स्वप्न शिवरायांच :- "तरुणांनो संघटीत व्हा!!!!"
काल सहजच विचार आला खरच किती बर झाला असत माझ आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संवाद साधता आला असता तर सर्व मनात साचलेल राजेंच्यापाशी मांडल असत ……… अन खरच राजे आले समोर काळा कुट्ट अंधार अचानक त्या अंधारात एक तेजोमय आकृती इतकी तेजोमय कि मी पाहू शकत नाही (तसही या कलियुगात कुणाची कुवत नाहीय ते तेज पाहण्याची). डोळ्यांना त्रास होतो म्हनून मी मान झुकवून तसाच उभा राहिलो तेव्हा जाणवलं ते तेज होत माझ्या शिवरायांच……… राजे तुम्ही तुमच्या या भक्ताच्या विनंतीला मान देऊन आलात? मी म्हटलं…. मुजरा राजे…. राजे थेट बोलले "बोल तुला काय बोलायचे आहे ते!! " मी म्हटलं राजे तुम्ही आलात बर झाल सगळीकडे जो बाजार चाललाय तो थांबवा… पहा राजे हा चाललेला गलिच्छ कारभार!! कुणी ब्राम्हण - मराठा वाद घालतंय तर कुणी दादोजी कोंडदेव यांच्यावर नको नको ते बरळतय… कुणी जाती पातीवर राजकारण करून आपल्या पोटाची खळगी भरतय तर कुणी स्वताला हिंदूचा तारणहार म्हणवून मोठ होतंय…. कुणी सावरकरांची टिंगल करत तर कुणी थेट राजे तुमची जात काढतय …. कु...