Posts

कोकणी भात बोकणी....

Image
कोकणी भात बोकणी.... हे वाक्य फार पुर्वीपासुन ऐकत आलो पण त्याचा अर्थ आता उमगतोय. महाराष्ट्रातील इतर प्रांतात जेवढा भात वर्षाला खातात तेवढा भात कोकणी माणुस महिण्याला खातो(ही अतिशयोक्ती नाही बरं...) पण भातच का ? चपाती, भाकरी, किंवा अजुन का नाही याला कारण अनेक आहेत १. कोकणात तांदुळ हे उत्पादन सहजतेने येणारे उत्पादनआहे. त्याला पण मेहनत लागते हा. नाहितर सहजतेने म्हणजे अगदि रान उगवल्यासारख तांदुळ उगवत नाहि मळ्यात. २. चपातीसाठी लागणारा गहु क्वचितच कोकणात पिकतो किंबहुना पिकतच नाहि. याला बरीच नैसर्गिक किंवा आर्थिक कारणे असु शकतात. ३. कोकणातील वातावरण हे समुद्रकिणा-यावरील उष्ण असे आहे ह्या वातावरणात चपाती किंवा भाकरी पेक्षा भात शरिरासासाठी हलका असतो. याच अजुन एक उदाहरण म्हणजे दक्षिण भारतात जास्त करुन तांदळाचे पदार्थ बनविले जातात कारण तिथल आणि कोकणातील हवामान जवळपास सारखच आहे. आणि हे स्पष्ट करणारा दुवा म्हणजे "समुद्रकिनारा" ४. पुर्वापार कोकणात बनविण्यात येणारे खाद्यपदार्थ हे त्या भागात येणा-या उत्पादनावर अवलंबुन आहे. तांदळापासुन पोहे, घावणे अगदि कनीपासुन भाकरी सुद्धा बनविल...

Loading Kokan.......... खरप -कालवं...

Image
खरप- कालवं... हा मच्छी चा असा प्रकार आहे जो मुख्यत्वे कोकणात समुद्रकिनारी किंवा खा-या नदीकिनारी आढळतो. साधारणता एखाद्या खडबडीत व टोकेरी दगडाप्रमाणे असणा-या या "खरप" मध्ये एक चविष्ट मांसल भाग असतो. एखाद्या शिंपल्याच्या आतल्या भागात असतो तसा भाग या खरपात असतो. हे शोधताना अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता असते अन्यथा या "खरप" वर पाय पडला तर पायाला जखम होण्याचा संभव असतो. या धारधार करपाने कापल्याने झालेली जखम एखाद्या चाकुच्या वाराप्रमाणे असते. त्या "मूक जीवाच्या" स्वसंरक्षणासाठी निसर्गाने केलेली ती एक रचना आहे. एकदा कोकणात भेट देवुन "कालवांची आमटि" किंवा "मसाला फ्राय" केलेली "कालव" हा एक चविष्ट खाद्यप्रकार नक्कीच चाखुन पहा. खरप शोधण आणि ते फोडुन त्यातील मांसल भाग काढणे हे एक किचकट काम आहे तेव्हा हे खरप काढुन आणि फोडुन विकणा-यांचा नेहमी आदर करा कारण ज्या "कोकणी माणसाला" आपण "आळशी" मानतो तो "कोकणी माणुस" हात पाय कापुन घेवुन हे काम करत असतो. छायचित्रात दिसणा-या ढिगभर खरपातुन फक्त ३-४ पेले(Cup) कालव(...

(अखंड) महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.... (चार आणे पडलेल्या अणेच्या नाकावर टिच्चून)

Image
(अखंड) महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा..... (चार आणे पडलेल्या अणेच्या नाकावर टिच्चून) ब-याच दिवसांपासुन कुणीतरी १ आण्याची किंमत नसलेल्या "अणे" नावाच्या विकृत माणसाची बडबड ऐकतोय!! काय तर म्हणे स्वतंत्र विदर्भ हवा यासाठी महाराष्ट्राच्या नकाशाच्या आकाराचा केक कापणे, स्वतंत्र विदर्भाचा नकाशा, झेंडा तयार करणे पासुन महाराष्ट्र दिनाच्या विरोधात घोषणा देणे वगैरेंसारखी नौटंकी करण्याइतपत यांची मजल गेलीय. आणि आपल सरकार का यांचा "माज" सहन करतय कुणास ठावुक !! एका बाजुला बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी पिढ्यांच्या पिढ्या आपले सर्वस्व अर्पण करीत असताना दुसरीकडे ही स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारी लांडग्यांची औलाद किती हा विरोधाभास !! स्वतंत्र महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करणारे ते १०६ आत्मे नक्कीच हळहळत असतील एक दिवस हेच दिवस पाहण्यासाठीच का हे बलिदान दिले होते असा प्रश्न त्यांना नक्की पडला असेल !! इकडे बेळगावात कर्नाटक सरकार करत असलेले अत्याचार सहन करुनही महाराष्ट्रातच येण्यासाठी धडपडणा-या गेल्या अनेक पिढ्या आणि सध्याची तरुणाई या सर्वांना नक्की प्रश्न पडला अ...

