Posts

आभार………

Image
आभार……… आभार त्यां माता-पित्यांचे ज्यांनी मला "माझ्या कर्तव्यपूर्ती" साठी "जन्म" दिला आभार त्यां "दुर्गवीर" चे ज्यांनी "माझे कर्तव्य" पूर्ण करण्यासाठी "हात" दिला. आभार त्यां "मित्रांचे" ज्यांनी "माझ्यातला मी" मला दाखवून दिला. आभार त्या "हित शत्रूंचे" ज्यांनी माझ्या "चुकांचा पाढा" मला वाचून दिला. आभार त्यांचे ज्यांनी "विश्वास" नसतानाही "सार्थ" ठरवून दिला. आभार त्यांचे ज्यांनी मला "विश्वासघात" काय तो दाखवून दिला. या जन्मदिना दिवशी अनपेक्षित शुभेच्छा… "माझा परिवार" " दुर्गवीर" चे स्नेहसंमेलन आणि नेमका माझा जन्मदिवस म्हणजे "दुग्धशर्करा" योग म्हणावा लागेल. अगदी माझ्या "बारसा" होता तेव्हाही एवढ्या लोकांनी गर्दी केली नसेल इतकी काल होती. गेल्या २८ वर्षातील सर्वात मोठा "वाढदिवस"म्हणावा लागेल. अजित दादा, प्रशांत दादा, दर्शना (प्रांजल) ताई, अर्जुन दादा, रवींद्र दादा, गौरांगी ताई, उदय दादा, अश्या दुर्गवीर च्या डोंबिवली च...

दोस्त म्हणतो...

Image
दोस्त म्हणतो... विजय बेंद्रे, मेघांत आणि उमेश जाधव तीन दोस्त काय म्हणतात हे आज अनुभवल. समोर कोणता रसिकवर्ग आहे ओळखायच आणि असे काहि काव्याविष्कार सादर करायचे की अगदि अलगदपणे समोर बसलेल्यांच्या मनात जावुन बसायच. घाटकोपर पुर्व येथे महाशिवरात्री निमीत्त काव्यवाचनाचा कार्यक्रम हा विचारच मुळी भन्नाट होता. गेल्या २-३ वर्षापासुन विजय बेंद्रेंच्या Live कार्यक्रमाला जाईन म्हणत होतो पण अचानक "(मध)माशी" शिंकायची आणि माझ जाण टळायच आज योग आलाच. तसा हा माझ्यासाठि गेल्या ८-१० वर्षातला पहिलाच काव्यवाचनाचा कार्यक्रम असावा. कॅालेज मध्ये असताना "जाम" कवीता केल्या तो "जाम" अजुन चपातीला लावुन खातोय..    तर विजय बेंद्रे, उमेश जाधव आणि मेघांत या तिघांना आज कवीता सादर करताना करताना पाहिल आणि जाणवलं काव्य हे अस माध्यम आहे की तुम्ही क्षणात एखाद्याला आपल बनवु शकता. गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी यांनी कार्यक्रम केले आजवर शेकडो लोकांना आपलस केल असेल. तरुणाईंच्या (तरुणींच्या   ) गळ्यातील ताईत बनले असतील पण तिघांच्याहि वागण्यात गर्व नव्हता. उमेश बंधुंना मी पहिल्यांदाच भेटलो पण त्...

कन्हैया कुमार.... (Updated Version of Kejriwal & Hardik Patel)

