"धुळवड भगव्याची"

"धुळवड भगव्याची" आज दि.२७/३/२०१३ रोजी दुर्गवीर ची एकदम अचानक ठरलेली सुरगड मोहीम ख-या अर्थाने "धुळवड भगव्याची" ठरली. मुंबईत सर्वजण "बुरा ना मानो होली है" म्हणत रंगांची धुळवड खेळत होते तेव्हा आम्ही ९ दुर्गवीर सूरगडावर भगव्याची धुळवड खेळत होतो. अगोदर सूरगडाच्या बुरुजावर भगवे निशाण फडकवून आणि नंतर सूरगडवरून खाली उतरताना संपूर्ण जंगलाच्या वाटेवर लाल मातीची धुळवड खेळत आम्ही आजची मोहीम पूर्ण केली. प्रथम अचानक ठरलेली मोहीमइतर दुर्गवीरांना न सांगता आम्ही ठरवली त्याबद्दल आम्ही ९ जण क्षमस्व. खर तर मला रात्री ९:३० ला संतोष दादाचा फोन आला सूरगड ला जायचं फार विचार न करता मी किती वाजता येउन आणि कुठे येउन हे विचारलं. मग ठरलं सायन ला रात्री ११ ला भेटायचं मी ५ -६ जणांना SMS केला प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार ८ जणांना तयार करायचं होत. सचिन रेडेकर -सुरज कोकितकर हि कोल्हापुरी जोडी लगेच तयार झाली. प्रशांत वाघरे, संतोष दादा, अनिकेत तमुचे दादा तर अगोदरच तयार होते. ६ जण असेच तयार झाले. मी जेवून निघाल...