ज्ञानभाषा मराठी

Image
ज्ञानभाषा मराठी लाभले आम्हास भाग्य बोलते मराठी...... खरच प्रत्येक मराठी माणसाच भाग्य आहे की त्याला वैभवसंपन्न मराठी भाषा बोलण्याची संधी मिळालीय... आज गुढिपाडव्याच्या निमित्ताने डोंबिवली येथे सुचीकांत वनारसे यांनी स्थापन केलेल्या "ज्ञानभाषा मराठी" समुहाच्या रथासोबत गुढिपाडवा प्रभात फेरीत सहभाग घेतला, तेव्हा प्रकर्षाने जाणवल की "ज्ञानभाषा" मराठी का असावी किंवा मातृभाषेतुनच शिक्षण का असावं ?? रथ यात्रेदरम्यान वृषाली ताई आणि प्रियंका ताई ज्या उत्साहाने बोलत होत्या तो उत्साह पाहुन त्यांची या विषयाबद्दलची तळमळ जाणवत होती. "मराठी चा आग्रह" हा मुद्दा तर होताच पण "मातृभाषेतुन शिक्षण" हा मुद्दा मला जास्त भावला. मराठितुनच शिक्षण घ्यायला हवे हा मुद्दा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिल पण मातृभाषेतुन शिक्षण हा मुद्दा कदाचित देशव्यापी असु शकतो किंबहुना तो देशव्यापी व्हावा कारण मातृभाषेतुन दिलेले शिक्षण हे बाल्यावस्थेत आकलनासाठि सर्वात सोपे असते हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाल आहे. इंग्रजी भाषेचे माजलेले स्तोम आज प्रत्येक मातृभाषेला गिळंकृत करीत आहे त्यासाठी...

संस्कार इतिहासाचे…

Image
मुलगा :- बाबा काय आहे हे ? वडिल :- अरे बाळा हे शिवकालीन पैसे आहेत हे ! मुलाग :- दिसायला खुप छान आहेत हे !! वडिल :- हो ! ह्याच "मोल" पण तितकच "महान" आहे ! मुलगा आश्चर्य, कुतूहुल आणि कौतुक या भावनेने शिवकालीन नाणी न्याहाळु लागला !!! आज खरी गरज आहे मुलांना इतिहासाची "किंमत" नाही तर त्याचे "मोल" काय आहे ह्याची जाणीव करुन द्यायची. लहान मुल हा एक मातीचा गोळा आहेत जसा घडवाल तसा घडणार आता आपण या गोळ्याच "ज्ञानमय कुपी" बनवायच की "कुसंगतीतील दगड" बनवायच हे आपल्या संस्कारावर अवलंबुन आहे. पोकेमॅान, डोरेमॅानच्या मागे लागणा-या या पिढिला शिवराय शिकवले तर ती ख-या अर्थाने "शिवजयंती" असेल ! जय शिवराय ! छायाचित्रकार :- प्रशांत वाघरे स्थळ :- दुर्गवीर प्रतिष्ठान शिवकालीन नाणी प्रदर्शन- मुंबई http://www.durgveer.com/ दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

आभार………

Image
आभार……… आभार त्यां माता-पित्यांचे ज्यांनी मला "माझ्या कर्तव्यपूर्ती" साठी "जन्म" दिला आभार त्यां "दुर्गवीर" चे ज्यांनी "माझे कर्तव्य" पूर्ण करण्यासाठी "हात" दिला. आभार त्यां "मित्रांचे" ज्यांनी "माझ्यातला मी" मला दाखवून दिला. आभार त्या "हित शत्रूंचे" ज्यांनी माझ्या "चुकांचा पाढा" मला वाचून दिला. आभार त्यांचे ज्यांनी "विश्वास" नसतानाही "सार्थ" ठरवून दिला. आभार त्यांचे ज्यांनी मला "विश्वासघात" काय तो दाखवून दिला. या जन्मदिना दिवशी अनपेक्षित शुभेच्छा… "माझा परिवार" " दुर्गवीर" चे स्नेहसंमेलन आणि नेमका माझा जन्मदिवस म्हणजे "दुग्धशर्करा" योग म्हणावा लागेल. अगदी माझ्या "बारसा" होता तेव्हाही एवढ्या लोकांनी गर्दी केली नसेल इतकी काल होती. गेल्या २८ वर्षातील सर्वात मोठा "वाढदिवस"म्हणावा लागेल. अजित दादा, प्रशांत दादा, दर्शना (प्रांजल) ताई, अर्जुन दादा, रवींद्र दादा, गौरांगी ताई, उदय दादा, अश्या दुर्गवीर च्या डोंबिवली च...

दोस्त म्हणतो...

Image
दोस्त म्हणतो... विजय बेंद्रे, मेघांत आणि उमेश जाधव तीन दोस्त काय म्हणतात हे आज अनुभवल. समोर कोणता रसिकवर्ग आहे ओळखायच आणि असे काहि काव्याविष्कार सादर करायचे की अगदि अलगदपणे समोर बसलेल्यांच्या मनात जावुन बसायच. घाटकोपर पुर्व येथे महाशिवरात्री निमीत्त काव्यवाचनाचा कार्यक्रम हा विचारच मुळी भन्नाट होता. गेल्या २-३ वर्षापासुन विजय बेंद्रेंच्या Live कार्यक्रमाला जाईन म्हणत होतो पण अचानक "(मध)माशी" शिंकायची आणि माझ जाण टळायच आज योग आलाच. तसा हा माझ्यासाठि गेल्या ८-१० वर्षातला पहिलाच काव्यवाचनाचा कार्यक्रम असावा. कॅालेज मध्ये असताना "जाम" कवीता केल्या तो "जाम" अजुन चपातीला लावुन खातोय..    तर विजय बेंद्रे, उमेश जाधव आणि मेघांत या तिघांना आज कवीता सादर करताना करताना पाहिल आणि जाणवलं काव्य हे अस माध्यम आहे की तुम्ही क्षणात एखाद्याला आपल बनवु शकता. गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी यांनी कार्यक्रम केले आजवर शेकडो लोकांना आपलस केल असेल. तरुणाईंच्या (तरुणींच्या   ) गळ्यातील ताईत बनले असतील पण तिघांच्याहि वागण्यात गर्व नव्हता. उमेश बंधुंना मी पहिल्यांदाच भेटलो पण त्...