Posts

हरवलेलं कोकण…

Image
हरवलेलं कोकण… येवा कोकण आपलोच असा अस अभिमानान आम्ही सांगतो पण मुळात "माझो कोकण" माझो रवलोच नाय हा…. ह्या गोष्टीच खूप वाईट वाटत. आज माझ्या कोकणात आंब्याच्या बागेत राखणदार कोण ? "नेपाळी" रखवालदार !! अरे माझे कोकणी बांधव खय गेले मुंबईक आणि मुंबईत येवन करतत काय ? ३०००-४००० ची लाचा-याची नोकरी… अरे पण मुळात तो नेपाळी कोकणात आणतात कोण आमचे पैशेवाले बागायतदार… का तर म्हणे गावातली पोर एकतर चोरी-मारी करतात नाहीतर दादागिरी करतात… ह्या नेपाळ्यांना दादागिरी काय ते माहितच नाही आणि भुरटी चोरी ते करतच नाहीत डायरेक्ट मर्डर करून दरोडा टाकून कायमचे नेपाळ ला पळून जातात. आज माझ्या कोकणातल्या घरांची Contract कोण घेता खयचो तरी शहा, ठाकूर नायतर अजून कोण ?? आता हे लोक Contract घेतात याला माझा विरोध नाही पण… मग माझो मालवणी भाव काय करता त्या Contractor कडे गवंडीकाम करता रोजनदारीवर… आज माझ्या कोकणातील बेकरी व्यवसाय कोणाच्या "दाढीत" आहे हे सांगायला नको। जर हे "दाढीवाले" जर एवढा मोठा व्यवसाय टाकू शकतात तर माझो "कोकणी भाव" काय फक्त त्या "दाढि"...

काय रे हे दुर्दैव…. (इतिहासाची अवहेलना)

Image
काय रे हे दुर्दैव….   गुढिपाडव्याच्या आदल्या दिवशी शंभु राजांनी मृत्युला कवटाळले, मुळात जो मृत्यु कुणासाठिही थांबत नाही त्या मृत्युला शंभु राजांनी अक्षरश: रोखुन धरल. स्वत:स बादशहा समजणा-या औरंगजेबाची किव करत आणि संपुर्ण स्वराज्यात संघर्षाची मशाल पेटवत शंभु राजे नावाचा एक वणवा शांत झाला. शंभु राजे आयुष्यभर स्वराज्यासाठि वणव्याप्रमाणे अक्षरश: जळत राहिले ज्याची उब अख्या हिंदुस्थानाने पुढची अनेक वर्ष अनुभवली पण या ज्वलंत योध्याची जाणिव मात्र फार कमी लोकांनी ठेवली. आज वढु सारख्या ठिकाणी पिकनिकसाठी जाणारे महाभाग पाहिले की शंभु राजेंची हात जोडुन माफी मागाविशी वाटते. संभाजी महाराजांच्या नावाने ३० पानांत इतिहास शिकविणा-यांना उलट लटकवुन फटके द्यावेसे वाटतात! रत्नागिरी > संगमेश्वर येथे शंभु राजांसारख्या सिंहाच्या छाव्याला दगा करुन पकडलं . आज त्या ठिकाणी एक पडका वाडा आहे. बाजुला अत्यंत प्राचीन अशी मंदिर आहेत स्थानिकांच्या आख्यायिकेनुसार अशी ३६० मंदिर सभोवतालच्या परिसरात आहेत, सध्यस्थितीत फक्त ४ मंदिर शिल्लक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हि मंदिर कुणी "सरदेसाई" नावाच्या व्यक्त...

