शिवमय दिवाळी पहाट - २००१४



शिवमय दिवाळी पहाट - २००१४

कोण म्हणत ४ चांगली माणस एकत्र येत नाहीत… त्याला जाउन सांगा कोणीतरी !! ४ चांगली माणस एकत्र येतात जर त्यांच धेय्य आणि हेतू स्वच्छ असेल तर ते निस्वार्थीपणे एकत्र येतात.

काल रात्री १० ते १०:३० च्या दरम्यान अजित दादांचा फोन आला उद्या सकाळी बाजीप्रभू चौक डोंबिवली (पूर्व) येथे आपल्या जायचंय. तिथे आपल्या छोटासा "दीपोत्सव" साजरा करायचा आहे. पण इतक्या उशिरा पोस्ट टाकली तर कोण येईल का?? मुख्य म्हणजे कोणी ती पोस्ट वाचेल का? हा प्रश्न उभा राहिला पण नंतर त्या प्रश्नाच उत्तर शोधण्याच्या फंदात न पडता पहिली फेसबुक ला पोस्ट टाकली नंतर मिळेल ते सामान bag मध्ये भरून घेतले. आता मुख्य मुद्दा होता सकाळी ४ वाजता उठायचा. मी एकदा झोपलो को "कुंभकर्ण" पण "फिका" पडेल माझ्या समोर म्हणून फारशी रिस्क न घेता रात्रभर जाग राहायचं ठरवलं. सकाळी अजित दादांशी फोना-फोनी करून निघालो थेट भेट झाली ती बाजी प्रभू चौकात तिथे अजित दादांनी अगोदरच कामाला सुरुवात केली होती. मी हि त्यांच्या सोबत सुरुवात केली तोवर हळू हळू एक एकजण जमा होऊ लागले जो तो मिळेल ते काम करत होता. कोणी कोणाला फारसं ओळखत नव्हत पण सर्व एकत्र येउन काम करत होते. मध्येच "अनिकेत कस्तुरे" बंधू आपल्या "शॉट गन" ने फायरिंग करत होते.(Camera हो) . थोड्या वेळात मानसी पाठक (सह्याद्री प्रतिष्ठान) आपल्या कन्येसोबत तिथे आल्या त्यांनी रांगोळी ची मोहीम हाती घेतली. काही वेळातच "दुर्गसखा" चे चेतन रमेश राजगुरू (कसलं भारदस्त नाव आहे राव) हे सुद्धा आमच्यात सामील झाले. कुणी साफसफाई करत होता तर कुणी पणत्या च्या वाती बनवीत होता तर कुणी त्या योग्य जागी लावून पेटवत होता. प्रत्येकजण स्वयंस्फुर्तीने काम करीत होत. कुणी कुणाला सांगत नव्हत कि "तू हे काम कर" प्रत्येकाला माहित होत मला काय करायचं ते.……

सर्व पणत्या पेटवून झाल्यावर मानसी पाठक यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार घालून पूजा करण्यात आली. त्यानंतर "चेतन रमेश राजगुरू" यांच्या पहाडी आवाजात "बिरुदावली" झाली. त्यांच्या आवाजात इतकी जरब होती कि माझ्या अंगावर काटा येत होता. अस वाटत होत मी कुठल्यातरी लढाईवर चाललोय. बिरुदावली झाली मग "फोटूसेशन" करून आम्ही आपापल्या वाटेने निघणार होतो. मानसी ताईंनी निघाल्यावर आमची सर्वाची ओळख परेड व छोटेखानी चर्चा सत्र झाल.

बोलताना (मी एक शब्द पण बोललो नाही हे गोष्ट वेगळी) एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे प्रत्येकाला या शिवकार्यात सहभाग घ्यायचाय पण योग्य मार्ग सापडत नाहीय. त्यांना दुर्गवीर च्या मोहिमांमध्ये सहभागी व्हायचंय पण योग्य वेळी त्यांच्यापर्यंत ती मोहीम पोहोचत नाही किंवा ते दुर्गवीर पर्यंत पोहोचत नाहीत.

आजच्या मोहिमेत सहभागी झालेल्या शिवप्रेमींना माझ एक "आवाहन" आहे तुम्ही जरी प्रत्येक वेळी आमच्या सारख सुरगड, मानगड, भीमगड अश्या सलग मोहिमा करू शकत नसाल पण असे काही उपक्रम जे आपल्याला आपल्या डोंबिवलीत राहून करता येतील जशी कि हि दिवाळी पहाट, गुढीपाडवा, एखाद्या योध्यांची जयंती वगैरे हे आणि अनेक धार्मिक / सांस्कृतिक सणांच औचित्य साधून आपण शिवप्रेमी म्हणून एकत्र येउन असे काही कार्यक्रम आयोजित करू कि लोकांमध्ये / शालेय -महाविद्यालयीन मुलां-मुलींमध्ये आपले गड-किल्ले, इतिहास, संस्कृती याबद्दल जनजागृती होईल.

एक शिवप्रेमी म्हणून मी आशा करतो या आणि अश्या अनेक शिवप्रेमींच्या साथीने आपण आपला इतिहास वाचवू शकतो व नवा इतिहास घडवू शकतो.


जय शिवराय

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….