस जोडली जातात. दुर्गवीर मध्ये मी वर्षातून एकदाच बोलतो ते म्हणजे "स्नेहसंमेलनाला" तसं आजही बोललो. जन्मदिनादिवशी किती पैसा खर्च केला त्याला महत्व नाही किती "मानस" कमावली याला महत्व आहे. मी तर बुवा १५० च्या आसपास माणसं कमावली(दुर्गवीर स्नेह्संमेलानाची उपस्थिती १५० होती) .

पुनश्च सर्वांचे आभार…
   

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….