Posts

ध्यास गडसंवर्धनाचा आणि ध्यास शिक्षणाचा

Image
ध्यास गडसंवर्धनाचा आणि ध्यास शिक्षणाचा   या फोटोत दिसणा-या दोन व्यक्ती आजवरच्या माझ्या आयुष्यातील २ वेगवेगळ्या क्षेत्रातील आदरणीय / आदर्श व्यक्ती.  प्रथम दोन्ही व्यक्तींची ओळख डावीकडील संतोष दादा दुर्गवीर प्रतिष्ठान (परिवार) चे अध्यक्ष पण ते आमच्या सर्व दुर्गवीर आणि वीरांगणांसाठी "संतोष दादा" आणि उजवीकडील श्री.  धन्वी सर  घेरासुरगड च्या पायथ्याशी असलेल्या खांब गावातील "नवजीवन शिक्षण प्रसारक  मंडळाचे श्री रामचंद्र गणपत पोटफोडे (मास्तर) विद्यालय, खांब"  या शाळेतील एक शिक्षक  प्रथम संतोष दादा बद्दल, माझी आणि संतोष दादाची पहिली भेट  २६ फेब्रुवारी २०१२   सुरगड मोहिमेच्या वेळी.  आदल्या रात्री म्हणजे २५ फेब्रुवारी २०१२ रोजी रात्री संतोष दादा मारुती मंदिरात दुस-या दिवशीच्या मोहिमेत काय काय काम करायचं हे सांगत होता.  ते ऐकताना मला स्वताला जाणवत होत कि, बस हेचे ते शिवकार्य  जे आपल्याला आता आयुष्यभर करायचं आहे.  दादाचा एक एक शब्द मी मन लावून ऐकत होतो. त्याच्या बोलण्यात अस कुठे जाणवत नव्हत कि आपल्...

प्रेमांकुर

Image
(एक मुलगा पहिल्यांदाच एक मुलीच्या प्रेमात पडलाय न ओळख ना पाळख लांबूनच तिला पाहून आपल्या भावना व्यक्त करतोय त्या अश्या) प्रेमांकुर.. प्रेमांकुर हा अचानक फुलू पाहतोय आज, प्रेम झरोका बेधुंद उडू पाहतोय आज मन माझे या प्रेमरंगात बुडू पाहतेय आज, त्या रंगात प्रेमात तुला भिजवू पाहतेय आज..... जागेपणी तुझ्या स्वप्नात हरवू पाहतोय आज, स्वप्नातच तुझा कोमल स्पर्श अनभवू पाहतोय आज स्पर्शाने तुझ्या बहरु पाहतोय आज, बहरणारा हा स्पर्श तुला देऊ पाहतोय आज.... चोरून हळूच तुला मी पाहतोय आज, पाह्ताना तुझ्यात हरवून जातोय आज तुझ्याच रंगात रंगतोय आज,  या प्रेमाची धुळवड खेळतोय आज ठरवून पक्क्के अन रोखून श्वास आज, प्रेमाचे मागणे तुला  घालीन आज नाही मानलीस तर थांबेन आज, उद्या पुन्हा तुझ्या प्रेमाच सजवेन साज  दुर्गवीर चा धिरु  (प्रकाशनाचे प्रथम हक्क  http://www.premrang.com/   कडे)  माझे अंतरंग    http://dhiruloke.blogspot.in/

मैत्र जीवांचे... क्षण हास्याचे!!!

Image
मैत्र जीवांचे क्षण हास्याचे  तुम्हा शिवाय ना  लाभती मजसी हे क्षण प्रेमाचे  नाते नसले आपुले जरी रक्ताचे  धेय्य आम्हास असे  फक्त शिवकार्याचे  फक्त शिवकार्याचे माझ्या दुर्गवीर बंधुसाठी….  दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

स्वप्न शिवरायांच :- "तरुणांनो संघटीत व्हा!!!!"

Image
काल सहजच विचार आला खरच किती बर झाला असत माझ आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संवाद साधता आला असता तर सर्व मनात साचलेल राजेंच्यापाशी मांडल असत ………  अन खरच राजे आले  समोर काळा  कुट्ट अंधार अचानक त्या अंधारात एक तेजोमय आकृती इतकी तेजोमय कि मी पाहू शकत नाही (तसही या कलियुगात कुणाची कुवत नाहीय ते तेज पाहण्याची). डोळ्यांना त्रास होतो म्हनून मी मान झुकवून तसाच उभा राहिलो तेव्हा जाणवलं ते तेज होत माझ्या शिवरायांच……… राजे तुम्ही तुमच्या या भक्ताच्या विनंतीला मान देऊन आलात?  मी म्हटलं….  मुजरा राजे…. राजे थेट बोलले "बोल तुला काय बोलायचे आहे ते!! " मी म्हटलं राजे तुम्ही आलात बर झाल सगळीकडे जो बाजार चाललाय तो थांबवा…  पहा राजे हा चाललेला गलिच्छ कारभार!! कुणी ब्राम्हण - मराठा वाद घालतंय तर कुणी दादोजी कोंडदेव यांच्यावर नको नको ते बरळतय… कुणी जाती पातीवर राजकारण करून आपल्या पोटाची खळगी भरतय तर कुणी स्वताला हिंदूचा तारणहार म्हणवून मोठ होतंय…. कुणी सावरकरांची टिंगल करत तर कुणी थेट राजे तुमची जात काढतय …. कु...

