दोस्त म्हणतो...



दोस्त म्हणतो...

विजय बेंद्रे, मेघांत आणि उमेश जाधव तीन दोस्त काय म्हणतात हे आज अनुभवल. समोर कोणता रसिकवर्ग आहे ओळखायच आणि असे काहि काव्याविष्कार सादर करायचे की अगदि अलगदपणे समोर बसलेल्यांच्या मनात जावुन बसायच.

घाटकोपर पुर्व येथे महाशिवरात्री निमीत्त काव्यवाचनाचा कार्यक्रम हा विचारच मुळी भन्नाट होता. गेल्या २-३ वर्षापासुन विजय बेंद्रेंच्या Live कार्यक्रमाला जाईन म्हणत होतो पण अचानक "(मध)माशी" शिंकायची आणि माझ जाण टळायच आज योग आलाच. तसा हा माझ्यासाठि गेल्या ८-१० वर्षातला पहिलाच काव्यवाचनाचा कार्यक्रम असावा. कॅालेज मध्ये असताना "जाम" कवीता केल्या तो "जाम" अजुन चपातीला लावुन खातोय..  

तर विजय बेंद्रे, उमेश जाधव आणि मेघांत या तिघांना आज कवीता सादर करताना करताना पाहिल आणि जाणवलं काव्य हे अस माध्यम आहे की तुम्ही क्षणात एखाद्याला आपल बनवु शकता. गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी यांनी कार्यक्रम केले आजवर शेकडो लोकांना आपलस केल असेल. तरुणाईंच्या (तरुणींच्या  ) गळ्यातील ताईत बनले असतील पण तिघांच्याहि वागण्यात गर्व नव्हता. उमेश बंधुंना मी पहिल्यांदाच भेटलो पण त्यांच्या वागण्याबोलण्यातुन तस कुठेच जाणवल नाहि. मेघांत बंधु तर धिरु दादा म्हणुन गळाभेट घेतात तेव्हा दुर्गवीरमधील कुणी भेटल्याचा भास होतो. विजय बंधु तर काय बोलायच हे "वादळच" वेगळ आहे हे समजुन घ्यायच तर त्या गतिनेच चालाव लागत. उमेश बंधुंच सुरातल सादरिकरण आणि मेघांत बंधुंचे सादरिकरणाचे सुर उत्तमच लागले होते. विजय बंधु तर रसिकांना तालावरच नाचवत होते.

घाटकोपर च्या समतानगरमधील एका रात्रमहाविद्यालयातील सरांना त्यांचा कार्यक्रम आवडला म्हणुन त्यांनी भटवाडि हिल भागात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समोर ९०% कोकणी माणस मग काय तिघांनी जा काय "धुमाशान" केल्यांनी तेका तोड नाय....  त्यात अमोल दादांची अधुन मधुन येणारी "दाद" आणि बाप-मुलीच नात समजावणारी कविता अगदि लाजवाब होत. या कार्यक्रमात रोहिणी ताई, निखील मोंडकर सर, प्रसाद हावळे, आदित्य दवणे, भरत कदम, सायली राणे यांची भेट झाली.

"दोस्त म्हणतो" च्या माध्यमातुन दुर्गवीरच्या कार्याची ओळख करुन दिली गेली त्यावेळी पटल "दोस्त म्हणतो" फक्त कवीकल्पेनत रमत नाहि तर गडसंवर्धनासारख्या सामाजिक विषयावरही विचार करतो. मेघांत बंधुंनी तर "प्रेमवीर" होवुन मुलींच्या मागे फिरण्यापेक्षा "दुर्गवीर" व्हा अस म्हटल तेव्हा त्यांचा प्रेमकवीतांएवढिच दाद उपस्थितांनी दिली.

खरच "दोस्त म्हणतो" चे कार्यक्रम तुमच्या माहाविद्यालयात किंवा एखाद्या इतर कार्यक्रमात ठेवुन बघाच. एकदा का समोर "गर्दि" दिसली की हे तीन दोस्त अशी काय "वर्दि" देतात की समोरचे पार "दर्दि होतात" एकदा ऐकाच हे दोस्त काय म्हणतायत ते !!!


Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….