कोकण सफर :- भाग १ :- इच्छा तेथे मार्ग

Image
कोकण सफर :- भाग १ गुढी पाडवा आणि जोडून रविवार म्हटल्यावर दुर्गवीर गप्प बसतील काय ??/ निघाले कोकण वारीला नंतर मोर्चा कोल्हापुरात वळविला पण तिथे मी नव्हतो त्यांमुळे त्याचे अनुभव कथन मी करणार नाही तोवर या कोकण सफरीचा आनंद घ्या… तर प्रवासाची सुरुवात झाली. पुढे लक्षात आले एक जागा गाडित शिल्लक आहे आणि कल्याणचे आकाश खोराटे बंधु यांची या मोहिमेवर यायची प्रबळ इच्छा आहे. शेवटी त्यांची इच्छा पुर्ण झाली रात्री २ वाजता त्यांना फोन केला. ते सकाळची ट्रेन पकडुन शुक्रवारी दुपारी रत्नागिरी ला भेटणार होते. आकाश बंधु शिवरायांनी तुमची इच्छा पुर्ण केली कारण तुमच निस्वार्थ शिवप्रेम !! फक्त तुमचा हा निस्वार्थीपणा कायम असाच राहुदे !! याच इच्छा तेथे मार्ग च दुसर उदाहरण म्हणजे नुकतेच दुर्गवीर मध्ये सहभागी झालेले चंदन गावकर मुंबईहुन मॅंगलोर एक्सप्रेस पकडुन थेट रत्नागिरी ला रवाना झाले रामगडवर गुढिपाडवा साजरा केला आणि शनिवारीच परतीचे तिकीट काढुन मुंबईला पुन्हा रवाना अवघ्या काहि तासांच्या कार्यक्रमासाठि एवढा लांबचा प्रवास करुन आलेल्या चंदन गावकर यांच ही दुर्गवीर च्या कार्याबाबतीतील प्रेम वाखाण्याजोगे.....

शिवजयंती साजरी होणारच…

Image
शिवजयंती साजरी होणारच… तुम्ही तारीख आणि तिथी चे कितीही वाद घाला आणि आम्हा शिवभक्तांमध्ये कितीही फुट पडायचा प्रयत्न करा शिवजयंती हि साजरी होणारच… असा आक्रमक पवित्रा आज महाराष्ट्रातील शिवभक्तांनी घेतला जो उत्साह तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करताना होता तोच तिथीला…. मुळात सच्चा शिवभक्त तारीख / तिथी या वादात पडतच नाही त्याला फक्त शिवरायांच्या नावाचा जयजयकार करायला कारणच हव असत… मग तुम्ही ३६५ दिवस शिवजयंती करायची ठरवलीत तरी तोच उत्साह असेल या शिवभक्तांचा…. आज मुंबईभर चाललेल्या शिवजयंती कार्यक्रमांची बातम्या कानावर येत होत्या तेव्हा कान सुखावत होते. अनेक मंडळांच्या कार्यक्रमांना वेळे अभावी भेट देता आली नाही पण जिथे भेट दिली तिथले कार्यक्रम पाहून मन भरून आल. पहिल्यांदा कोपर येथील शास्त्र प्रदर्शनास काही दुर्गवीर सभासदांनी भेट दिली. त्याचवेळी सांताक्रूझ व बोरीवली येथे एकाच वेळी शिवजयंती साजरी करण्यात आली. मुंबईतील गोरेगांव येथे शिवजयंती कार्क्रमास सदिच्छा भेट दिली. दुपारनंतर लालबाग येथील राजुद्रा ट्रेकर्स च्या पोवाडा, मर्दानी खेळ, शस्त्र व नाणी प्रदर्शन ला भेट दिली. या कार्यक्रमात दोन -...

"देव्या"चा आवेश = देवेश……

Image
"देव्या"चा आवेश = देवेश…… मुळात दुर्गवीर कुणी कधी एकमेकांना परकं करतच नाही. दुर्गवीर नेहमी कुटुंब म्हणून सोबत राहते. त्याच कुटुंबाचा एक "अवलिया" सदस्य म्हणजे "देव्याभाई" उर्फ "देवेशभाई सावंत" दुर्गवीर ची AK47 जी नेहमी धडधडतच असते… कधी कुणाला लहानमोठा मनातच नाही. लहानशी लहान आणि मोठ्यांशी मोठा होऊन वागण्याच्या त्याच्या कलेमुळे सगळ्यांमध्ये "फ़ेमस" आहे. आज दुर्गवीर तर्फे शिवजयंती उत्सव "बोरीवली" येथे साजरा करण्यात येणार होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन देवेश आणि त्याचा भाऊ विशाल आणि संपूर्ण टीम(इतरांची नाव मला माहित नाहीत म्हणून त्यांची माफी मागून ) यांनी केली, अर्थातच एवढ मोठ नियोजन करताना त्यांना रात्रीची झोप सुद्धा मिळाली नसणार हे नक्की… पण दुस-या दिवशी आम्ही सर्व इतर ज्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात फारशी मदत केली नाही (निदान मी तरी काहीच मदत केली नाही…. कशी करणार पोचलोच सकाळी ११ वाजता) त्या सर्वांच आदरातिथ्य करण्यात हे सगळे तत्पर होते. कधी वाटत तरुण सळसळत रक्त आहे कुठेतरी अतिउत्साहाच्या भरात चुकतील पण कदाचित त...