Image
कन्हैया कुमार.... (Updated Version of Kejriwal & Hardik Patel) कन्हैया कुमारच जेल मधुन सुटका झाल्यावरच भाषण ऐकल ! छान वाटल अतिशय मुद्देसुद आणि शांतपणे भाषण केल किंबहुना आपल मत मांडल. भविष्यात एक चांगला राजकारणी होणार इतक नक्कि (भविष्यात कशाला आत्ताच) या मुलाचा फोकस क्लिअर आहे. त्याने जे ठरवलय तसच तो वागतोय. सध्या त्याच लक्ष्य ABVB, भाजप, संघ आणि मोदि हे आहे. त्याच्या संपुर्ण भाषणात त्याने आपला फोकस यावरच ठेवला होता. फक्त JNU पुरता विचार करायचा तर तिथे अगदि कमी फरकाने तिथल्या निवडणुकांचा निकाल लागला. त्याने घेतलेले मुद्दे कोणते ? तर रोहित वेमुल्ला ची आत्महत्या, भाजपाच हिंदूत्वाच राजकारण, परिणाम सरकारच अपयश. त्याच्या म्हणन्यानुसार त्याला देशातच आझादि हवीय म्हणजे ज्या देशात तो देशद्रोहाचा आरोप (खरा खोटा माहित नाही ) लागुनही पुन्हा कॅालेज कॅंपस मध्ये मुक्तपणे वावरतोय, घोषणा देतोय त्या देशात त्याला आझादि हवीय बर कशासाठी तर देशात सुधारणा घडवायचीय, जातीभेद नष्ट करायचाय. छान !! हे विचार ऐकुन प्रभावित व्हायला होत. पण लगेच एक मुद्दा लक्षात येतो जर जातीभेद नष्ट करायचाय तर लाल झेंडा, न...

अंधश्रद्धा आणि नास्तिकता

Image
अंधश्रद्धा आणि नास्तिकता "अंधश्रद्धा आणि नास्तिकता" या दोन शब्दांमध्ये एक पुसटशी रेषा आहे ! ह्या रेषेचे गणित चुकल की सुरु होतो प्रवास, एक तर "फसवणुकीकडे किंवा अराजकतेकडे"... जर तुम्ही सरसकट सर्व धार्मिक गोष्टि "भोळ्या भाबडेपणाने" किंबहुना "भक्तीभावाने" सहन करत गेलात तर एक वेळ अशी येते की हाच तुमचा "भोळा भाबडा भक्तीभाव" तुम्हाला "फसवणुकीकडे" नेतो. दुस-या बाजुने सर्व संस्कृती, देव, धर्म, सरसकट "थोतांड" आहे अस म्हणुन त्याला दोष देवु लागलात की तुम्ही "नास्तिक" म्हणुन तुमची हेटाळणी केली जाते. कुणी तुम्हाला तुमच्या "भक्तीभावाचा" आधार घेवुन फसवतोय हे माहित नसलेला एक समाजिक वर्ग आहे तर दुस-या बाजुला स्वत:ला "नास्तिक" म्हणवुन घेण्यात धन्यता माननारा एक वर्ग आहे. तस पाहता हे दोन्ही वर्ग धोकादायक ! दोघेही संस्कृतीची विटंबना करतात एक अविचाराने आणि एक अतीविचाराणे ! काही धार्मिक स्थळांना नुकतीच भेट दिली असता आलेले अनुभव ! इथे कोणत्याही धार्मिक स्थळाचा उल्लेख करुन वाद निर्माण करायची मुळीच इच्छ...

मूक साक्षीदार....

Image
होय !! मी तोच साक्षीदार आहे ज्याने लढाया लढताना पाहिलय ! पण दुर्दैवाने आज मी स्वत:च लढतोय माझ्या अस्तित्वासाठी... ओळख पटतेय का काही ?? तोच ज्याची अनेक रुपे आहेत ! कधी मी वीरांच्या पराक्रमाची गाथा सांगत "विरगळी" रुपात असतो तर कधी पतीप्रेमाची साक्ष देत "सतिशिळा" च्या रुपात असतो !! तर कधी वचनाचा मान राखत "गद्देगळ" असा विविध रुपात असतो !  पण माझी "अजरामर" रुपे आज "मरणासक्त" अवस्थेत आहेत. जे वीर स्वत:च्या जीवाचा विचार न करता या मातीसाठी लढले आणि आज त्यांचा पराक्रम मातीमोल झालाय. माझ्या शेवटाला सुरुवात केव्हाच झालीय... कुणीतरी या सुरुवातीचा शेवट करा नाहितर माझी ही विविध रुपे एक आख्यायीका बनुन राहतील! माझी आर्त हाक तुमच्या कानात गुंजण्यापेक्षा काळजाचा ठाव घेईल अशी आशा करतो ! हा "पाषाणह्रदयीपणा" सोडुन या "पाषाणाच्या" हाकेला "ओ" द्याल हीच प्रार्थना.... _/\_ http://dhiruloke.blogspot.in/ 9833458151/8097519700/8655823748 www.durgveer.com

सुरमयी कट्यार....

