प्रेमाचा ओलावा

(त्या लांबून पाहणा-या मुलाची त्या मुलीशी मैत्री झालीय पण हा प्रेमवीर सांगायची हिम्मत करू शकत नाही कारण तिला राग आल तर ती मैत्री तोडेल मग त्याची काय अवस्था होतेय ती बघा...)



प्रेमाचा ओलावा 

तुझे ते मोहक ते मोहक हसणे,
करती घायाळ हृदय माझे,
क्षणात होते जे माझे,
ते क्षणात का होई तुझे

भुरभुरती या तुझ्या बटांना,
हलकेच मागे करावे म्हणतोय मी,
गमावेन तुझी मैत्री म्हणून
तसाच मागे सरतोय मी

हसून तुझे टाळी देणे,
अंग अंग शहारून टाके
प्रेमाचे घालावे गा-हाणे
तर भीती शब्द गोठवून टाके

कधीतरी प्रेम उमजेल तुला,
म्हणून मैत्री आपली जगतोय मी,
प्रेमाची न सक्ती तुझ्यावर
मैत्रीत सतत तुला जपेन मी

दुर्गवीर चा धिरु
(प्रकाशनाचे प्रथम हक्क http://www.premrang.com/ कडे)
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)