इतिहासाच एक वादळ जे ७८ व्या वर्षीही घोंगावतय. ज्या वादळाला कुणी एका बंधनात बांधुन ठेवु शकत नाही…. ते वादळ घोंगावत जात…… आता तुमचा मजबुत पाया ठरवतो की तुम्ही त्या वादळासमोर कसे टिकता. तुम्ही मातीशी पाय घट्ट रोवुन असलात म्हणजे तुम्ही या वादळासमोर तग धरु शकता. हे वादळ म्हणजे श्री आप्पा परब….. आप्पांनी बोलत जाव मुक्तपणे आणि आपण घेत जाव जितकी आपली पात्रता आहे. ७८ व्या वर्षी रायगड चढुन जाताना व्यक्त होणारे आप्पा परब खर तर दोन तासाच्या कार्यक्रमात व्यक्त होणं म्हणजे मृग नक्षत्रातल्या एकुण पावसातला एक थेंब जणु... डॉ. परीक्षित शेवडे आयुर्वेद चे खरे वैद्य अगदि सोप्या भाषेत सांगायच तर आयुर्वेदाचे डॅाक्टर... WHATSAPP वरच्या आयुर्वेद व इतिहास या विषयांवरच्या अंगठेबहाद्दरांचा खरपुस समाचार घेत दोन तास चांगलेच गाजवले. छत्रपति संभाजी महाराजांच्या युद्धनितीबद्दल अगदि हलक्या फुलक्या भाषेत डॅा. परिक्षीत शेवडे यांनी सांगितले. वय वर्ष २६ अस म्हटल्यावर सभागृहाने टाळ्या वाजविल्या त्या कौस्तुभ कस्तुरे यांनी गाजवला तिसरा दिवस. बाजिराव मस्तानी आणि अटकेपार झेंडा या पलिकडे पेशवे हे फारसे परिच...
कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय" दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग https://mazeantrang.wordpress. com/ https://dhiruloke.blogspot.in/
जगात “नम्र” माणसांचे दोन प्रकार असतात एक जे मुळात “नम्र” नसतात पण सामाजिक परिस्थिती बघून “नम्रपणा” स्विकारतात आणि दुसरे जे मुळात,निसर्गतःच किंवा संस्काराने नम्र असतात. यातल्या दुसऱ्या प्रकारात मोडणारा एक व्यक्ती म्हणजे “ उमेश जाधव “. दोस्त म्हणतो च्या निमित्ताने भेट झालेल्या उमेश बंधूंचा पहिला काव्यसंग्रह “उजेडाचे डोळे ओले” च्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज जाणं झालं. पोवाडा, लावणी,मुक्तछंद, भारूड सारखे दुर्मिळ प्रकार जे आजच्या आमच्या पिढीला क्वचितच माहित असतील अश्या विविध काव्यप्रकारातील तब्बल ४३ कवितांचा अनमोल खजिना उमेश दादांनी या पुस्तकात मांडलाय. उमेश दादांच्या कवितांची समीक्षा वगैरे करण्याचं धाडस मी करूच शकत नाही तितकी पात्रता माझ्यात नाही. एक व्यक्ती म्हणून मला उमेश दादांच कौतुक करावंस वाटत. कारण तुम्ही कवी, लेखक, कलाकार म्हणून कितीही चांगले असलात तरी “माणूस” म्हणून कसे आहात हे महत्वाच असतं. उमेश दादा कवी म्हणून जितके ग्रेट आहेत तितकेच माणूस म्हणून नम्र आहेत. दोस्त म्हणतो च्या त्रिकुटातील विजय ब...
Comments
Post a Comment