सर तुम्ही कायम स्मरणात रहाल…

Image
  (खर तर हि पोस्ट फेसबुक वर टाकावी कि टाकू नये याचा मी विचार करत होतो. पण मोनीश दादाशी बोलल्यानंतर मी हि पोस्ट टाकायची ठरवलं. धन्यवाद मोनीश दादा…   माझ्या आयुष्याला एक वेगळे वळण देणारा गुरु पवनपुत्र जिम चे सर चंद्रकांत चाळके आज याचं आज निधन झाल. त्यांच्या बद्दल मला लिहावास वाटल म्हणून हे लिखाण करतोय जेणेकरून मनाचा भार थोडा हलका होईल)  सर तुम्ही कायम स्मरणात रहाल…  ( https://www.facebook.com/PawanPutraBodybuildingAssociation ) आज माझ्या आयुष्यातील एक वाईट दिवस म्हणावा लागेल आमच्या डोंबिवली येथील पवनपुत्र जिम चे सर आमच्यात नाहीत. खर तर दोन वर्षापासून आमची ओळख दोन वर्षापूर्वी मी माझा मित्र सचिन सोबत जिम सुरु करायचं  ठरवल तेव्हा वेगळ वाटत होत.  माझी शरीरयष्टी तर अगदीच काटक होती.  अगदी सुकडा होतो म्हटल तरी चालेल किमान वजन ४८ - ४९. मी जिम करणार म्हटल्यावर लगेच हसू येईल अशी शरीयष्टी. पण सरांनी आपलेपणाने खांद्यावर हात टाकला आणि म्हटले काय नाय रे लोके भल्या भल्या ची होते बॉडी.  तू फक्त रेगुलर येत जा, खान-पिण व्यवस्थित ठेव...

शिवकृपा…

Image
शिवकृपा… आज दि. १२ / ५ / २०१३ रोजी  परंपरेनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते तसे आम्हा शिवप्रेमीना वर्षाचे ३६५ दिवस शिवमय असतात त्यानिमित्त आम्ही मानगड येथे मोहिमेचे आयोजन केले.  हो नाही हो नाही करता करता मी आशिष पवार,  गौरव, सुरज कोकितकर असे चार जण जाणार हे पक्क झाल. ठरल्याप्रमाणे आम्ही कुर्ला स्टेशन ला भेटलो रात्री २:३० वाजताची एस. टी. होती खूप वेळ वाट पहिल्यानंतर एकदाची ST आली पण ST ला एवढी गर्दी होती आमच्या अगोदर चा माणूस त्या ST च्या दरवाजांच्या काचेवर होता त्यापुढे फारशी रिस्क न घेत बस मध्ये न बसण्याचा निर्णय घेतला तरी आशिष च्या योजनेनुसार आम्ही टपावरून प्रवास करायचा विचार केला पण नशीब तो सत्यात नाही उतरला. नंतर आम्ही मिळेल ते वाहन पकडून पुढचा प्रवास करायचा अस ठरवलं मग रिक्षा ने पुढे  गेलो तिथून पुढे मानगड - निजामपूरपर्यंत जायचं होत त्यासाठी येणा-या प्रत्येक गाडी ला हात दाखवून लिफ्ट मागत होतो.  काय पण आमचा उत्साह  रात्रीच्या २:३० वाजता आम्ही हाय वे वर उभे राहून लिफ्ट मागतोय का तर मानगड ला जायचाच…. (गडावर जायला काय पण, कध...

आठवण

Image
आठवण आयुष्याच्या या रम्य पहाटे  आठवणींचा सूर्य उगवे हा  बेधुंध होई मन माझे  तुझ्याशिवाय करमे ना…  कुणासाठी मी झुरणे, हे मला पटले नसते तुझ्या आठवणीच्या शिवाय जगणे हेच मला खटकले असते राविकीरनाच्या आगमनाने दवबिंदूही विरून जातो थोड्याश्या या सुखागमनाने जुना दुख ओघ सरुन जातो तुझ्या आठवणीत रमणे हेच आता माझे जिणे जणू पावसाच्या आगमनाची चातकाची वाट पाहणे आज अस कस काय घडल जुन्या आठवणीनित मन रडल सुखाच्या या राखीव क्षणी परतीसाठी हे मन सरसावले दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/