माझे वचन


(आता या प्रेमवीराच लग्न त्या मुलीशी ठरलय... आता लग्नानंतर तो तिला काय काय देणार ते तो सांगतोय या काव्यातून...)



माझे वचन
लग्न घटिका हि जवळ आली,
तसा मनाने मी बावरलोय ग 
तुझी आठवण जशी आली 
तसा मी सावरलोय ग..

वचन देतो आज तुला
प्रेमाने ओंझळ भरेन तुझी,
ना आयुष्यात भासणार तुला
उणीव कुणा आपल्या माणसाची

प्रेम म्हणतात ते देईनच तुला
कारण तूच त्याची खरी हक्कदार
तुझे स्वप्न काय तू सांग  मला
नक्कीच करेन ते मी साकार

लग्नाचे हे नाते आपुले
अतूट असेल नेहमी 
जणू चंद्राला तारे लाभले
तशी साथ असेल तुला नेहमी

 

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)