Image
"वा !! हे तर सुंदर गाणं आहे... या पेक्षा सुंदर गाणं या चित्रपटात असुच शकत नाही".... अस वाटत न वाटत तोच दुसर एक अप्रतिम गाणं कानांना सुखावुन जात !! अशीच काहिशी अवस्था "कट्यार काळजात घुसली" हा चित्रपट पाहताना होते. एक गाणं कानात गुंजत असत तोवर अजुन एक सुरमयी गाणं कानावर पडत. चित्रपटाच्या सुरुवातीला गणेशास्तुती नंतर प्रत्येक क्षण मंत्रमुग्ध करणारा होता. चित्रपटाच्या शेवटी काय होणार हे अगोदरच माहिती होत तरीही प्रत्येक क्षणाला खिळवुन ठेवणारा हा चित्रपट खरच खुप अप्रतिम... शंकर महादेवनची अभिनयातील entry तर अप्रतिमच होती. त्यांच गाण तर सुरमयी असतच यात शंका नाही. सचिन पिळगांवर खुप शायनिंग मारत भुमिका करतात अस अनेकांकडुन मी ऐकल होत पण मला तर खांसाहेबांच्या भुमिकेत ते अगदी Perfect वाटले. कदाचित खांसाहेब हे पात्र "अहंकारी" असावं म्हणुन त्या भुमीकेत ते योग्य वाटले. सुबोध भावे तर माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहे. अमृता आणि मृण्मयी    दोघीही आपापल्या जागी "Perfect" वाटल्या चित्रपट पाहताना सर्वात जास्त भाव खावुन गेल ते चित्रपटाचे संगीत !! गाण्याचे शब्द...

"असहिष्णू" 'हिंदुस्थानातील' "गरीब" 'अमीर'

Image
ज्या अमिर खानच्या पत्निला देश असुरक्षित वाटतो त्या दोघांसाठी एक पत्र ..... अमीर खर तर तुला इतर वेळी पत्र लिहिल असत तर माझे अंतरंगातुन तुला "प्रिय अमीर" अस लिहिल असत पण तुझ्या "देश सोडण्याच्या " वक्तव्यानंतर तुला प्रिय म्हणायची अजिबात इच्छा नाही. तुझा राजा हिंदुस्तानी (हिंदुस्तानी बर का!) असो वा तारे जमीन तुझा प्रत्येक चित्रपट मी आवडीने पाहिला. राजा हिंदुस्तानी मधील तुझा "कम कम मॅडम" जोक अजुनही मारावास वाटतो! मी स्वतः शिक्षक असताना तुझा तारे जमीन पर पाहिला आणि Every Child is Special अस म्हणत मुलांना शिकवताना मारणं सोडुन दिल!! तुझा रंग दे बसंती पाहिला की अंगावर आजही शहारे येतात ! तुझ्या थ्री इडियट मधल्या मैत्रीला आजही मानतो ! तुझा भुवन तर भेजे से निकलताही नही! सत्यमेव जयते आणि Increditable India असणारा हिंदुस्तान तुला आज परका असहिष्णु कसा काय वाटायला लागला ! तोही गेल्या ८-१० महिण्यात !! अनेक लेखकांनी,कवींनी पुरस्कार वापसी केली मी काहिच बोललो नाही कारण मी त्यांची पुस्तक किंवा लिखान पैसे देवुन वाचल नव्हत पण तुझे चित्रपट मी पैसे मोजुन पाहिले ते फक्त तुझ्या...