होळी (Holi)
होळी (Holi)
होळीचे पौराणिक महत्व:- भक्त प्रल्हादांना संपविण्यासाठी हिरण्यकश्यपुने धाडलेल्या होलिकाचा श्री विष्णूंनी वध केला. त्याचे प्रतिक म्हणून होळी पेटविण्यात येते.
होळीचे वैचारिक महत्व :- मनातील वाईट विचारांना आगीत जाळून संपविणे ह्याचे प्रतिक म्हणजे होळी होय.
वैज्ञानिक महत्व :- या काळात झाडांची मोठ्या प्रमाणावर गळतात तीच गोळा करून त्याचे आगीत दहन केले जाते. यात कुठेही वृक्षतोड होत नाही. दुस-या दिवशी ह्याच आगीची राख थंड झाल्यावर अंगाला लावली जाते ते पुढे येणा-या उष्ण वातावरण सहन करता येईल याचे ते एक प्रतिक आहे.
आजच्या काळात मात्र या सर्व संज्ञा मागे पडत आहेत वृक्षांची कत्तल होत आहे. आणि यात काही हिंदूधर्म द्वेषी होळी सण साजरा करू नका म्हणून सल्ले देत आहेत. वृक्ष तोड न करता आपल्या परिसरातील, झाडांची पाने (झाडे शिल्लक असतील तर), सुका कचरा, अश्या अनेक वस्तू ज्याचा कचरा होतो त्याची होळी करा. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सण साजरा करताना वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेतला आपणही याकडे डोळसपणे पाहायला हवे. विरोधाला विरोध म्हणून चुकीच्या गोष्टी करू नये. आणि खबरदार इतर "हिंदू द्वेष" करणा-यानो हिंदू चालीरीतींना नाव ठेवणं-यानो अगोदर हिंदू संस्कृतीचा अभ्यास करा मग आपली बडबड करा….
सर्वांना होळी, रंगपंचमी च्या खूप सा-या शुभेच्छा….
जय शिवराय
जय हिंदू राष्ट्र
जय हिंदू राष्ट्र
Comments
Post a Comment