सरस……. (गड)
.jpg)
सरस……. (गड) दि. २१. ७ . २०१३ रोजी दुर्गवीरचे अवघे ७ शिलेदार मिळून आम्ही सरसगड (पाली) येथे जायचे ठरविले . सकाळी ६:२०मि. ट्रेन दिवा स्टेशन येणार होती. नितीन दादा तर सकाळी ४:३० पासूनच संपर्कात होते. प्रश्नात वाघरे बंधू अनफिट असल्याने त्यांनी माघार घेतली होती. कोणं कोण येणार याची फार मोठी उत्सुकता होती. राज, सुरज, नितीन हे येणार इतक पक्क होत. सकाळी समजल "अल्लाउद्दिन चा जीन" (हर्षद मोरे ) येणार आहेत मी आणि हर्षद बंधू दिवा ला भेटलो. बसायला जागा कुठे दिसत नव्हती जरा पुढे गेल्यावर जागा दिसली लगेच तिथे स्थानापन्न झालो पण नशीब खराब आमच गाडी अर्धा तास लेट, मग काय सुरुवात चिंतनाला त्यात समजल आमचे डोंबिवली चे धष्टपुष्ट व्यक्तिमत्व प्रशांत अधटराव बंधू येतायत त्याचं नशीब चांगल गाडी लेट झाली म्हणून मिळाली. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या नंतर माझे चिंतन सुरु झाले आणि प्रश्नात व हर्षद बंदुंचे "निरीक्षण" सुरु झाले. शेवटी गाडी पोचली पनवेल ला तिथे नितन, राज, सुरज, अजित कोकीतकर बंधू आमच्यात सामी...