शिवजयंती..... तिथी नुसार कि तारखेनुसार...

Image
काल १९ फेब्रुवारी!! "तारखेप्रमाणे" शिवजयंती साजरा करण्याचा दिवस ! दिवसभर मेसेज, फोटो चा नुसता पाऊस पडत होता ! दर वर्षीपेक्षा या वर्षीच्या शिवजयंतीला "ठळकपणे" जाणवत होत सर्वांच "शिवप्रेम"... यात तिन प्रकारचे शिवभक्त असल्याचे मला जाणवलं. एक जे शिवजयंती "तारखेप्रमाणेच" साजरी करा असा आग्रह करणारे आणि त्यासाठी तिथिप्रमाणे शिवजयंती करणा-यांना तिव्र विरोध करणारे ! दुसरे जे शिवजयंती तिथीप्रमाणेच साजरी करावी असे मानणारे आणि तारखेप्रमाणे शिवजयंती करणा-यांचा तिव्र विरोध करणारे ! तिसरे ज्यांना तारिख आणि तिथी यात नेमका वाद काय आहे ! हा वाद कोण आणि का करतय याचा मागमुस नसताना फक्त शिवरायांच्या विषयीच्या "आंधळ्या प्रेमापोटि"(हो ! आंधळ्याच) समोर आलेला मेसेज पुढे पाठवून आपले "भाबडे" शिवप्रेम व्यक्त करणारे यात तारखेप्रमाणे शिवजयंती करणारे चुक की तिथी प्रमाणे चुक हा मुद्दाच नाहिय ! मुद्दा हा आहे की ज्यांना नेमका हा वाद काय आहे आणि कोण करतय याची माहिती नाहि त्यांच्या मनात जो संभ्रम निर्माण होतोय "त्यांची काय चुक" ??? जर काहि लोक या...

आरसा संस्कृतीचा

Image
आरसा संस्कृतीचा डोक्यावर भरगच्च कुंकू (कुंकू बर का ! टिकली नाही) हातभर हिरव्या बांगड्या ! नाकात नथ ! नऊवारीत नटलेल्या ह्या आजींचे वर्णन. राहणी जेवढि सांस्कृतिक तेवढि वाणीहि सुमधुर ! वेळ होती बदलापुर येथील दुर्गवीर गडसंवर्धन छायचित्र प्रदर्शन ! तिथल्या इतर लोकांना संस्कृती, धर्म, संस्कार याच्याशी काही देण घेण होत का याच मोजमाप करण्यात मी वेळ घालवलाच नाही. यां आजींच्या वागण्या बोलण्यातुन आपली संस्कृती का व कशी जपावी हे स्पष्ट जाणवत होते. आम्ही दुर्गवीर ज्या ठिकाणी जातो तिथे आपली संस्कृती,इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतो. पण यावेळि मात्र आम्हि या आजींच्या बोलण्याने अक्षरश: भारावुन गेलो! आजकालच्या मुलामूलींना इतिहास, संस्कृती हे कंटाळवाण वाटत कारण पाश्चात्य संस्कृति त्यांना जवळची वाटते इतरांनी कस वागाव हे तर आपण ठरवु शकत नाही पण मी कस वागाव मी ठरवलंय. तुम्ही कस वागायचं हे तुम्ही ठरवाल आणि ते योग्यच असेल अशी आशा करतो. जय शिवराय दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/