स्त्री सन्मान…



स्त्री सन्मान…

"स्त्री" एक दैवी चमत्कार…… निर्माणकर्त्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती करताना एक माधुर्यपूर्ण "रसायनाची" निर्मिती केली जिच्या शिवाय हे विश्व अपूर्ण राहिले असते ती म्हणजे "स्त्री"…
खर तर एक स्त्री नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत आपल्या जबाबद-या पार पाडत असते. कधी मुलगी तर कधी बहिण, कधी पत्नी तर कधी आई प्रत्येक वेळी ती तीच्या स्त्रीत्वाची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडते असते. आज स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे नाही हे नव्याने सांगायला नको.
आज "जागतिक महिला दिनाच्या" निमित्ताने त्याच स्त्रीच्या सन्मानाची गरज आहे. आज डेलीसोप, चित्रपटां मध्ये अतिरंजितपणे रंगविली जाणारी स्त्री ख-या आयुष्यात तशी नसते हे सामान्य माणसाला त्याच्या आई-बहिणीकडे पाहिल्यावर जाणवते. आज देशात स्त्री कितपत सुरक्षित आहे हे आपण जाणतोच आजची स्त्री आरक्षण नाही तर संरक्षण मागतेय. पण इतिहास साक्षीदार आहे जेव्हा संकट येते तेव्हा सोज्वळ अशी स्त्री रौद्र अवतार घेऊ शकते. जी स्त्री लक्ष्मी, सरस्वती ह्या सोज्वळ रुपात पाहतो तिचे महिषासूरमर्दिनीचे रूपही प्रत्येकाला परिचित असावे.

आज एखाद्या पुरुषाने आपल्या घरातील स्त्रीचा आदर तर करायला हवाच पण इतर स्त्रिया/मुली याही आदरणीय आहेत हे विसरू नये. एखाद्या मुलाने/पुरुषाने स्त्री कडे वाईट नजरेने पाहताना एक विचार नक्की करायला हवा त्या ठिकाणी आपली बहिण/ आई / बायको असती तर आपण काय प्रतिक्रिया दिली असती. स्त्री हि वापराची वस्तू नाही तर ती संपूर्ण निसर्गाच्या चक्रातील असा भाग आहे ज्यावर हे विश्व चालते. आज प्रत्येक स्त्रीमधील आई हे जिजाऊ चे रूप समजावे. आणि तिचा आदर करावा. आपली बहिण हि सर्वगुणसंपन्न बहिणाबाई चे एक रुप आहे असे समजावे. आपली बायको हि त्याच राणी लक्ष्मी बाईचा अवतार समजावे जी फक्त स्वराज्यासाठी मुल पाठीशी ठेवून पतीचा वारसा लढवतच हुतात्मा झाली.

आज जगतिक स्त्री दिनाच्या निमित्ताने निर्माणकर्त्याच्या या अलौकिक स्त्रीतत्वाला माझा सादर प्रणाम

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….